5 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 जानेवारी 2023)
‘चांद्रयान-3’ प्रक्षेपणासाठी सज्ज:
- चांद्रयान-3 मोहिमेचे काम जवळपास पूर्ण झाले असून ते प्रक्षेपणासाठी सज्ज आहे.
- येत्या जून-जुलै 2023 मध्ये त्याचे प्रक्षेपण केले जाईल,अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ यांनी दिली.
- चांद्रयान-2 आणि चांद्रयान-3 चा उद्देश सारखा आहे.
- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर उतरवणे हा चांद्रयान-2चा उद्देश होता.
- चांद्रयान-2 मोहिमेदरम्यान सप्टेंबर 2019 मध्ये लँडर ‘विक्रम’ चंद्राच्या पृष्ठभागावर कोसळले होते.
- त्यानंतर चांद्रयान-3 ही मोहीम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उर्जानिर्मितीसाठीच्या राष्ट्रीय मोहिमेला केंद्र सरकारची मंजुरी:
- वातावरण बदलाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी जगभर हरित डायड्रोजनच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून देशातही 2030 पर्यंत वार्षिक 50 लाख टन हरित हायड्रोजन उत्पादनाची क्षमता निर्माण करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.
- त्यासाठी महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
- या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात केंद्र सरकार 19 हजार 744 कोटी खर्च करणार आहे.
- हरित हायड्रोजनचे देशांतर्गत उत्पादन वाढणार असून इंधन आयातीचे प्रमाण कमी होऊन 1 लाख कोटींची बचत होईल.
देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती:
- भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांना बुधवारी मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलं.
- मुंबई पोलीस दलात ही नवी पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
- मुंबई पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच विशेष पोलीस आयुक्त हे पद निर्माण करण्यात आलं आहे.
- देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील अशी शक्यता आहे.
- एप्रिल 2015 मध्ये मुंबईच्या सहपोलीस आयुक्त पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. कायदा आणि सुव्यवस्था ही जबाबदारी त्यांच्याकडे होती.
- महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकिय संचालक हे पद देवेन भारती यांना देण्यात आलं होतं.
उमरान मलिकने‘या’ दिग्गजाचा मोडला विक्रम:
- भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला टी20 सामना खेळला गेला.
- आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयाकडून सर्वात जलद चेंडू देण्याचा विक्रम उमरान मलिक या वेगवान गोलंदाजाच्या नावावर आहे.
- त्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला आहे.
- त्याच्याआधी भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर होता.
- बुमराहने 153.36 च्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी .
हुड्डा-अक्षर जोडीने 13 वर्षांपूर्वीचा धोनी-पठाणचा ‘हा’ विक्रम मोडला:
- विजयाचा पाया रचण्याचे श्रेय दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल यांना जाते.
- त्याचबरोबर या जोडीने 13 वर्षापूर्वीचा एक विक्रम मोडला आहे.
- दीपक हुडा आणि अक्षर पटेल यांनी मिळून भारताची धावसंख्या 5 विकेट्सवर 162 पर्यंत नेली.
- या दोघांच्या जोडीने 13 वर्षांचा महेंद्रसिंग धोनी आणि युसूफ पठाण यांचा विक्रमही मोडला आहे.
- हूडा आणि अक्षर आता टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सहाव्या विकेटसाठी सर्वात मोठ्या भागीदारीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- पहिल्या क्रमांकावर विराट कोहली आणि हार्दिक पांड्याची जोडी आहे.
- भारताकडून धोनी आणि पठाणची जोडी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
दिनविशेष:
- महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्य लोकांसाठी सन 1924 मध्ये खुले केले.
- 5 जानेवारी 1949 रोजी पुणे यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) सुरू झाली.
- पश्चिम बंगालच्या 8व्या व पहिल्याच महिला मुख्यमंत्री आणि तृणमूल पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचा जन्म 5 जानेवारी 1955 मध्ये झाला.
- सन 1957 मध्ये विक्रीकर कायदा सुरू झाला.
- ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ ‘गेरहार्ड फिशर‘ यांना सन 1998 मध्ये कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.