5 ऑक्टोबर 2021 चालू घडामोडी – Current Affairs

डेव्हिड ज्युलियस ( David Julius)आणि आर्डेन पॅटापोशन ( Ardem Patapoutian

5 October 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (5 ऑक्टोबर 2021)

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर :

  • जगात ‘नोबेल’ पुरस्कार हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा समजला जातो. स्विडन इथल्या नोबेल समितीतर्फे दरवर्षी सहा विविध क्षेत्रासाठी पुरस्कारांची घोषणा केली जाते.
  • सन 2021 चा वैद्यकशास्त्रातील ‘नोबेल’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
  • अमेरिकेतील शास्त्रज्ञ डेव्हिड ज्युलियस ( David Julius)आणि आर्डेन पॅटापोशन ( Ardem Patapoutian) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • तापमान आणि बल यामुळे शरीरात संवदेना जागृत होण्याच्या प्रक्रियेतील मुलभूत संशोधनाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • तापमान आणि यांत्रिक बल यांची जाणीव शरीरामध्ये होत मज्जातंतूमध्ये आवेग तयार होतो, या सर्व प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्द्ल हा पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचं पुरस्काराची घोषणा करतांना नोबेल समितीने म्हंटलं आहे.
  • रॉयल स्वीडिश विज्ञान अकादमीच्या वतीने 1.15 दशलक्ष डॉलर्सचे नोबेल पुरस्कार दरवर्षी दिले जातात.
  • गेल्या वर्षी अमेरिकेचे हार्वे अल्टर आणि चाल्र्स राइस तसेच ब्रिटनचे मायकेल हॉटन यांना हेपॅटाटिस सी विषाणूच्या शोधासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल देण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2021)

जपानच्या पंतप्रधानपदी किशिदा :

  • जपानचे पंतप्रधान म्हणून संसदेने फुमियो किशिदा यांची निवड केली आहे.
  • किशिदा हे योशिहिडे सुगा यांची जागा घेत असून त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे.
  • किशिदा व त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोमवारी झाला. सुगा एक वर्ष अधिकारपदावर होते.
  • माजी परराष्ट्र मंत्री किशिदा हे 64 वर्षांचे असून ते नेमस्त नेते म्हणून प्रसिद्ध आहेत, पण काही वेळा त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. त्यांनी स्थिरता व सलगतेसाठी निवडणुकांचा पर्याय निवडण्याचे निश्चित केले आहे.
  • सुगा यांच्या मंत्रिमंडळातील वीस जणांना बदलण्यात आलेअसून त्यातील तेरा जण प्रथमच मंत्री झाले आहेत.

पाकिस्तानच्या बाबर आझमचा नवा विक्रम :

  • पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी 20 मध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
  • सर्वात वेगाने 7 हजार धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
  • आझमने 187 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.
  • तर या विक्रमासह ख्रिस गेल आणि विराट कोहली यांना मागे टाकलं आहे.
  • ख्रिस गेलने 192 डावात आणि विराट कोहलीने 212 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या आहेत.

राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर :

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर आज बहुप्रतिक्षित अशा राज्यसेवा पूर्व परीक्षा –2021 व मुख्य परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
  • आयोगामार्फत आता 290 पदांसाठी 17 संवर्गात भरती केली जाणार आहे.
  • तसेच, याबाबतची विस्तृत माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
  • या परीक्षासंदर्भात आयोगाने ट्विटद्वारे देखील माहिती दिली असून, त्यानुसार 2 जानेवारी 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
  • पूर्व परीक्षेच्या निकाला आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांसाठी मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी किंवा त्यानंतर आयोजित होण्याची शक्यता आहे.
  • तर या परीक्षेसाठी परीक्षार्थ्यांना आज दुपारी दोन वाजेपासून अर्ज करता येणार आहे. तर, अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे.

नामवंत भारतीयांची परदेशांत गुप्त गुंतवणूक :

  • प्रसिद्ध उद्योगपतींसह विविध क्षेत्रांतील नामवंतांचा ‘पँडोरा पेपर्स’मध्ये समावेश आहे.
  • तर या धनाढय़ भारतीयांनी करसवलत किंवा संपूर्ण करमाफी असलेल्या देशांत गुप्त गुंतवणूक केली.
  • तसेच त्यात माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, उद्योगपती अनिल अंबानी, नीरा राडिया, गांधी कुटुंबीयांचे निष्ठावान दिवंगत सतीश शर्मा आदींचा समावेश आहे.
  • सन 2016 साली अवसायनात गेलेल्या ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्समधील (बीव्हीआय) एका परदेशी कंपनीचे लाभार्थी मालक (बेनिफिशियल ओनर्स) म्हणून सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबियांची नावे पँडोरा पेपर्समध्ये आहेत.

भारतात हायपरलूप सेवेची शक्यता :

  • हायपरलूप ही सार्वजनिक प्रवासी व मालवाहतूक व्यवस्था संयुक्त अरब अमिरातींआधी भारत किंवा सौदी अरेबियात सुरू होईल, असे डीपी वर्ल्ड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलायेम यांनी सांगितले.
  • दुबई एक्स्पो 2020 च्या सहा महिन्यांच्या कार्यक्रमाचे उद्घाटन 1 ऑक्टोबरला झाले. त्या वेळी सुलायेम यांनी सांगितले, की उच्च गती वाहतूक व्यवस्था दशकाअखेरीस जगाच्या अनेक भागांत प्रत्यक्षात येईल.
  • हायपरलूप ही एक बंदिस्त वाहिनीसारखी रचना असते. ती हवेचा फारसा विरोध न होता एका ठिकाणाहून दुसरीकडे फार वेगाने जाते.
  • तर गेल्या वर्षी हायपर लूप पॉडची मानवी प्रवास चाचणी यशस्वी झाली होती. काही दशके नव्हे, तर काही वर्षांत ही सेवा सगळीकडे दिसेल, असे सुलायेम यांनी सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धात ऐतिहासिक रौप्यकमाई :

  • भारताला जागतिक महिला सांघिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत ऐतिहासिक रौप्यपदक जिंकता आले.
  • भारताला यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले.
  • तर अंतिम फेरीत भारताला रशियाकडून 0-2 असा पराभव पत्करावा लागला. मात्र, भारतीय संघाने कोनेरू हम्पीसारखी आघाडीची खेळाडू नसतानाही मिळवलेल्या यशाचा कुंटे यांना अभिमान आहे.

दिनविशेष:

  • 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
  • सन 1955 मध्ये पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
  • मीरासाहेब फातिमा बिबी या सन 1989 मध्ये सर्वोच्‍च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या होत्या.
  • कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना सन 1995 जाहीर झाला होता.
  • सन 1998 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार जाहीर झाला होता.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑक्टोबर 2021)

Dhanshri Patil

Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago