5 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2023)
न्यायवृंदाच्या शिफारशीनुसार पाच न्यायमूर्तीच्या नियुक्तीस मंजुरी:
न्यायवृंदाने केलेल्या शिफारशीनुसार शनिवारी सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तीची नियुक्ती करण्यात आली.
न्यायवृंदाने गेल्या वर्षी 13 डिसेंबरला न्यायमूर्तीच्या नावांची शिफारस केंद्र सरकारकडे केली होती.
सर्वोच्च न्यायालयापुढे नमते घेत न्यायवृंदाने शिफारस केलेल्या नावांना केंद्राला अखेर मंजुरी द्यावी लागली.
पंतप्रधान कार्यालयाने 2 फेब्रुवारीला नियुक्त्यांना मंजुरी दिल्यानंतर न्यायमूर्तीची नावे नियुक्तीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आली होती.
राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती पंकज मिथल, पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय करोल, मणिपूर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती पी. व्ही. संजयकुमार, पाटणा उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती
अहसानुद्दीन अमनुल्लाह आणि अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आल्याचे रिजिजू यांनी म्हटले आहे.
हे पाच न्यायमूर्ती पुढच्या आठवडय़ात शपथ ग्रहण करतील.
त्यानंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीची संख्या 32 होईल.
‘अग्निवीर’साठी आता प्रवेश परीक्षा भरती प्रक्रियेत बदल:
लष्कराने ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत.
त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल.
यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल.
आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे.
मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल.
जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरवर बंदी:
भारताची जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरवर उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणात दोषी आढळल्यामुळे 21 महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय चाचणी संघटनेने (आयटीए) घेतलेल्या उत्तेजक सेवन चाचणीमध्ये दीपा दोषी आढळल्याने तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघाच्या संकेतस्थळावर दीपाची ‘निलंबित’ अशी नोंद करण्यात आली आहे.
मात्र, दीपाचे निलंबन हे उत्तेजक द्रव्य सेवन प्रकरणाशी संबंधित नसल्याचे राष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स संघटनेकडून सांगण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघासाठी काम करणाऱ्या ‘आयटीए’ या स्वतंत्र उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने दीपाची स्पर्धाविरहित कालावधीत चाचणी घेतली होती.
यात दीपाच्या शरीरात ‘हिजेनामाइन’ हे उत्तेजक सापडले आहे. या द्रव्यावर जागतिक प्रतिबंधक संस्थेने बंदी घातली आहे.
महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंची सुवर्ण हॅट्ट्रिक:
महाराष्ट्राच्या बॉक्सिंगपटूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शनिवारी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साधली.
मात्र, याच क्रीडा प्रकारातील हरियाणाच्या अपेक्षित यशाने महाराष्ट्राला पदकतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरावे लागले.
यजमान मध्य प्रदेश तिसऱ्या स्थानी आहे.
महाराष्ट्राकडून शनिवारी देविका घोरपडे, कुणाल घोरपडे, उमर शेख (तिघे बॉक्सिंग) आणि सारा राऊळ (जिम्नॅस्टिक) यांनी सुवर्णपदकांची कमाई केली.
सायकिलगमध्ये पूजा दानोळे, संज्ञा कोकाटेचे यश कायम राहिले. ॲथलेटिक्समध्ये रिले शर्यतीत मुलींनी सुवर्ण कामगिरी केली.
बॉक्सिंगमध्ये देविका, उमर, कुणालला सुवर्ण बॉक्सिंग प्रकारात महाराष्ट्राचे चार खेळाडू अंतिम फेरीत होते.
यापैकी उमर अन्वर शेख, देविका घोरपडे, कुणाल घोरपडे या तिघा पुण्याच्या खेळाडूंनी सुवर्णपदकाची कमाई केली.
दिनविशेष:
चार्ली चॅप्लिनने सन 1919 मध्ये इतर तीन जणांबरोबर युनायटेड आर्टिस्ट्स कंपनीची स्थापना केली होती.
सन 1952 मध्ये स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या होत्या.
सन 2003 या वर्षी भारताने 2002 मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-4 या हवामानविषयक उपग्रहाला अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
पुण्याची स्वाती घाटे ही सन 2004 या वर्षी बुद्धिबळातील वूमन ग्रँडमास्टर झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.