6 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

शार्लेट एडवर्ड्स
शार्लेट एडवर्ड्स

6 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 फेब्रुवारी 2023)

138 बेटिंग आणि 94 कर्ज देणाऱ्या ॲप्सवर बंदी:

  • मोदी सरकारने पुन्हा एकदा चीनवर डिजिटल स्ट्राईक केला आहे.
  • कर्ज देणाऱ्या आणि ऑनलाईन बेटिंग ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
  • इलेक्ट्रॉनिक आणि माहिती प्राद्योगिकी मंत्रलयाने या ॲप्सवर कारवाई केली आहे.
  • भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेला बांधा निर्माण होत असल्याचा आरोप करत 138 ऑनलाईन जुगाराचे आणि ऑनलाईन कर्ज देणाऱ्या 94 ॲप्सवर बंदी घालण्यात आली आहे.
  • आयटी ॲक्टच्या कलम 69 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
  • एएनआयने माहिती दिल्यानुसार केंद्रीय गृहखात्याने या आठवड्यात केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि प्रसारण (MeitY) मंत्रालयाला या ॲप्सवर बंदी घालण्यासंबंधीचा प्रस्ताव दिला होता.

शताब्दी वर्षांनिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी:

  • विदर्भ साहित्य संघाला 100 वर्षे पूर्ण झालीत.
  • यानिमित्त विदर्भ साहित्य संघास दहा कोटी रुपये राज्य शासनातर्फे दिले जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.
  • 96 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात रविवारी सकाळी ते बोलत होते.

शार्लेट एडवर्ड्सवर मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी:

  • भारताची माजी दिग्गज गोलंदाज झुलन गोस्वामी आगामी महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या पहिल्या पर्वामध्ये मुंबई इंडियन्स संघाची प्रेरक आणि गोलंदाजी प्रशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावणार आहे.
  • तसेच इंग्लंड संघाची माजी कर्णधार शार्लेट एडवर्ड्सची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • त्याचप्रमाणे भारताची माजी अष्टपैलू देविका पळशीकर फलंदाजी प्रशिक्षक असेल.
  • तर, तृप्ती चंदगडकर भट्टाचार्य या व्यवस्थापक म्हणून काम पाहतील.

दिनविशेष:

  • आधुनिक राष्ट्रकवी रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीपरामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1915 रोजी झाला होता.
  • सन 1918 मध्ये 30 वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
  • 1928 या वर्षा पासून मध्ये हे वय 21 करण्यात आले.
  • कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने सन 1932 मध्ये बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या होत्या.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.