कोरोन लसीची चाचणी करण्या साठे 6 ते 9 महिन्यांचा कालावधी:
कोविड 19 वर भारतातील सात कंपन्यांनी लशी तयार केल्या आहेत ही निश्चितच उत्साह वाढवणारी कामगिरी आहे.
त्या लशींची चाचणी करावीच लागणार आहे, पण या सगळ्या प्रक्रियेला सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो.
यातील कुठलीही लस 2021 पूर्वी येण्याची शक्यता नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
स्वामीनाथन यांनी सांगितले की, सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पडले तर टप्पा 1 ते टप्पा 3 पर्यंतच्या चाचण्या सहा ते नऊ महिन्यात पूर्ण होऊ शकतात.
करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात:
हवेच्या माध्यमातून करोना विषाणूचा प्रसार होत असल्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.
करोना विषाणूचे छोटे छोटे कण हवेतही जिवंत राहतात आणि त्यामुळे लोकांमध्ये त्याचा संसर्ग होऊ शकतो, असे 32 देशांच्या 239 शास्त्रज्ञांच्या संशोधनात समोर आले आहे.
जागतिक आरोग्य संघटनाने (WHO) करोना व्हायरसचा प्रादुर्भाव कसा होतो यासंदर्भातील माहिती जारी केली होती.
जगात आतापर्यंत एक कोटी 15 लाखांपेक्षा जास्त जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. पाच लाख 36 हजार जणांचा करोनामुळे बळी गेला आहे.
हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल 900 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला:
भारतातील प्रसिद्ध अशा हिरो सायकल कंपनीने चीनसोबतचा भविष्यातील 900 कोटींचा करार रद्द केला आहे.
अलिकडेच हिरो सायकल कंपनीने करोना विरोधात लढण्यासाठी केंद्र सरकारला 100 कोटी रुपयांची मदत दिली होती.
हिरो सायकलने एका चिनी कंपनीशी केलेला तब्बल 900 कोटी रुपयांचा व्यवहार रद्द केला आहे.
सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी Boycott Chinese Product अशी मोहिम राबवली आहे.
तमिळनाडूचा जी. आकाश भारताचा 66वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे:
तमिळनाडूचा जी. आकाश भारताचा 66वा ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू ठरला आहे.
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाकडून (फिडे) ग्रँडमास्टर म्हणून आकाशच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
चेन्नईच्या आकाशचे ‘फिडे’ क्रमवारीत 2495 रेटिंग आहे.‘‘भारताच्या ग्रँडमास्टरच्या यादीत मला स्थान मिळाले याचा अभिमान आहे.
दिनविशेष :
सन 1785 मध्ये ‘डॉलर‘ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले.
सन 1892 मध्ये ब्रिटिश संसदेत पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांची निवड झाली होती.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची6 जुलै 1917 मध्ये पुणे येथे स्थापना झाली.
सन 1982 मध्ये पुणे-मुंबई मार्गावरील खंडाळा ते मंकी हिल दरम्यान रेल्वेचा भारतातील सर्वात जास्त लांबीचा (त्याकाळातील) वाहतुकीस खुला झाला.
चीन युद्धापासून बंद असलेली भारत तिबेट जोडणारी नाथू ला ही खिंड सन 2006 मध्ये तब्बल 44 वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.