Current Affairs (चालू घडामोडी)

5 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

5 June 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 जून 2019)

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनणार :

  • चालू वर्षात भारत जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे.
  • तर सध्या भारत सहाव्या स्थानावर असून ब्रिटन जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.
  • परंतु भारत ब्रिटला मागे टाकणार असून पाचव्या स्थानावर झेप घेईल. तसेच 2025 सालापर्यंत आशिया पॅसिफिक क्षेत्रात जापानलाही मागे टाकत भारत दुसऱ्या स्थानावर जाईल, असे अनुमान ‘आयएचएस मार्किट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.
  • 2019 मध्ये भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि देशाचा जीडीपी 3 लाख कोटी डॉलर्सपेक्षा अधिक होणार असल्याचे ‘आयएचएसच्या मार्किट’च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
  • तर जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांच्या रॅकिंकमध्ये भारत पुढे जाणार असून जागतिक जीडीपीच्या वृद्धीतही भारताचे योगदान वाढेल. तसेच भारत आशिया पॅसिफिक क्षेत्रातील एक प्रमुख इंजिन बनेल. आशियाई क्षेत्रातील व्यापार आणि
    गुंतवणुकीच्या प्रवाहातही भारताचे अमूल्य योगदान असेल, असेही अहलवालात सांगण्यात आले आहे.
  • सध्या जीडीपीमध्ये उत्पादन क्षेत्राचा वाटा 18 टक्के असून 25 टक्क्यांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, विद्यमान सरकारसमोर उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील रोजगार वाढवण्याचे आव्हान असेल असेही यात नमूद करण्यात आले आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 जून 2019)

भारताकडून सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं यशस्वी परीक्षण :

  • ओडिशाच्या चांदीपूरमध्ये चाचणी श्रेणी(आयटीआर)त सुपरसोनिक क्रूझ मिसाइल ब्रह्मोसचं परीक्षण करण्यात आलं.
    संरक्षण संशोधन व विकास संस्थे(डीआरडीओ)च्या सूत्रांच्या माहितीनुसार, या मिसाइलचं परीक्षण आईटीआरमध्ये करण्यात आलं आहे.
  • तर ही जगातील सर्वात वेगवान सुपरसोनिक क्रूझ मिसाइल आहे. जिची मारक क्षमता जबरदस्त आहे. ब्रह्मोस मिसाइलचा जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करू शकतो. या मिसाइलची मारक क्षमता 290 किलोमीटरच्या जवळपास आहे.
  • भारताच्या कूटनीतीसाठी शस्त्रास्त्रं आहे. चीन आणि पाकिस्तानकडून मिळणाऱ्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही मिसाइल निर्णायक ठरत आहे.
  • ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्र येत्या 7 ते 10 वर्षांत आवाजापेक्षा सातपट अधिक अर्थात ‘मॅक 7’ इतक्या वेगाने मारा करू शकणार आहे. सध्या ‘मॅक 2.8’ वेगाने मारा करणारे हे क्षेपणास्त्र टप्प्याटप्प्याने वेग वाढवून सध्याच्या ‘सुपरसॉनिक’वरून अधिक वरच्या ‘हायपरसॉनिक’ श्रेणीत नेण्यात येईल, असे गेल्या काही दिवसांपूर्वी ‘ब्रह्मोस एअरोस्पेस’ मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुधीर मिश्रा यांनी सांगितले होते.
  • तर आवाजाच्या दुप्पट ते तिप्पट वेगाने मारा करणारी सुपरसोनिक क्षेपणास्त्रे अनेक देशांकडे आहेत. पण आवाजापेक्षा चारपट किंवा त्याहून अधिक वेगाने मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान जगात फक्त चार देशांकडे आहे.
  • अमेरिका या तंत्रज्ञानावर सध्या काम करीत आहे. याखेरीज दोन प्रकारची क्षेपणास्त्रे रशिया स्वतंत्रपणे विकसित करीत आहे. रशिया आणि चीन संयुक्तपणे दोन प्रकारची क्षेपणास्त्रे निर्मित करीत आहे. त्यानंतर भारत-रशिया यावर काम
    करीत आहे.
  • भारत अलिकडेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण देशांच्या गटाच्या (एमटीसीआर) निर्बंधांतून बाहेर पडला. त्यामुळे सुपरसोनिक वेगाच्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 300 किमीच्यावर नेण्यावरील बंधनातून भारताची मुक्तता झाली आहे.
  • यामुळेच सध्याच्या ब्रह्मोसची मारक क्षमता 450 किमीवर नेली जात आहे. त्यानंतर हायपरसोनिक (मॅक 7) श्रेणीतील ब्रह्मोसची मारक क्षमता 700 किमीपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

सीईटीत विनायक गोडबोले, आदर्श अभंगे राज्यात प्रथम :

  • राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेत खुल्या गटातून सोलापूरचा विनायक गोडबोले (पीसीबी 100 पर्सेंटाइल), तर नांदेडचा
    आदर्श अभंगे (पीसीएम 100 पर्सेंटाइल) हा अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गातून राज्यात प्रथम आला.
  • पीसीएम विषयांत खुल्या गटातून मुलांमध्ये धुळ्याचा अमन पाटील, तर मुलींमध्ये रत्नागिरीची मुग्धा पोखरणकर प्रथम आली.
  • राखीव संवर्गातून मुलींमध्ये बीडची गीतांजली वारंगुळे हिने प्रथम येण्याचा मान मिळविला. पीसीबी विषयांत खुल्या गटात मुलींमध्ये नांदेडची ऋचा पालक्रीतवार प्रथम आली. याच विषयांत राखीव संवर्गातून प्रथम येण्याचा मान नाशिकच्या अभिषेक घोलप याने मिळविला.

पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी श्रीलंकेत उंचावला तिरंगा :

  • पालघर पोलीस दलाच्या मुख्यालयात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई रितेश दिनेश प्रजापती यांनी 17 व्या टेनशिप कप इंटरनॅशनल कराटे स्पर्धेत भारताचे नेतृत्व करून 4 सुवर्ण पदके पटकावली आहेत.
  • तर ही स्पर्धा श्रीलंका देशात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी जगभरातून स्पर्धक सहभागी झाले होते.
  • फस्ट मेन ओपन काता, फस्ट मेन ओपन कृमितो, फस्ट मेन ओपन टीम काता, फस्ट मेन ओपन टीम कृमितो या स्पर्धा प्रकरात पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांनी 4 सुवर्ण पदके पटकावले.
  • तसेच या उत्तम कामगिरीबद्दल पालघर पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी पोलीस शिपाई रितेश प्रजापती यांचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.

दिनविशेष :

  • 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ आहे.
  • भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचा जन्म 5 जून 1879 रोजी झाला.
  • कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक रवि नारायण रेड्डी यांचा जन्म 5 जून 1908 रोजी झाला.
  • भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे (AITUC) एक संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ 5 जून 1980 रोजी टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 जून 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago