6 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
6 February 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 फेब्रुवरी 2020)
राम मंदिराच्या निर्मितीसाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना :
- सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अयोध्येत राम मंदिर उभारण्याचा मार्ग यापूर्वीच मोकळा झाला असला तरी केंद्र सरकारच्या एका योजनेमुळे आता या कामालाही वेग येणार आहे.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या ट्रस्टच्या स्थापनेला मंजुरी देण्यात आली.
- तर त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत याबाबत माहिती दिली.
- तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अयोध्येतील राम जन्मभूमीच्या एकूण 67.70 एकर जमिनीवर आता रामलल्लाचा हक्क आहे. त्यामुळे केंद्र सरकारने राम जन्मभूमीवर भव्य मंदिराच्या निर्माणासाठी आणि यासंबंधी इतर विषयांवर काम करण्यासाठी बृहद कार्यक्रम तयार केला आहे.
- त्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ नवानं ट्रस्टची स्थापना करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. या ट्रस्टला राम जन्मभूमीवर भव्यदिव्य मंदिर उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार असतील. तसेच सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाद्यावरे गहन विचार आणि चर्चा करुन सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सहमती दिली आहे.
- भव्य राम मंदिराच्या उभारणीनंतर भविष्यात इथे येणाऱ्या भक्तांची संख्या लक्षात घेता सोयी-सुविधा अपुऱ्या पडू नयेत यासाठी एकूण 67.7 एकर जमीन ज्यामध्ये आतल्या आणि बाहेरच्या अंगणाचा समावेश राम जन्मभूमी तीर्थक्षेत्रासाठी हस्तांतरीत केली जावी, असा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
Must Read (नक्की वाचा):
‘या’ मुस्लीमबहुल देशात सुरू झाले पहिले हिंदू विश्वविद्यापीठ :
- इंडोनेशिया या मुस्लीमबहुल देशामध्ये पहिले हिंदू विश्वविद्यापीठ सुरु झाले आहे.
- इंडोनेशियाची राजधानी बालीमधील डेनपसार येथे हे विश्वविद्यापीठ सुरू झाले असून सुग्रीव असे नाव या विद्यापीठाचे ठेवण्यात आले आहे.
- तर देशातील प्रसिद्ध धार्मिक नेते ‘आयगुस्ती बागस सुग्रीव'(I Gusti Bagus Sugriwa)यांच्या नावावरुन ‘आयगुस्ती बागस सुग्रीव स्टेट हिंदू युनिव्हर्सिटी’ असं नाव ठेवण्यात आलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोओ विदोडो यांनी या विश्वविद्यापीठाचे उद्घाटन केले.
- तसेच पहिले या विश्वविद्यापीठाचे नाव हिंदू धर्म स्टेट इंस्टीट्यूट होते. पण, ‘मुस्लीमबहुल देशात ‘आय गुस्ती बागस सुग्रीव’ यांनी हिंदू धर्मासाठी केलेले काम, त्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीबाबत असलेली जाणीव आणि त्यांची हिंदू धर्माची नीतिमत्ता याबाबत अधिकांश जणांना माहिती मिळावी’ यासाठी विडोडो प्रशासनाने विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे.
- 1993 मध्ये हिंदू धर्म अध्यापन करण्यासाठी स्टेट अकादमीच्या धर्तीवर ही संस्था सुरु झाली होती. 1999 मध्ये त्याचे हिंदू रिलीजन स्टेट कॉलेजमध्ये परिवर्तन झाले आणि 2004 मध्ये ते आयएचडीएनमध्ये बदलले गेले होते. गेल्या शुक्रवारी संस्थेच्या अधिकृत वेबसाईटवर संस्थेचे नवे स्टेट्स जाहीर केले गेले आहे.
विराट कोहलीने मोडला ‘दादाचा’ विक्रम :
- न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी करत 347 धावांचा डोंगर उभा केला.
- श्रेयस अय्यरने शतक झळकावत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
- तर त्याने 107 चेंडूत 11 चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने अय्यरने 103 धावा केल्या. त्याला लोकेश राहुल आणि विराट कोहलीने अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. लोकेश राहुलने नाबाद 88 तर विराट कोहलीने 51 धावा केल्या.
- विराट कोहलीने अर्धशतकी खेळीदरम्यान, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा विक्रम मोडला. कर्णधार या नात्याने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट आता तिसऱ्या स्थानी पोहचला आहे. त्याने गांगुलीचा 5 हजार 82 धावांचा विक्रम मोडला.
वाढवणमध्ये प्रमुख बंदर उभारण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी :
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील डहाणूजवळ असलेल्या वाढवण येथे बंदर उभारण्यास मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
- प्रकल्पाचा एकूण खर्च 65,544.54 कोटी इतका येण्याची शक्यता आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
तसेच वाढवणमध्ये होणारे बंदर हे भारतातले सर्वात मोठे बंदर ठरणार आहे. या बंदराला तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे. - तर वाढवण बंदरातून कंटेनरची 90 टक्के वाहतूक होणार आहे. वाढवण बंदरातून संपूर्ण देशात माल वितरीत होणार आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.
- कंटेनर जहाजांचा आकार सातत्याने वाढत असल्याने भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टी परिसरात खोल ड्राफ्ट कंटेनर पोर्ट विकसित करणं आवश्यक आहे.
- मूल्यवर्धित उत्पादन क्षेत्राच्या पार्श्वभूमीवर कार्गोच्या वाढत्या कंटेनरायझेशनमुळे उत्पादन प्रक्रिया सुलभ करणं आवश्यक आहे. मूल्यवर्धित आणि आयात-निर्यात हाताळण्यासाठी आपल्या बंदर सुविधा तयार करणं महत्त्वाचं होतं. त्यातूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
न्यूझीलंडच्या भूमीवर श्रेयस अय्यरने घडवला इतिहास :
- टी-20 मालिकेत 5-0 ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाने वन-डे मालिकेची सुरुवातही धडाकेबाज पद्धतीने केली.
- मुंबईकर श्रेयस अय्यरने केलेल्या शतकी खेळाच्या जोरावर भारताने हॅमिल्टन वन-डे सामन्यात 347 धावांपर्यंत मजल मारली. श्रेयस अय्यरने सर्वात आधी विराट कोहली आणि त्यानंतर लोकेश राहुलच्या साथीने भागीदारी रचत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.
- तर श्रेयस अय्यरने 103 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 11 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
- तसेच अय्यरच्या या शतकाने तब्बल 32 वर्षांनी न्यूझीलंडच्या भूमीवर भारतीय फलंदाजाने अनोख्या विक्रमाची नोंद केली.
- 1988 साली मोहिंदर अमरनाथ यांनी न्यूझीलंडविरुद्ध 102 धावांची खेळी केली, त्यानंतर श्रेयस अय्यरने 103 धावांची खेळी केली.
राहुलने धोनीचा विक्रम मोडला :
- श्रेयस अय्यरची शतकी खेळी आणि त्याला विराट-लोकेश राहुलने दिलेली उत्तम साथ या जोरावर भारताने पहिल्या वन-डे सामन्यात 347 धावांपर्यंत मजल मारली आहे.
- तर अय्यरने 103 धावांची खेळी करत भारताला मोठी धावसंख्या उभारुन दिली.
- तसेच याव्यतिरीक्त मधल्या फळीत यष्टीरक्षणाची भूमिका सांभाळणाऱ्या लोकेश राहुलनेही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. 64 चेंडूत राहुलने 3 चौकार आणि 6 षटकारांसह 88 धावा केल्या. या खेळीदरम्यान राहुलने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला.
- न्यूझीलंडमध्ये वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षकाचा मान आता राहुलला मिळाला आहे. त्याने धोनीचा 85 धावांचा विक्रम मोडीत काढला.
पुणे विद्यापीठाचा युवा पुरस्कार जाहीर :
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे युवा गौरव पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
- पुरस्कराचे हे पहिले वर्ष असून हा पुरस्कार क्रिकेटर केदार जाधव, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि युवा नाटककार धर्मकिर्ती सुमंत यांना जाहीर करण्यात आला आहे हे पुरस्कार विद्यापीठाच्या वर्धापनदिनी (10 फेब्रुवारी) वितरित केले जाणार आहेत.
- तर मानपत्र व 25 हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठातर्फे या वर्षापासून हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे.
- तसेच कला, क्रीडा, साहित्य, संशोधन व सामाजिक या क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी करणाऱ्या व 40 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या माजी विद्यार्थ्यांना हा पुरस्कार जाहीर केला जातो.
- हा पुरस्कार एका वर्षी जास्तीत जास्त चार युवकांना जाहीर केला जातो. या वर्षीच्या, पहिल्याच पुरस्कारासाठी जाधव, बर्वे व सुमंत यांची निवड करण्यात आली आहे.
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या तिन्ही माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कार्य केले आहे. त्यांनी स्वत:बरोबरच विद्यापीठाचे नावही उंचावले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेणे विद्यापीठाचे कर्तव्यच आहे. त्यामुळेच हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे, असे कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी सांगितले.
दिनविशेष:
- आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.
- सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. 1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.
- कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा