Current Affairs (चालू घडामोडी)

5 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचर

5 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 मार्च 2020)

सर्वोच्च न्यायालयाने उठवली क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवरील बंदी :

  • सर्वोच्च न्यायालयाने आभासी चलनाच्या (क्रिप्टोकरन्सी) वापरावर लावण्यात आलेली बंदी उठवली असून व्यवहारात वापर करण्यासाठी परवानगी दिली आहे.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) एप्रिल 2018 मध्ये बिटकॉइनसारख्या आभासी चलनाच्या ट्रेडिंगवर बंदी आणली होती. आरबीआयने बिटकॉइन तसंच इतर आभासी चलनांसंबधी नियम अत्यंत कठीण केले होते. यावेळी त्यांनी बँक आणि इतर आर्थिक संस्थांना कोणत्याही सेवा देण्यापासून बंदी आणली होती.
  • तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर मोबाइल असोसिएशन ऑफ इंडियाच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवण्याचा निर्णय दिला. यावेळी न्यायालयाने आरबीआय अशा प्रकारची बंदी आणू शकत नाही असं सांगितलं.
  • तर आरबीआयने आपल्या आदेशात सांगितलं होतं की, कोणत्याही आर्थिक संस्थेने क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक करु नये. यासोबतच आरबीआयने सामान्य नागरिकांना क्रिप्टोकरन्सीवर ट्रेडिंग केल्यानंतर होणाऱ्या नुकसानासाठी स्वत: जबाबदार असतील असा इशारा दिला होता.
  • 2018 मध्ये आभासी चलन बिटकॉइनचं महत्व आणि किंमत वाढत होती. अनेकांनी बिटकॉइनच्या सहाय्याने मोठी कमाई करत नफा मिळवला होता. बिटकॉइनचा वाढता वापर लक्षात घेता आरबीआयने त्याला चलन म्हणून मान्यता देण्यास नकार दिला होता. सोबतच बिटकॉइनमध्ये ट्रेडिंगमुळे होणाऱ्या नुकसानासाठी आरबीआय जबाबदार राहणार नाही असंही स्पष्ट केलं होतं.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 मार्च 2020)

16 व्या वर्षी शफाली नंबर वन :

  • टीम इंडियाची युवा धडाकेबाज फलंदाज शफाली वर्मा हिने जागतिक टी 20 फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.
  • ICC ने महिला टी 20 क्रिकेटपटूंची ताजी यादी जाहीर केली. यात शफाली तब्बल 19 स्थानांची झेप घेत पहिल्या स्थानी विराजमान झाली आहे.
  • तसेच तिने न्यूझीलंडची अनुभवी खेळाडू सुझी बेट्स हिला मागे टाकले. सुझी बेट्स हिची एका स्थानाने घसरण होऊन ती दुसऱ्या स्थानी घसरली आहे. सुझीचे 750 गुणांक आहेत, तर शफाली 761 गुणांकासह अव्वल आहे.
    तर ऑक्टोबर 2018 पासून सुझी अव्वल स्थानी होती. अखेर 17 महिन्यांनी तिला दुसऱ्या स्थानी ढकलत शफालीने अव्वल स्थान पटकावले.
  • टी 20 विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला होता. त्यात शफालीचे महत्त्वाचे योगदान होते. प्रत्येक सामन्यात शफालीने धडाकेबाज कामगिरी करत भारताला विजय मिळवून दिला.
    शफालीने भारताला दमदार कामगिरी करून देत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. यासह महिला आणि पुरूष अशा दोन्ही क्रिकेटमध्ये मिळून टी 20 जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावणारी शफाली सर्वात तरूण भारतीय क्रिकेटपटू ठरली.
  • याशिवाय भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिच्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी ती दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली.

