6 December 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 डिसेंबर 2022)
भारत-जर्मनीदरम्यान गतिशीलता भागीदारी करार :
भारत आणि जर्मनीने सोमवारी उभय देशांतील नागरिकांना दोन्ही देशांत शिक्षण, संशोधन व काम करण्यास सुलभता येण्यासाठी उपयोगी स्थलांतर गतिशीलता भागीदारी करारावर (मायग्रेशन अॅण्ड मोबिलिटी पार्टनरशिप अॅग्रिमेंट) स्वाक्षरी केली.
या वेळी उभय देशांतील परराष्ट्रमंत्र्यांत भारत-प्रशांत महासागरीय प्रदेशातील देशांचे प्रश्न, युक्रेन संघर्ष, अफगाणिस्तानातील परिस्थिती, पाकिस्तानशी संबंधित मुद्दे आणि सीरियातील परिस्थिती यांसह प्रादेशिक आणि जागतिक मुद्दय़ांवर विचारविनिमय झाला.
ऊर्जा, व्यापार आणि हवामान बदलासह द्विपक्षीय सहकार्य वाढविण्यावरही या वेळी चर्चा झाली.
भारताने जी-20 गटाचे अध्यक्षपद चार दिवसांपूर्वी स्वीकारले.
या पार्श्वभूमीवर बेयरबॉक दोन दिवसांच्या दौऱ्यावर सोमवारी भारतात आल्या आहेत.
फ्रान्सचा स्टार खेळाडू किलियन एमबाप्पे उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून प्रत्येक सामन्यात नवनवीन विक्रम करत आहे.
फिफा विश्वचषक 2022 च्या प्री-क्वार्टर फायनल सामन्यात, त्याने पोलंडविरुद्ध दोन गोल केले आणि आपल्या संघाला 3-1 ने विजय मिळवून दिला.
या विजयासह फ्रेंच संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आणि एमबाप्पेने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
त्याने फिफा विश्वचषकात गोल करण्यात रोनाल्डोला मागे टाकले आणि मेस्सीची बरोबरी केली.
याशिवाय एमबाप्पेने पेलेचा विक्रमही मोडला.
तो या विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आहे आणि त्याने पेलेचा 60 वर्ष जुना विक्रमही मोडला आहे.
वयाच्या 24व्या वर्षी तो फिफामध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला आहे.
यासोबतच त्याने मॅराडोना आणि पेलेसारख्या दिग्गजांनाही मागे टाकले आहे.
‘सिटी ऑफ जॉय’चे लेखक डॉमिनिक लापिएर यांचे निधन :
कोलकाता शहरानजीकच्या मुर्दाड वस्त्यांतील जगण्याच्या विविधांगी विरोधाभासाची कहाणी ‘सिटी ऑफ जॉय’मधून मांडणारे लेखक, भटके पत्रकार आणि सामाजिक दातृत्वाचा मोठा ठसा उमटविणारे फ्रेंच साहित्यिक डॉमिनिक लापिएर यांचे वृद्धापकालाने निधन झाले.
त्यांनी दिलेल्या सामाजिक योगदानाबद्दल भारत सरकारतर्फे 2008 साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
‘फ्रिडम अॅट मिडनाईट’, ‘इज पॅरिस बर्निग’, ‘फाइव्ह पास्ट मिडनाईट इन भोपाल’ ही सहलेखक म्हणून लिहिलेली त्यांची पुस्तके प्रचंड गाजली.
मात्र त्यांची जगभर ओळख झाली ती कोलकाता शहराला केंद्र करून येथील गरिबी, हलाखीच्या जगण्यात आनंद शोधणाऱ्या व्यक्तींवरच्या ‘सिटी ऑफ जॉय’ कादंबरीमुळे.
शफाली युवा महिला संघाची कर्णधार :
सलामी फलंदाज शफाली वर्मा दक्षिण आफ्रिकेत 14 ते 29 जानेवारीदरम्यान होणाऱ्या ‘आयसीसी’ 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सोमवारी घोषित करण्यात आलेल्या 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
अखिल भारतीय महिला निवड समितीने 19 वर्षांखालील महिला ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धेशिवाय 17 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेच्या 19 वर्षांखालील संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या आगामी द्विपक्षीय मालिकेसाठीही संघाची निवड केली.
19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत 16 संघ सहभाग नोंदवणार असून भारत दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि स्कॉटलंडसह ड-गटात आहे.
6 डिसेंबर हा दिवस ‘महापरिनिर्वाण दिन‘ म्हणून पाळला जातो.
भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचा जन्म 6 डिसेंबर 1732 मध्ये झाला होता.
संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार हरप्रसाद शास्त्री यांचा जन्म 6 डिसेंबर 1853 मध्ये झाला.
पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक कमलेश्वर यांचा जन्म 6 डिसेंबर 1932 मध्ये झाला.
सन 1971 मध्ये भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
सन 1981 मध्ये डॉ.एस.झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली होती.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.