6 जानेवारी 2021 चालू घडामोडी – Current Affairs
6 January 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 जानेवारी 2021)
कराटेपटू रोहित भोरे यांची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स :
- वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन यांच्या 2020 च्या पुस्तकामध्ये कराटेपटू रोहित भोरे यांची नोंद झाली आहे.
- तर याची दखल घेऊन ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, यांनी त्याचे अभिनंदन करुन भोरे यांना प्रमाणपत्र दिले आहे.
- सन 2018 व 2019 वर्षा मध्ये पाच हजारपेक्षा अधिक बृहन्मुंबई महानगरपालिका (बी.एम.सी) मॅनिंग मोपिंग स्वच्छता कामगारांना फिटनेस, नैराश्य व चिंतामुक्त, नशा मुक्ती, सेल्फ डिफेन्स, योग्य आहार करीता दिलेले प्रशिक्षणसाठी त्याचबरोबर 800 पेक्षा अधिक शालेय, महाविद्यालय मुलींना, अनाथ मुले, मुलींना मोफत कराटे मार्शल आर्ट या कलेचे प्रशिक्षण दिल्या बदल.
- तसेच कराटे या क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट असे राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय, आशिया, विश्व् व लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स करून महाराष्ट्र राज्याचे व भारत देशाचे नाव कराटे क्रीडा प्रकारात उंचावल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन यांनी 2020च्या पुस्तकामध्ये रोहित भोरे यांच्या नावाची नोंद ही “कराटे एक्स्पर्ट” म्हणून केलेली आहे.
Must Read (नक्की वाचा):
बँक ऑफ बडोदाने सुरू केली व्हॉट्सअॅप बँकिंग सेवा :
- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅपवरबँकिंग सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
- बँक ऑफ बडोदा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून अकाउंट बॅलन्सची माहिती, मिनी स्टेटमेंट, चेक स्टेटस माहिती, चेकबुकसाठी विनंती, डेबिट कॉर्ड ब्लॉक करणे आणि उत्पादने व सेवांविषयी माहिती उपलब्ध केली जाणार आहे.
- बँकिंग सेवा मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर चोवीस तास उपलब्ध असतील. तर यासाठी अतिरिक्त अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्याची आवश्यकता नाही.
- तसेच, जे लोक बँकेचे ग्राहक नाहीत, ते सुद्धा या प्लॅटफॉर्मद्वारे बँकेची उत्पादने, सेवा, ऑफर, एटीएम आणि शाखांविषयी माहिती घेऊ शकतात.
‘सेंट्रल व्हिस्टा’चा मार्ग मोकळा :
- नवे संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प) उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने दोन विरुद्ध एक अशा बहुमताने प्रकल्प उभारणीस हिरवा कंदील दाखवला.
- तर या प्रकल्पाला मिळालेली पर्यावरणविषयक परवानगी आणि प्रकल्प उभारणीसाठी जमिनीच्या वापराबाबत प्रसृत करण्यात आलेली अधिसूचना वैध असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
- केंद्र सरकारने ‘डीडीए’कायद्याचा वापर करून या प्रकल्पासाठीच्या जमिनीच्या वापरासंबंधी केलेले बदल योग्य आहेत. त्याचा 20 मार्च 2020 रोजीच्या अधिसूचनेत उल्लेख होता.
- तसेच पर्यावरणविषयक परवानगीची तज्ज्ञ समितीने केलेली शिफारस आणि त्यानुसार पर्यावरण मंत्रालयाने घेतलेला निर्णयही योग्य आहे, असे या निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले.
- सरकारने सप्टेंबर 2019 मध्ये ‘सेंट्रल व्हिस्टा’प्रकल्पाची घोषणा केली होती. हा प्रकल्प ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे नियोजन आहे.
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून :
- मंत्रिमंडळाच्या संसदीय कामकाज समितीने (सीसीपीए) 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी शिफारस केली आहे.
- त्यामुळे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 29 जानेवारीपासून सुरू होईल. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन दोन भागात असेल.
- तर पहिला भाग 29 जानेवारीपासून सुरू होऊन 15 फेब्रवारी पर्यंत चालेल व दुसरा भाग 8 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत असेल.
- तर, केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रवारी रोजी सादर केला जाईल.
- तसेच 29 जानेवारी रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. या अधिवेशन काळात करोनाशी निगडीत सर्व नियमांचे पालन केले जाणार आहे.
दिनविशेष :
- 6 जानेवारी – पत्रकार दिन.
- 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- 6 जानेवारी 1673 मध्ये कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.
- सॅम्युअल मॉर्स यांनी 6 जानेवारी 1838 मध्ये तारयंत्राचा शोध लावला.
- 6 जानेवारी 1992 मध्ये न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले.