5 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा
5 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2020)
जुलैपर्यंत 25 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल:
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली.
करोना प्रतिबंधक लशीच्या 40-50 कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून 2021च्या जुलैपर्यंत 20-25 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीकरणात करोना साथनियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
लशीचे डोस तयार झाल्यानंतर सर्व राज्यांना योग्य आणि न्याय्य पद्धतीने त्यांचे वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिली.
लसीकरणासाठी प्राधान्य असलेल्या लोकसमूहांच्या याद्या राज्यांनी ऑक्टोबरअखेपर्यंत केंद्राला देणे अपेक्षित आहे.
या याद्यांमध्ये साथ नियंत्रणाच्या आघाडीवर काम करणारे सरकारी आणि खासगी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, आशा कर्मचारी, रुग्ण- संशयित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेणारे, चाचण्या करणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षक आदींचा समावेश असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
लशीच्या 40-50 कोटी मात्रा जुलै 2021पर्यंत उपलब्ध होतील. त्यातून सुमारे 20-25 कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण होईल, असा अंदाज आहे.
लसीकरण मोहिमेच्या नियोजनाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे, असेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.
समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा:
पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन शनिवारी केले, तो समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.
मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे 46 कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.
हा बोगदा 9.02 कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत होता.
पीर पांजाल पर्वतराजीत 3 हजार मीटर म्हणजे 10 हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे.
दक्षिण पोर्टल मनालीपासून 25 कि.मी अंतरावर व 3060 मीटर उंचीवर आहे.
उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ 3071 मीटर उंचीवर आहे. घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला 3300 कोटी रुपये खर्च आला आहे.
परदेशातील टेनिसशी तुलना अशक्य!:
भारतात लिएण्डर पेस, महेश भूपतीसारखे गुणवान टेनिसपटू घडले.
मात्र अजूनही युरोप किंवा अमेरिका खंडातील टेनिसशी तुलना के ल्यास भारताला या खेळात मोठी उंची गाठावी लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूरव राजाने व्यक्त केले.
पुरुष दुहेरीत रामकुमार रामनाथनच्या साथीने कामगिरी उंचावण्याचा प्रयत्न, भारताच्या टेनिसचे भवितव्य आणि सध्याच्या टेनिसपटूंची कामगिरी यांसारख्या विविध आव्हानांबाबत 34 वर्षीय पूरवशी केलेली ही खास बातचीत
ऑक्टोबर महिन्यापासून क्रीडा स्पर्धाचे आयोजन शक्य:
भारतात पुढील वर्षी क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, असा आशावाद के ंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केला.
करोनामुळे मार्च महिन्यापासून देशात एकही क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले नाही.
गेल्या काही आठवडय़ांपासून ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंनी आपल्या सरावाला सुरुवात के ली आहे.
‘ऑक्टोबर महिन्यापासून क्रीडा स्पर्धाचे आयोजन शक्य होईल, असे सुरुवातीला मला वाटत होते, पण देशातील
करोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढतच आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत क्रीडा स्पर्धाचे आयोजन करणे शक्य नाही.
लवकरच करोनावरील लस आल्यानंतर पुढील वर्षीच्या सुरुवातीला क्रीडा स्पर्धाना पुन्हा सुरुवात होईल,’’ असे रिजिजू यांनी सांगितले. सध्या देशात करोनाग्रस्तांची संख्या 64 लाखांच्या वर गेली आहे.
दिनविशेष:
5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
सन 1955 मध्ये पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
मीरासाहेब फातिमा बिबी या सन 1989 मध्ये सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या होत्या.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना सन 1995 जाहीर झाला होता.
सन 1998 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला होता.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.