सुनिल जोशी नवे निवड-समिती प्रमुख :

  • बीसीसीआयच्या निवड समिती-प्रमुख पदावर माजी फिरकीपटू सुनिल जोशी यांची निवड करण्यात आलेली आहे.
    तर बीसीसीआयच्या त्रिसदस्यीय क्रिकेट प्रशासकीय समितीने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. ज्यात सुनिल जोशी आणि हरविंदर सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.
  • तसेच एम.एस.के.प्रसाद यांचा बीसीसीआयच्या निवड समिती प्रमुख पदावरचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वी संपला होता.
    व्यंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन यासारखे उमेदवार या पदाच्या शर्यतीत होते. मात्र मदनलाल, आर.पी. सिंह आणि सुलक्षणा नाईक यांच्या समितीने सुनिल जोशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
  • नवीन निवड समितीसमोर आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिकेसाठी भारतीय संघ निवडण्याचं पहिलं काम असणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या किरॉन पोलार्डचा ट्वेंटी-20 वर्ल्ड रेकॉर्ड :

  • वेस्ट इंडीज ट्वेंटी-20 संघाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा प्रमुख खेळाडू किरॉन पोलार्डने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला.
  • ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणालाही न जमलेला पराक्रम त्यानं श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात नावावर केला.
  • तर वेस्ट इंडिजनं या सामन्यात श्रीलंकेवर 25 धावांनी विजय मिळवून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
  • वेस्ट इंडिजच्या 4 बाद 196 धावांचा पाठलाग करतान श्रीलंकेचा संपूर्ण संघ 171 धावांवर तंबूत परतला.
  • तसेच या सामन्यात पोलार्डनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा पल्ला पार केला. पण, मैदानावर पाऊल टाकताच त्यानं नावावर केलेला विक्रम आतापर्यंत कोणालाही जमलेला नाही.

आयआयटी बॉम्बे देशात अव्वल :

  • क्यूएस वर्ल्ड रँकिंगच्या विषयनिहाय श्रेणीमध्ये मुंबईच्या आयआयटी बॉम्बेने संपूर्ण देशात अव्वल स्थान पटकावले आहे.
  • तर त्यानंतर हा मान आयआयटी दिल्ली आणि आयआयटी खरगपूर यांना मिळाला आहे.
  • 2020 सालची द क्यूएस वर्ल्ड इंजिनीअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची युनिव्हर्सिटी रँकिंग नुकतीच जाहीर करण्यात आली.
  • यामध्ये 2019 वर्षीच्या आपल्या कामगिरीत सुधारणा करत आयआयटी बॉम्बेने जागतिक क्रमवारीत 53 वरून 44 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • तसेच जागतिक क्रमवारीत विषयनिहाय श्रेणीमध्ये पहिल्या 50 मध्ये स्थान मिळविण्यात केवळ आयआयटी बॉम्बे (44) आणि आयआयटी दिल्ली (47) या शैक्षणिक संस्था यशस्वी होऊ शकल्या आहेत.
  • क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटीने जाहीर केलेली रँकिंग ही अधिकृत आणि प्रतिष्ठित मानली जाणारी संस्था आहे. ग्लोबली मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूटऑफ टेक्नॉलॉजी ही संस्था गेली अनेक वर्षे सातत्याने आपले स्थान पहिल्या क्रमांकावर टिकवून आहे.
  • तर क्यूएसच्या या यादीत 85 देशांमधील जगातील अव्वल 1 हजार इन्स्टिट्यूट आहेत. आयआयटी बॉम्बेचा एकूण स्कोर 100 पैकी 49.5 इतका आहे.

मुकेश अंबानी खरेदी करणार अनिल अंबानींची आरकॉम :

  • देशातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) विकत घेणार आहेत.
  • यासंदर्भातल्या आराखड्याला स्टेट बँक ऑफ इंडियानं मंजुरी दिली आहे. यामधून 23 हजार कोटी रुपये मिळतील, अशी आशा कर्जपुरवठा केलेल्या बँकांना आहे. स्टेट बँकेनं रिलायन्स कम्युनिकेशन्सला हजारो कोटींचं कर्ज दिलं होतं.
    तर मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओनं आरकॉमचे टॉवर आणि फायबर बिझनेस (रिलायन्स इंफ्राटेल) खरेदी करण्यासाठी 4700 कोटी रुपयांची ऑफर दिली. यूव्ही असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीनं (UVARC) आरकॉम आणि रिलायन्स टेलिकॉमच्या मालमत्तेसाठी 14700 कोटींची बोली लावली.
  • आरकॉमला भारतीय आणि चीनमधील देणेकऱ्यांचे 4300 कोटी रुपये प्राधान्यानं द्यायचे आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या बोर्डनं आरकॉमच्या ठराव योजनेला मंजुरी दिली आहे. यासंदर्भात देणेकरांच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. आरकॉमवरील सुरक्षित कर्जाची रक्कम 33 हजार कोटींच्या घरात आहे. तर देणेकऱ्यांचा दावा 49 हजार कोटींचा आहे.

