भारतीय रिझव्र्ह बँकेने शुक्रवारी रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची वाढ केली आहे. त्यामुळे रेपो रेट 5.4 टक्के इतका झाला आहे.
शुक्रवारी झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये 2022-23 या आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची किंवा जीडीपीची वाढ 7.2 टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपीची वाढ 16.2 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 6.2 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 4.1 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 4 ते 4.1 टक्के अशी असेल.
भारताच्या मुरली श्रीशंकरने रौप्यपदकाची कमाई :
लांब उडीत भारताच्या मुरली श्रीशंकरने आव्हानांवर मात करत रौप्यपदकाची कमाई केली.
राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने पुरुष विभागात तब्बल 44 वर्षांनी पदकाला गवसणी घातली.
तिसऱ्या प्रयत्नात त्याने 7.84 मीटर उडी मारली, तेव्हा श्रीशंकर सहाव्या स्थानावर होता.
तर श्रीशंकरने 8.08 मीटर उडी मारताना आपले रौप्यपदक निश्चित केले.
पॅरा-पॉवरलिप्टिंग मध्ये सुधीरची सुवर्ण कामगिरी :
भारताच्या सुधीरने राष्ट्रकुल पॅरा-पॉवरलिप्टिंगमध्ये उच्च वजनी गटात सुवर्णपदक पटकावले.
सुधीरने 134.5 गुणांची कमाई करताना स्पर्धा विक्रमासह ही कामगिरी केली.
आशियाई पॅरा-स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या सुधीरने पहिल्या प्रयत्नात 208 किलो वजन उचलले.
त्यानंतर सुधीरने दुसऱ्या प्रयत्नात 212 किलो वजन उचलताना आवश्यक गुण मिळवत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पोलिओग्रस्त असणाऱ्या सुधीरच्या कामगिरीने भारताचे या स्पर्धेतील पॅरा-विभागातील पदकाचे खाते उघडले गेले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात कुस्तीमध्ये बजरंग, साक्षी, दीपकची सुवर्ण, तर अंशूची रौप्यकमाई :
भारतीय कुस्तीगीरांनी शुक्रवारी पदकसंख्येत चार पदकांची मोलाची भर घातली.
ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनिया(65 किलो), दीपक पुनिया (86 किलो) आणि साक्षी मलिक (62 किलो) यांनी सुवर्णपदक पटकावले, तर अंशु मलिकला (57 किलो) रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
बजरंगपाठोपाठ साक्षी मलिकने भारताला कुस्तीमधील दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. सा
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धात तुलिकाला रौप्य :
भारताची ज्युडोपटू तुलिका मानने राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी यशासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र तिला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
स्कॉटलंडच्या सारा अडिलग्टनने 78 किलो वजनी गटाच्या लढतीत तिचा पराभव केला.
तुलिकाने एकाच दिवसात दोन लढती जिंकताना अंतिम फेरी गाठली होती.
अडिलग्टनने पूर्ण ताकदिने तुलिकाला उचलून मॅटवर खाली खेचले आणि लढत संपण्यास 30 सेकंद असताना विजयावर शिक्कामोर्तब केले.
दिनविशेष :
6 जून 1674 मध्ये रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला.
गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सची स्थापना 6 जून 1930 मध्ये झाली.
6 जून 1969 मध्ये वि.स. पागे समितीची शिफारस, रोजगार हमी योजनेस सुरुवात झाली.
भारताचे राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलम यांनी 6 जून 2004 रोजी तमिळ शास्त्रीय भाषा म्हणून घोषित केली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.