5 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
5 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 मे 2020)
जपानमधील आणीबाणीची मुदत मेअखेपर्यंत वाढवली :
- जपानमध्ये करोनाचा प्रसार रोखण्यासठी लागू करण्यात आलेली आणीबाणी मे अखेपर्यंत वाढवण्यात आल्याचे पंतप्रधान शिन्झो अॅबे यांनी सांगितले.
- विषाणूचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने 7 एप्रिल रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती, त्याची मुदत वाढवण्यात आली आहे.
- तज्ज्ञांनी सध्याच्या परिस्थितीचा जो अभ्यास केला आहे त्याचा आधार घेत अॅबे यांनी हा निर्णय जाहीर केला असून करोनाच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही ती वाढत आहे, अजूनही रुग्णालयांवर ताण आहे त्यामुळे यापुढेही महिनाभर आणीबाणी लागू राहील असे त्यांनी स्पष्ट केले.
Must Read (नक्की वाचा):
7 मे पासून सरकार परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणणार :
- सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थिती अनेक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक भारतीय अन्य देशांमध्ये अडकले आहे.
- दरम्यान त्यांना टप्प्याटप्प्यानं मायदेशी आणण्याची प्रक्रिया 7 मे पासून सुरू करण्यात येणार आहे.
- तर ज्या नागरिकांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत अशाच लोकांना परत आणण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
- तसंच त्यांना परत आणण्यासाठी विमानं तसंच नौदलाची मदत घेण्यात येणार आहे. परंतु प्रवासाचा खर्च मात्र संबंधित प्रवाशांनाच करावा लागणार आहे.
- भारतात परतल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे.
हिंदू व्यक्तीला पहिल्यांदाच पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट बनण्याचा मान :
- पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी घटना घडली आहे. पाकिस्तानी एअर फोर्समध्ये एका हिंदु व्यक्तीला पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे.
- राहुल देव असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपकार भागात राहणारा आहे. सिंध प्रांतातला हा भाग हिंदु वस्तीसाठी ओळखला जातो.
- पाकिस्तानी एअर फोर्समध्ये काम करणारा राहुल देव हा पहिला हिंदु पायलट म्हणून ओळखला जाणार आहे.
- मात्र एअर फोर्समध्ये पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळालेला राहुल हा पहिलाच हिंदू व्यक्ती ठरणार आहे.
नाकामुराला हरवत कार्लसन अजिंक्य :
- मॅग्नस कार्सलन आयोजित आणि प्रायोजित ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत स्वत: नॉर्वेचा जगज्जेता कार्लसन यानेच बाजी मारली.
- तर त्याने अंतिम फेरीत अमेरिकेच्या हिकारू नाकामुराचा 2.5-1.5 अशा फरकाने पराभव केला.
- तसेच अंतिम फेरी चुरशीची रंगली. चौथ्या डावात नाकामुराला बरोबरी साधण्याची संधी होती. मात्र त्याने ती थोडक्यात गमावली. दोन आठवडय़ांपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेल्या या स्पर्धेत कार्लसनने सुरुवातीपासून प्रभावी खेळ के ला. ही स्पर्धा जिंकण्याचा विश्वास होता, असेही त्याने विजयानंतर सांगितले.
राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही :
- कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
- तसेच शासकीय खर्चाला 67 टक्के कट लावण्यात आला असून, प्रत्येक विभागाला आता त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. शिवाय, नवीन कोणतीही योजना सादर करू नये, असे वित्त विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.
- तर प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
- वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे विभाग प्राधान्य क्रमाचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. या विभागांनी फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे. अन्य विभागांना कोणत्याही खरेदीच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देता येणार नाही.
- तसेच फर्निचर, दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, असे खर्चदेखील आता करता येणार नाहीत. प्राधान्यक्रम नसलेल्या विभागांना, कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना, प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.
- मात्र औषधे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व त्यांचा पुरवठा यांच्या खरेदीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.
ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ आजपासून :
- पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा आज सुरू होत असलेल्या ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
- करोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि चेस डॉट कॉमने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.
- जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत.
- तर चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली.
- तसेच पाचवे मानांकन लाभलेल्या भारतीय संघात आनंदसह विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान, कोनेरू हम्पी आणि डी. हरिकाचा समावेश आहे.
- माजी विश्वविजेता ब्लादिमिर क्रामनिक भारतीय संघाचा सल्लागार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या चीनच्या संघात डिग लीरेन, वांग हाओ, वेई यी आणि चारवेळेचा विश्व विजेता हाऊ यिफान याचा समावेश आहे.
दिनविशेष :
- 5 मे : युरोप दिन
- कुबलाई खान हा 5 मे 1260 मध्ये मंगोलियाचा सम्राट बनला.
- 5 मे 1901 मध्येपं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
- पश्चिम जर्मनीला 5 मे 1955 मध्ये सार्वभौमत्व प्राप्त झाले.
- 5 मे 1964 मध्ये युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिन घोषित केला.