6 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

6 August 2018 Current Affairs In Marathi

6 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2018)

इस्रोची चांद्रयान-2 मोहीम लांबणीवर:

  • भारताची चांद्रयान-2 ही महत्त्वाकांक्षी मोहीम पुन्हा लांबणीवर पडली असून ती आता जानेवारीपर्यंत तरी होण्याची शक्यता नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • भारतीय अवकाश संशोधन संस्थेला (इस्रो) या वर्षी दोन वेळा अपयश आल्यानंतर आता या ऑक्टोबरमध्येही ही मोहीम होण्याची शक्यता नाही. सुरुवातीला चांद्रयान-2 एप्रिलमध्येच पार पाडण्याचे जाहीर करण्यात आले होते. पण इस्रोचा जीसॅट 6-ए हा लष्करी संदेशवहन उपग्रह सोडण्यात आला आणि नंतर त्याच्याशी संपर्कच तुटला, त्यामुळे तो वाया गेला. Isro
  • तसेच त्यानंतर फ्रेंच गयानातील कोअरू येथून जीसॅट 11 या उपग्रहाचे उड्डाण होणार होते. पण तेही मागे घेण्यात आले. गेल्या सप्टेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 39 प्रक्षेपकाच्या मदतीने आयआरएनएसएस 1-एच हा उपग्रह सोडण्यात आला. पण उष्णतारोधक आवरण न उघडल्याने तो अपयशी ठरला. इस्रोने त्यानंतर सावध भूमिका घेतली असून दोन अपयशांमुळे चांद्रयान-2 मोहीम लांबणीवर टाकली आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 ऑगस्ट 2018)

अवयवदानात इंग्लंड करणार भारताला सहकार्य:

  • युनायटेड किंग्डम‘ (इंग्लंड) सरकारने अवयवदानाबाबतच्या नव्या नियमाची घोषणा केली. यामध्ये भारतातील गरजू व्यक्तीला इंग्लंड सरकारकडून त्वरीत मदत व्हावी, यासाठी इंग्लंड सरकारकडून अवयवदानाच्या कायद्यात बदल करण्यात येणार आहे. याबाबतचा विचार येथील सरकारकडून करण्यात येत आहे.
  • इंग्लंड सरकारने या निर्णयाची सध्या घोषणा केली आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास 2020 पर्यंत कालावधी लागण्याची शक्यता आहे. या नव्या अंदाजित संमती प्रणालीनुसार, ज्यांना अवयवदान करण्याची इच्छा नाही. अशा लोकांनी त्यांचा निर्णय राज्य-अनुदानित राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) अवयव दाता रजिस्टरकडे (ओडीआर) द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
  • तसेच अवयवदान ही प्रत्येकाची वैयक्तिक इच्छा असेल. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामुळे अत्यंत योग्य भूमिका बजावता येईल, असे इंग्लंडच्या संसदीय राज्य सचिव जॅकी डॉयल-प्राईस यांनी सांगितले.
  • दरम्यान, इंग्लंड सरकारच्या या निर्णयामुळे भारतातील गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून काही औषधांवर बंदी:

