6 ऑगस्ट 2022 चालू घडामोडी – Current Affairs
6 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2022)
भारताकडून लवकरच मलेशियाला ‘तेजस’ लढाऊ विमानांचा पुरवठा :
- भारत मलेशियाला 18 ‘तेजस’ लढाऊ विमाने पुरवणार आहे.
- वजनाने हलकी असलेली ही खास भारतीय बनावटीची विमाने आहेत.
- अमेरिकेसह अर्जेटिना, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स हे देशही ‘तेजस’ या एकल इंजिन लढाऊ विमानाच्या (जेट) खरेदीसाठी स्वारस्य दाखवत आहेत.
- तर गेल्या वर्षी भारत सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी विमाननिर्मिती कंपनीस 83 ‘तेजस’ निर्मितीसाठी सहा अब्ज डॉलरचे कंत्राट दिले आहे.
- तसेच त्याचे वितरण 2023 पासून सुरू होणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
व्याजदरांमध्ये RBI कडून अर्ध्या टक्क्याची वाढ :
- भारतीय रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.4 टक्के इतका झाला आहे.
- शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
- तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 16.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4 ते 4.1 टक्के अशी असेल.
भारताच्या मुरली श्रीशंकरने रौप्यपदकाची कमाई :
- लांब उडीत भारताच्या मुरली श्रीशंकरने आव्हानांवर मात करत रौप्यपदकाची कमाई केली.
- राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पुरुष विभागात तब्बल 44 वर्षांनी पदकाला गवसणी घातली.
- तिसऱ्या प्रयत्नात त्याने 7.84 मीटर उडी मारली, तेव्हा श्रीशंकर सहाव्या स्थानावर होता.
- तर श्रीशंकरने 8.08 मीटर उडी मारताना आपले रौप्यपदक निश्चित केले.
पॅरा-पॉवरलिप्टिंग मध्ये सुधीरची सुवर्ण कामगिरी :
- भारताच्या सुधीरने राष्ट्रकुल पॅरा-पॉवरलिप्टिंगमध्ये उच्च वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
- सुधीरने 134.5 गुणांची कमाई करताना स्पर्धा विक्रमासह ही कामगिरी केली.
- आशियाई पॅरा-स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सुधीरने पहिल्या प्रयत्नात 208 किलो वजन उचलले.
- त्यानंतर सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलताना आवश्यक गुण मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
- पोलिओग्रस्त असणाऱ्या सुधीरच्या कामगिरीने भारताचे या स्पर्धेतील पॅरा-विभागातील पदकाचे खाते उघडले गेले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात कुस्तीमध्ये बजरंग, साक्षी, दीपकची सुवर्ण, तर अंशूची रौप्यकमाई :
- भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली.
- ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(65 किलो), दीपक पुनिया (86 किलो) आणि साक्षी मलिक (62 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (57 किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
- बजरंगपाठोपाठ साक्षी मलिकने भारताला कुस्तीमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. सा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात तुलिकाला रौप्य :
- भारताची ज्युडोपटू तुलिका मानने राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी यशासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
- स्कॉटलंडच्या सारा अडिलग्टनने 78 किलो वजनी गटाच्या लढतीत तिचा पराभव केला.
- तुलिकाने एकाच दिवसात दोन लढती जिंकताना अंतिम फेरी गाठली होती.
- अडिलग्टनने पूर्ण ताकदिने तुलिकाला उचलून मॅटवर खाली खेचले आणि लढत संपण्यास 30 सेकंद असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष :
- 6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
- गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.
- 6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
- भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.