6 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

6 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 डिसेंबर 2020)

‘सीरम’प्रमुख पूनावाला ‘एशियन ऑफ दी इयर’:

  • सिंगापूरच्या ‘दी स्ट्रेट्स टाइम्स’ या वृत्तपत्राने पुण्यातील सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या लसनिर्मिती संस्थेचे प्रमुख अदर पूनावाला यांचा समावेश जगातील सर्वात मोठे लस उत्पादक म्हणून वर्षांतील सहा महत्त्वाच्या आशियाई व्यक्तींमध्ये केला असून त्यांना ‘एशियन ऑफ दी इयर ’घोषित करण्यात आले आहे.
  • करोनाप्रतिबंधासाठी संशोधन व लस उत्पादनासाठी एकूण सहा जणांची निवड या वृत्तपत्राने केली आहे. अदर पूनावाला हे सीरम इन्स्टिटय़ूटचे प्रमुख असून त्यांनी अ‍ॅस्ट्राझेनेका व ऑक्सफर्ड विद्यापीठ यांनी तयार केलेल्या कोविड लशीचे उत्पादन सुरू केले आहे.
  • तर सन्मान यादीत चीनचे संशोधक झांग योंगझान यांचाही समावेश असून ते व त्यांच्या चमूने सार्स सीओव्ही 2 विषाणूची जनुकीय संकेतावली सर्वप्रथम शोधून काढली.
  • तर या मानकऱ्यांत चीनचे मेजर जनरल चेन वेई, जपानचे डॉ. रुइची मोरिशिटा आणि सिंगापूरचे प्रा. ओई एंग एओंग यांचाही समावेश आहे. त्यांनी लसनिर्मितीत मोठे काम केले आहे. दक्षिण कोरियाचे उद्योगपती सिओ जुंग जिन यांच्या कंपनीने लस तयार करून वितरणाची जबाबदारी घेतली असून त्यांचाही यादीत समावेश आहे. या सर्वाचा उल्लेख ‘व्हायरस बस्टर्स’असा करण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 डिसेंबर 2020)

चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर यशस्वीरीत्या उतरले :

  • चीनची चँग 5 चांद्रमोहीम आतापर्यंतच्या टप्प्यांमध्ये यशस्वी झाली असून अमेरिकेनंतर चांद्रभूमीवर ध्वज लावणारा चीन हा दुसरा देश ठरला आहे.
  • चीनचे चँग 5 हे अवकाशयान चंद्रावर मंगळवारी यशस्वीरीत्या उतरले असून तेथे चीनचा ध्वज यंत्रमानावाच्या बाहूंनी लावण्यात आला.
  • तर हे यान तेथील खडकांचे नमुने गोळा करुन ते पृथ्वीवर आणणार आहे. त्याचे लँडर, ऑर्बिटर,अ‍ॅसेंडर, डिसेंडर असे अनेक भाग आहेत.
  • चीनच्या अवकाश संस्थेने म्हटले आहे,की कुठल्याही ग्रह किंवा उपग्रहावरून पुन्हा पृथ्वीच्या दिशेने यान उडवणारा चीन हा पहिला देश ठरला आहे. चीनने पाठवलेल्या यानातील यांत्रिक बाहूने तेथे चीनचा ध्वज लावण्यात आला असून खडकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत.
  • तसेच त्यातून चंद्रावरील ज्वालामुखी प्रक्रियेचाही अभ्यास केला जाणार आहे. हे खडकाचे नमुने पृथ्वीवर आणले जाणार आहेत. चंद्रावरून खडकाचे नमुने पृथ्वीवर आणणारा अमेरिका, रशिया नंतरचा चीन हा तिसरा देश ठरला आहे.

अमेरिकेत डीएसीए पुन्हा लागू :

  • डेफर्ड अ‍ॅक्शन फॉर चाइल्डहूड अरायव्हल्स (डीएसीए) हा कायदा रद्द करण्याचा ट्रम्प प्रशासनाने 2017 मध्ये घेतलेला निर्णय अमेरिकी न्यायालयाने रद्दबातल केला असून ओबामा काळातील हा कायदा पुन्हा लागू करण्याचा आदेश दिला आहे.
  • तर कागदपत्रे नसलेल्या स्थलांतरित व्यक्तींना त्यामुळे दिलासा मिळाला असून त्यात काही भारतीयांचा समावेश आहे.
  • ट्रम्प प्रशासनाने डीएसीए कायदा 2017 मध्ये रद्द केला होता, पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने जूनमध्येही विरोध केला होता.
  • न्यूयॉर्कमधील पूर्व जिल्ह्यचे न्यायाधीश निकोलस गरॉफिस यांनी अंतर्गत सुरक्षा विभागाला असा आदेश दिला, की डीएसीए कायद्यान्वये संबंधिताना दोन वर्षे वाढवून देण्यात यावीत. लोकांचे स्थलांतर अर्ज स्वीकारण्यास सुरूवात करावी. सोमवारपासून मुदतवाढीचे हे अर्ज स्वीकारण्यात यावेत.

नव्या संसद भवनाचा 10 डिसेंबरला पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा :

  • नव्या संसद भवनाचा भूमिपूजन सोहळा 10 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे.
  • तसेच बिर्ला म्हणाले, “नव्या संसद भवनाची क्षमता ही जुन्या भवनापेक्षा अधिक असून नव्या भवनात एकाच वेळी लोकसभा सदस्यांसाठी सुमारे 888 जागा उपलब्ध असतील तर राज्यसभा सदस्यांसाठी 326 पेक्षा अधिक जागा उपलब्ध असतील. म्हणजेच नव्या संसद भवनात एकूण 1,224 सदस्य एकाचवेळी बसू शकतील.

न्यूझीलंडचा कोरी अँडरसन निवृत्त :

  • न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे. यापुढे कोरी अँडरसन न्यूझीलंड संघाकडून खेळताना दिसणार नाही.
  • तसेच मागील दोन वर्षांपासून अँडरसन एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू शकला नाही.
  • तर निवृत्तीनंतर त्यानं अमेरिकेा टी 20 लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 29 वर्षीय अँडरसन यापुढे कदाचीत अमेरिका संघाकडून आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळू शकतो.
  • अँडरसनने 49 एकदिवसीय, 30 टी 20 आणि 13 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने एकदिवसीय सामन्यात एक हाजर 109 धावा काढल्या आहेत.
  • तर टी-20 मध्ये 285 आणि कसोटीमध्ये 683 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात अँडरसनने न्यूझीलंडकडून सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम केला आहे.

12638 हिऱ्यांची अंगठी गिनीज बुकमध्ये :

  • एका 25 वर्षीय ज्वेलरने हिऱ्याची अशी अंगठी बनविली आहे ज्यामुळे त्याचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले गेले आहे.
  • तर या तरुणाने फुलाच्या आकाराच्या अंगठीत 12,638 छोटे हिरे जोडले आहेत.
  • तसेच या अंगठीला मेरीगोल्ड असे नाव देण्यात आले आहे. याचे वजन जवळपास 165 ग्राम आहे.
  • यापूर्वी ज्या अंगठीने सर्वाधिक हिरे असण्याचा रेकॉर्ड केला होता तीही भारतीयाने तयार केली होती. त्या अंगठीत 7801 हिरे लावण्यात आले होते.

दिनविशेष:

  • 6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.
  • भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.
  • संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
  • पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.
  • सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.