18 भारतीय आणि 4 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्स केले बॅन :
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 4 पाकिस्तानी YouTube चॅनेलसह 22 YouTube चॅनेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली आहे.
तर हे चॅनल राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणासंदर्भात खोट्या बातम्या सतत पसरवत होत्या, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
यासोबतच मंत्रालयाने 3 ट्विटर अकाउंट, 1 फेसबुक पेज आणि 1 वेबसाइटवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धात भारताचा शानदार विजय :
मुमताज खानच्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी मलेशियाला 4-0 अशा फरकाने पराभूत करत ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या साखळी फेरीत अपराजित राहण्याची किमया साधली.
तर आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा शुक्रवारी दक्षिण कोरियाशी सामना होईल.
भारताकडून मुमताजने चमकदार कामगिरी केली.
तसेच‘ड’ गटात भारताने आपले तीनही सामने जिंकत अग्रस्थान मिळवले.
दिनविशेष:
डग्लस एअरक्राफ्ट कंपनीचे निर्माते डोनाल्ड विल्स डग्लस याकॅह यांचा जन्म 6 एप्रिल 1892 मध्ये झाला होता.
भारतीय उद्योजक विष्णू महेश्वर उर्फ व्ही.एम. तथा दादासाहेब जोग यांचा जन्म 6 एप्रिल 1927 रोजी झाला.
सन 1930 मध्ये प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
भारतीय क्रिकेटपटू व प्रबंधक ‘दिलीप वेंगसकर’ यांचा जन्म 6 एप्रिल 1956 रोजी झाला.
भारतीय जनता पक्षाची (BJP) स्थापना 1980 मध्ये झाली व अटल बिहारी वाजपेयी यापक्षाचे पहिले अध्यक्ष झाले होते.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.