6 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2019)
स्मृती मंधानाला ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान:
- ICC च्या महिला फलंदाजांच्या जागितक क्रमवारीत नुकतेच अव्वल स्थान पटकावणाऱ्या भारताच्या स्मृती मंधानला मानाच्या ‘फोर्ब्स’च्या यादीत स्थान मिळाले आहे.
- फोर्ब्सकडून भारतातील ’30 अंडर 30′ अशी एक यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत स्मृतीला स्थान देण्यात आले आहे.
- तसेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक कमावणारी हिमा दास, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारा नीरज चोप्रा यांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- फोर्ब्स इंडियाच्या ’30 अंडर 30’चे हे सहावे वर्ष आहे. या यादीमध्ये खेळाडूबरोबर मनोरंजन क्षेत्र, मार्केटिंग अशा एकूण 16 क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला आहे.
- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताने 2-1 अशा विजय मिळवला आणि स्मृतीने मालिकावीराचा पुरस्कार जिंकला. स्मृतीने 2018 वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत 15 वन-डे सामन्यांत दोन शतक आणि 8 अर्धशतक झळकावली.
- तर ICCच्या क्रमवारीत स्मृतीने (751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसऱ्या स्थानावर आहे.
हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारत पुन्हा उत्सुक:
- पुढील हॉकी विश्वचषकाच्या आयोजनासाठी भारताने पुन्हा एकदा दावेदारी पेश केली आहे. 13 ते 29 जानेवारी 2023 मध्ये होणाऱ्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनाच्या शर्यतीत एकूण सहा देश असल्याचे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने (एफआयएच) जाहीर केले.
- भारताने 2023 साली होणाऱ्या पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धासाठी आपला दावा केला आहे. मात्र या स्पर्धासाठी सध्या तरी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे देश आघाडीवर आहेत.
- भारताने गतवर्षी झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद भूषवले होते. भुवनेश्वर येथे झालेल्या या विश्वचषकात भारतीय संघ लवकर बाहेर पडल्याने भारतीय हॉकीप्रेमींची निराशा झाली होती.
- तसेच पुढील विश्वचषकासाठी अन्य दावेदारांमध्ये स्पेन, मलेशिया आणि जर्मनी या देशांचा समावेश आहे.
इस्त्रोकडून GSAT-31 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण:
- भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-31चे (GSAT-31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने आज (6 फेब्रुवारी) पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
- प्रक्षेपणाच्या 42व्या मिनिटानंतर 3 वाजून 14 मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत.
- एरियनस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-31 सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह 1/ हेलास उपग्रह 4 यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत.
- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन 2535 किलोग्रॅम आहे. जीसॅट-31 40वा संदेशवाहक उपग्रह आहे. यामुळे भू-स्थैतिक कक्षेत कू-बँड ट्रान्सपाँडर क्षमता वाढवेल. जीसॅट-31 चा कार्यकाळ 15 वर्षे आहे.
- तसेच जीसॅट-31 आता भारताचा जुना संदेशवाहक उपग्रह इनसॅट-4 सीआरची जागा घेईल. प्रक्षेपणात कोणतीच समस्या आली नाही.
महाराष्ट्राचा अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीपासून:
- महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 फेब्रुवारीपासून मुंबईत सुरू होत असून ते 2 मार्चपर्यंत चालणार आहे.
- तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाजाचे दिवस केवळ सहाच असतील. अंतरिम अर्थसंकल्प 27 फेब्रुवारीला विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार तर राज्यमंत्री दीपक केसरकर विधान परिषदेत सादर करणार आहेत.
- तसेच या अधिवेशनामध्ये राज्यातील दुष्काळावर चर्चा होणार आहे. विधानसभेत प्रलंबित असलेली सहा विधेयकेही याच अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत. विधान परिषदेतही एक प्रलंबित विधेयक मांडले जाईल.
आता पीएच.डी.साठी यूजीसीची नवी कार्यपद्धती:
- यंदा विद्यापीठाकडून घेण्यात आलेल्या आॅनलाइन पीएच.डी. परीक्षेसाठी तब्ब्ल 6168 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातच आता 16 डिसेंबर 2018 च्या यूजीसीच्या परिपत्रकाप्रमाणे 70 टक्के लेखी परीक्षेतील गुण आणि 30 टक्के तोंडी परीक्षेतील गुण यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने पीएच.डीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविण्याचे पत्रक जारी केले आहे. यामुळे पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.
- यापूर्वी पीएच.डी. परीक्षेच्या पद्धतीप्रमाणे लेखी परीक्षेत 50 टक्के गुण मिळविलेले विद्यार्थीच पीएच.डीच्या पुढील स्तरासाठी म्हणजेच तोंडी परीक्षेसाठी पात्र ठरत होते. मात्र 16 डिसेंबरच्या यूजीसीच्या परिपत्रकाप्रमाणे 70 टक्के लेखी परीक्षेतील गुण आणि 30 टक्के तोंडी परीक्षेतील गुण लक्षात घेऊन पीएच.डीसाठी विद्यार्थ्यांची पात्रता ठरविली जावी असे निश्चित केले आहे. मात्र मुंबाई विद्यापीठाकडून जारी केलेल्या परिपत्रकात अशा प्रकारच्या सूचना नमूद केल्या नव्हत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता.
- विद्यार्थी हित लक्षात घेता परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना यूजीसीच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे पात्र ठरवत दिलासा द्यावा, अशा मागणीचे पत्र मनविसेने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांना दिले होते.
- मुंबई विद्यापीठाने अद्याप पीएच.डीसाठी निकाल जाहीर केला नसल्याने यूजीसीच्या नव्या नियमांचा अवलंब करावा, अशी मागणी मनविसेचे राज्य उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे यांनी केली होती.
- अखेर विद्यार्थी हित लक्षात घेता यूजीसीच्या नियमांचे पालन करणे क्रमप्राप्त असल्याचे सांगत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाचे नवीन संचालक विनोद पाटील यांनी परिपत्रक जारी केले.
दिनविशेष:
- आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.
- सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.
- कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
Please sir add me on your what's app group