  • केंद्रीय आरोग्य मंत्रालय डिकोल्ड टोटल, सॅरिडॉन, फेंन्सेडिल यासारख्या 343 औषधांवर बंदी घालण्याची शक्यता आहे. वेदनाशामक आणि फ्लू शी संबंधित औषधांवर बंदी येण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. ही औषधे फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (FDC) औषधे आहेत असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
  • तसेच या औषधांवर बंदी घातली जावी म्हणून एका केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका उप समितीने शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करून या औषधांवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.
  • सरकारने हा निर्णय घेतला तर पिरामल, मॅक्लिऑड्स, सिपला, ल्युपिन यांसारख्या औषध बनवणाऱ्या कंपन्यांना त्याचा फटका बसणार आहे. कदाचित या कंपन्या सरकारच्या या निर्णयाविरोधात न्यायायलयातही दाद मागू शकतात. Medicine
  • ड्रग टेक्नॉलॉजी अॅडव्हायजरी बोर्ड अर्थात डीटीएबीने दिलेल्या शिफारसींनुसार कोण कोणत्या औषधांवर बंदी घालायची त्याची यादी तयार करण्यात आल्याचे समजते आहे. सुप्रीम कोर्टाने डीटीएबीला सांगितले होते की आरोग्य मंत्रालयाला ही यादी सोपवा की कोणती औषधे रेग्युलेट, रेस्ट्रिक्ट किंवा पूर्ण बंद करायची आहेत. त्यानुसार 343 औषधांची नावे डीटीएबीने दिल्याचे समजते आहे.
  • फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन अर्थात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात यावी असा मुद्दा केंद्राने उपस्थित केला. कंपन्या आणि सरकार यांच्या वादात सुप्रीम कोर्टाने डीटीएबीला औषधांची यादी तयार करण्याची सूचना दिली आहे.

इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयाच्या आठव्या महिला न्यायाधीश:

  • मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश इंदिरा बॅनर्जी यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. इंदिरा बॅनर्जी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश बनणाऱ्या आठव्या महिला न्यायाधीश आहेत.
  • यापूर्वी फातिमा बीवी, सुजाता वी. मनोहर, रूमा पाल, ज्ञान सुधा मिश्रा, राजन प्रकाश देशाई, आर. भानुमति आणि इंदु मल्होत्रा यांनी सर्वोच्च न्यायालयात न्यायधीश म्हणून काम पाहिलेले आहे.
  • 3 ऑगस्ट रोजी राष्ट्रपतींनी दिलेल्या एका अधिसूचनेव्दारा हे सांगण्यात आले आहे की, राष्ट्रपती मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायधीशपदी नियुक्त करत आहेत.
  • दरम्यान, इंदिरा बॅनर्जी यांनी 5 एप्रिल 2017 रोजी मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांनी न्यायमूर्ती संजय किशन कौल यांच्या जागेवर काम पाहिले होते.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढ:

  • गेल्या काही महिन्यांपासून सातव्या वेतन आयोगाकडे डोळे लावून बसलेल्या राज्यातील 19 लाख शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना तब्बल चार हजार कोटी रुपयांची अंतरिम वेतनवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
  • त्यानुसार किमान 25 हजार ते कमाल एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम कर्मचाऱ्यांना गणपतीपूर्वी देण्यात येणार असून, महागाई भत्त्यापोटीची 14 महिन्यांची थकबाकीही दिली जाणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. Mantralaya
  • तसेच दोन चार दिवसांत याची औपचारिक घोषणा केली जाणार असून त्यानंतर मंगळवारपासूनचा आपला नियोजित संपही कर्मचारी मागे घेण्याचे संकेत मिळत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात झालेली बैठकही सकारात्मक झाल्याचे सांगण्यात आले आहे.
  • केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातव्या वेतन आयोगानुसार वेतनवाढ, भत्ते व इतर सुविधा मिळत आहेत. मात्र राज्यातील कर्मचाऱ्यांना अजूनही या वेतन आयोगाची प्रतीक्षा आहे.

दिनविशेष:

  • 6 ऑगस्ट हा जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन तसेच अणुशस्त्र जागृती दिन म्हणून पाळला जातो.
  • 6 ऑगस्ट 1925 हा दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचा स्मृतीदिन आहे.
  • सन 1926 मध्ये ‘जेरट्रूड एडर्ले‘ ही इंग्लिश खाडी पोहुन जाणारी पहिली महिला बनली.
  • 6 ऑगस्ट 1945 रोजी जपान मधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला होता.
  • भारतीय पर्यावरणवादीराजेंद्र सिंग‘ यांचा जन्म 6 ऑगस्ट 1959 रोजी झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2018)

You might also like
1 Comment
  1. gurendra says

    importance notes

Leave A Reply

Your email address will not be published.