6 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
6 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (6 जानेवारी 2023)
अयोध्येत उभे राहणार ‘महाराष्ट्र भवन’:
- अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा द्यायला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तयारी दर्शवली आहे.
- त्यामुळे अयोध्येत महाराष्ट्र भवन बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत.
- यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योगी आदित्यनाथ यांच्याकडे अयोध्येमध्ये ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याची मागणी केली.
- या मागणीला योगी आदित्यनाथ यांनी तत्वतः मंजुरी दिली.
Must Read (नक्की वाचा):
गोव्यातील नव्या मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर पहिले विमान:
- पणजी येथील मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सकाळी पहिले प्रवासी विमान उतरले.
- याबरोबरच गोव्यातील या नव्या विमानतळाचे औपचारिक कामकाज सुरू झाले.
- हैदराबाद येथून 179 प्रवाशांना घेऊन आलेले इंडिगोचे विमान उत्तर गोव्यातील मोपा येथील नव्या विमानतळावर सकाळी नऊ वाजता पोहोचले.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी नव्या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले होते.
- या विमानतळाला माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे नाव देण्यात आले आहे.
‘यूजीसी’ची नियमावली:
- परदेशातील नामांकित किंवा जागतिक क्रमवारीनुसार अव्वल 500 विद्यापीठांसाठी भारतातील शैक्षणिक बाजारपेठेची दारे आता पूर्णपणे उघडली आहेत.
- भारतातील विद्यापीठांसाठी असलेले नियम, आरक्षण, शुल्कनियमन परदेशी विद्यापीठांना लागू होणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने गुरुवारी स्पष्ट केले.
- विद्यापीठ अनुदान आयोगाने नियमावलीचा अंतरिम मसुदा तयार केला असून, त्यावर आलेल्या सूचना, हरकतींचा विचार करून तो या महिनाअखेरीस अंतिम केला जाणार आहे.
- सध्या साधारण 18 लाख भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत.
- परदेशांतील विद्यापीठांकडे धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतात राहूनच परदेशी विद्यापीठांत शिकण्याची मुभा येत्या काळात मिळू शकेल.
- विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये स्थान मिळवणाऱ्या विद्यापीठांना भारतात केंद्र किंवा शाखा सुरू करता येईल.
- सर्वसाधारण क्रमवारी, विद्याशाखानिहाय किंवा विषयनिहाय क्रमवारी यापैकी कोणत्याही क्रमवारीत पहिल्या 500 विद्यापीठांमध्ये स्थान असलेली विद्यापीठे त्यासाठी पात्र असतील.
- त्याचप्रमाणे क्रमवारीत सहभागी न होणारी नामांकित विद्यापीठेही पात्र ठरतील. प्रवेश प्रक्रिया, शुल्क ठरवण्याचे अधिकार विद्यापीठांकडेच राहतील.
- त्यावर आयोगाचे किंवा इतर अधिकार मंडळांचे कोणतेही नियंत्रण राहणार नाही.
- मात्र, भारतात विद्यापीठांना प्रत्यक्ष वर्ग भरवावे लागतील.
- ऑनलाइन किंवा दूरशिक्षण वर्ग सुरू करण्यास आयोगाने मज्जाव केला आहे.
दासुन शनाकाने झंझावाती अर्धशतकाद्वारे रचला मोठा विक्रम:
- श्रीलंका आणि भारत संघांत तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी पार पडला.
- या सामन्यात श्रीलंका संघाने भारतावर 16 धावांनी विजय मिळवला.
- त्याचबरोबर मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.
- या विजयात कर्णधार दासुन शनाकाने महत्वाची भूमिका बजावली.
- त्याने आपल्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर दोन मोठे विक्रम केले.
- शनाकाने आपल्या झंझावाती अर्धशतकाद्वारे दोन मोठे विक्रम केले.
- तो श्रीलंकेसाठी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणारा क्रिकेटपटू ठरला आहे.
- त्याने माजी दिग्गज फलंदाज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा यांना मागे टाकले आहे, ज्यांनी आतापर्यंत श्रीलंकेसाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रम केला आहे.
आयसीसी क्रमवारीत इशान किशनची मोठी झेप:
- भारताचा सलामीवीर इशान किशनने 10 क्रमांकांनी झेप घेत 23व्या स्थानावर झेप घेतली आहे, तर दीपक हुड्डाने गुरुवारी जारी केलेल्या टी20 फलंदाजांच्या नुकत्याच जाहीर केलेल्या आयसीसी क्रमवारीत पुन्हा टॉप-100 मध्ये प्रवेश केला आहे.
- मंगळवारी मुंबईत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताने दोन धावांनी विजय मिळविला.
- पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात त्यांच्या प्रभावी कामगिरीनंतर दोघांनीही चार्टमध्ये वरच्या दिशेने वाटचाल केली.
- हुडाने 23 चेंडूत नाबाद 41 धावा केल्यानंतर 40 क्रमांकांनी पुढे जात 97 व्या स्थानावर पोहोचला आहे तर सलामीवीर किशनला क्रमवारीत 37 धावांच्या शानदार खेळीचे बक्षीस मिळाले.
जगातील सर्वात मोठे राउरकेला स्टेडीयम हॉकी वर्ल्ड कपसाठी सज्ज:
- ओडिशाच्या राउरकेला येथे बनवलेले देशातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम 13 जानेवारीपासून विश्वचषक हॉकी सामन्यांसाठी सज्ज आहे.
- याआधी, 5 जानेवारीला जेव्हा या स्टेडियमचे उद्घाटन होईल, तेव्हा ही तारीख ओडिशा आणि झारखंडच्या क्रीडा इतिहासात एक संस्मरणीय क्षण म्हणून नोंदवली जाईल.
- स्टेडियमच्या उद्घाटनानिमित्त येथे झारखंड आणि ओडिशाच्या ज्युनियर पुरुष संघांमध्ये पहिला हॉकी सामना खेळवला जाईल.
- स्वातंत्र्यसैनिक आणि आदिवासी आयकॉन बिरसा मुंडा यांच्या नावावर असलेल्या नवीन स्टेडियममध्ये एकूण 20 सामने खेळवले जातील.
दिनविशेष :
- 6 जानेवारी – पत्रकार दिन.
- 6 जानेवारी 1665 मध्ये शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- 6 जानेवारी 1673 मध्ये कोंडाजी फर्जद यांनी फक्त 60 मावळ्यांच्या मदतीने पन्हाळा किल्ला जिंकला आणि महाराजांचे 13 वर्षाचे स्वप्न पूर्ण झाले.
- सॅम्युअल मॉर्स यांनी 6 जानेवारी 1838 मध्ये तारयंत्राचा शोध लावला.
- 6 जानेवारी 1992 मध्ये न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे 47वे राज्य बनले.