5 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 January 2019 Current Affairs In Marathi

5 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जानेवारी 2019)

प्रवासींसाठी रेल्वेचा महत्त्वपूर्ण निर्णय:

  • रेल्वेत प्रवास करताना जर तुम्हाला जेवणाचं बिल मिळाले नाही तर ते जेवण फुकट असणार आहे. रेल्वेनकडून हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
  • मार्च महिन्यापासून सर्व प्रवाशांना दिसेल अशा पद्धतीने जेवणाच्या किंमती दर्शवणारा तक्ता लावण्यात येणार आहे. यावेळी त्या तक्त्यावर एक महत्त्वाचा संदेश लिहिला असेल तो म्हणजे, ‘कृपया टीप देऊ नका, जर बिल मिळाले नाही तर तुमचे जेवण फुकट असणार आहे’. रेल्वेमधील कॅटरिंग सेवेत पारदर्शकता यावी यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी हा निर्णय घेतला आहे.
  • रेल्वेमंत्री पियूष गोयल यांची रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी पियूष गोयल यांनी प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी एकच हेल्पलाइन क्रमांक सुरु करण्याचा आदेश दिला. यासाठी जानेवारी 2019 पर्यंत वेळ देण्यात आला आहे.

भारताने संशोधनावरील गुंतवणूक वाढवावी:

  • भारतात संशोधन होत आहे. त्यासाठीची गुणवत्ताही येथे आहे. मात्र या देशात संशोधनासाठी अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत नोबेल पुरस्कार विजेते संशोधक डंकन हॅल्डेन यांनी व्यक्त केलेHanglen
  • फगवाडा येथे सुरू असलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसदरम्यान हॅल्डेन यांनी माध्यमांशी संवाद साधला. भारतात उपयोजित संशोधनाऐवजी मूलभूत विज्ञानावरील संशोधनावर अधिक भर दिला जातो. यासाठी देशात अधिक गुंतवणूक होण्याची आवश्यक आहे. मात्र चीनमध्ये धातू विज्ञानासारख्या उपयोजित संशोधनावर गुंतवणूक केली जाते.
  • आशिया खंडात चीन आणि भारत हे दोन देश वेगाने प्रगत करत आहेत. विकसनशील देशांनी ‘ब्रेनगेन’ व्हावा यासाठी प्रयत्न वाढवणे आवश्यक आहे. चीनने संशोधन क्षेत्रातील गुंतवणुकीवर भर दिल्यामुळे तेथे मोठय़ा प्रमाणावर ‘ब्रेनगेन’ होत आहे, असे त्यांनी सांगितले.
  • तर अमेरिका, युरोपमधून संशोधक भारतात परतणे कठीण आहे, असे सांगतानाच शासनाने केवळ योजना आखून उपयोग नाही तर उद्दिष्ट म्हणून कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. परदेशातील संशोधकांसाठी येथे ‘सेंटर्स ऑफ एक्सलन्स’ उभारावीत, असेही हॅल्डेन यांनी सांगितले.

दूरसंचार कंपन्यांना 58 लाख रुपयांचा दंड:

  • सातत्याने होणाऱ्या कॉल ड्रॉपवर लगाम बसवण्यासाठी दूरसंचार कंपन्यांना 58 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
  • दूरसंचार मंत्री मनोज सिन्हा यांनी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. ही आकडेवारी जानेवारी 2018 ते जून 2018 या कालावधीतील आहे.
  • दंड ठोठावण्यात आलेल्या कंपन्यांमध्ये प्रामुख्याने बीएसएनएल आणि आयडियासह इतर कंपन्यांचाही समावेश आहे. जून 2018 ला संपलेल्या तिमाहीदरम्यान, बीएसएनएलला चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
  • तर, एकट्या आयडीया कंपनीला 12 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याशिवाय, मार्च 2018मध्ये संपलेल्या तिमाहीत बीएसएनएल, आयडीया, टाटा आणि टेलीनॉरवरही दंड लावण्यात आला.
  • भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणने (ट्राय) कॉल ड्रॉप आणि सेवांमधील दर्जा घसरल्याबद्दल दूरसंचार कंपन्यांना हा दंड ठोठावला आहे. दूरसंचार कंपन्या देत असलेल्या सेवांच्या गुणवत्तेत सुधारणा होण्यासाठी हा दंड ठोठावण्यात आला आहे.

भारतीय विज्ञान कॉंग्रेस संमेनल:

  • सौरऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, वापरलेल्या खाद्यतेलापासून साबण, अपंगांना मदत करणारा यंत्रमानव अशा बालवैज्ञानिकांच्या आविष्कारांनी भारतीय विज्ञान काँग्रेसमधील ‘किशोर वैज्ञानिक संमेलन‘ सजले आहे. या संमेलनाचे उद्घाटन नोबेल विजेत्या संशोधकांच्या हस्ते 4 जानेवारी रोजी करण्यात आले
  • देशभरातून कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांचे विज्ञान प्रकल्प संमेलनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत. शेतीच्या अवजारांपासून ते यंत्रमानवापर्यंत विविध प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत.
  • आंध्र प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी पिकांची काढणी करणारे यंत्र तयार केले आहे. हे यंत्र सौरऊर्जेवर चालते. छोटय़ा शेतांमध्ये काम करण्यासाठी किफायतशीर पर्याय विद्यार्थ्यांनी तयार केला आहे. अपंग, रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण यांना मदत करणारा यंत्रमानव दिल्ली येथील विद्यार्थ्यांनी साकारला आहे. अपंगांना हवी ती वस्तू तो आणून देऊ शकेल.
  • जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थिनीने वापरलेल्या खाद्यतेलापासून तयार केलेला साबण लक्षवेधी ठरला आहे. राजस्थानमधील विद्यार्थ्यांने नदी, तलाव स्वच्छ करणारी, रिमोटवरील नाव तयार केली आहे. जलपर्णी, पडलेल्या वस्तू, धातूच्या वस्तू ही नाव गोळा करू शकते.

अधिकृत नागरिकांवर कोणताही अन्याय होणार नाही:

  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीतून (एनआरसी) कोणत्याही खऱ्या नागरिकाला वगळले जाणार नाही, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.
  • नागरिकत्व (सुधारणा) विधेयकाला संसदेत मंजुरी मिळेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आसाममधील कालीनगर येथे विजय संकल्प समावेश रॅलीमध्ये ते बोलत होते.
  • राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये अनेकांना अडचणी जाणवत असल्याची मला कल्पना आहे. पण मी खात्री देतो की एकाही खऱ्या नागरिकाला त्यातून वगळले जाणार नाही आणि कोणावरही अन्याय केला जाणार नाही, असे मोदी म्हणाले.
  • केंद्र सरकार नागरिकत्व (सुधारणा) विधेयक संसदेत दाखल करत आहे. ते लवकरच संमत होईल अशी आशा करतो. ते कोणाचाही फायदा करून देण्यासाठी नाही तर आजवर ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यासाठी आणि ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांना शासन करण्यासाठी आहे, असेही ते म्हणाले.

दिनविशेष:

  • महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.
  • 5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
  • पश्चिम बंगालच्या 8व्यापहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.
  • सन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.
  • ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञगेरहार्ड फिशरयांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
1 Comment
  1. Dipak kakade says

    Study Material wattap la pahije

Leave A Reply

Your email address will not be published.