IPL 2020 तील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षीस रकमेत कपात :

  • इंडियन प्रीमिअर लीग मध्ये बीसीसीआयने cost-cutting करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यानंतर बीसीसीआयने संघांच्या बक्षीस रकमेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • बीसीसीआयनं आयपीएलमधील संघमालकांना पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये याचा उल्लेख केला आहे. बीसीसीआयनं पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये आयपीएल विजेत्या संघाला 20 एवजी यंदा 10 कोटीच बक्षीस रक्कम मिळणार आहे.
  • तर आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला 10 कोटी बक्षीस म्हणून मिळतील. 2019च्या विजेत्या संघाला 20 कोटी देण्यात आले होते. उपविजेत्या संघाला 12.5 कोटी ऐवजी 6.25 कोटी देण्यात येणार आहेत,” अशी माहिती बीसीसीआयनं पीटीआयला दिली.

WhatsApp चं डार्क मोड फीचर लाँच :

  • गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅपच्या डार्क मोड फीचरची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर व्हॉट्सअ‍ॅपचं हे बहुप्रतिक्षेत फीचर लाँच करण्यात आलं आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी नवनवीन फीचर आणत असतं. आपल्या युजर्ससाठी WhatsApp ने Dark Mode फीचर आणल्याने आता आणखी मजा येणार आहे.
  • कंपनी Android Developers आणि Apple iOS Developers वर Dark Mode फीचरवर काम करत होती. व्हॉट्सअ‍ॅप युजर्स खूप दिवसांपासून या फीचरची वाट पाहत होते. त्यानंतर डार्क मोड फीचर हे आयफोन आणि अँड्रॉयड या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅपचे डार्क फीचर कमी प्रकाशात चांगली व्हिजिबिलिटी देते. त्यामुळे युजर्संच्या डोळ्यांवर फारसा परिणाम होत नाही. कमी प्रकाशात अथवा अंधारात यामुळे व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणं आता सोपं होणार आहे.
  • तसेच गुगल क्रोम (Google Chrome) आणि इतर काही गुगल अ‍ॅप्स (Google Apps) सोबत फेसबुक मेसेंजरने देखील आपल्या प्लॅटफॉर्मवर डार्क मोड फीचरचा समावेश केला आहे.
  • व्हॉट्सअ‍ॅप युजर्स आपल्याला हवं तसा, हवं तेव्हा डार्क मोड फीचरचा वापर करू शकतात. त्यानुसार ऑन, ऑफ कधी करायचं हे ठरवा. डार्क मोडमध्ये बॅकग्राऊंडवर डार्क ग्रे टेक्स्ट दिसतो.
  • अँड्रॉईड 10 आणि आयओएस 13 युजर्स सिस्टमच्या सेटिंगमध्ये जाऊन हे फीचर ऑन करू शकता. तसेच Android फोनचा वापर करत असाल तर आधी तुमचा फोन Android Q च्या बीटा व्हर्जनवर काम करत आहे का हे तपासून घ्या.
  • अनेक Andorid Mobile फोन Android Q च्या लेटेस्ट बीटा व्हर्जनचा वापर करू शकतात. या लिस्टमध्ये गुगल पिक्सलच्या काही स्मार्टफोनचा समावेश आहे.

दिनविशेष:

  • 5 मार्च 1851 रोजी जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
  • 1997 यावर्षी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
  • धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1997 मध्ये जाहीर करण्यात आला.
  • रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत सन 1998 मध्ये आगमन झाले होते.
  • सन 2000 मध्ये कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आला होता.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 मार्च 2020)

Shital Burkule

Shital is very passionate content writer and likes to write about more stuff related to news about education.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago