Current Affairs (चालू घडामोडी)

6 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

संभाजी नगर विमानतळ

6 March 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (6 मार्च 2020)

भारतीय संघ महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत :

  • टी 20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा उपांत्य फेरीचा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे एकही चेंडूचा सामना होऊ शकला नाही.
  • तसेच त्यामुळे गुणांच्या तुलनेनुसार भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळाले. साखळी फेरीत भारताने 4 सामने जिंकत 8 गुण मिळवले होते. तर इंग्लंडने 3 सामने जिंकून 6 गुण मिळवले होते. त्यामुळे स्पर्धेच्या नियमांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. यासह भारतीय महिला संघाने सामना न खेळूनही एक इतिहास रचला.
  • तर भारतीय संघाने महिला टी 20 विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठण्याचा विक्रम रचला. या आधी 2018 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडनेच पराभूत केले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (5 मार्च 2020)

मोदी सरकार आणणार ‘ही’ महत्त्वाकांक्षी योजना :

  • प्रत्येक सर्वसामान्य नोकरदार वर्षातून एकदा होणाऱ्या पगारवाढीकडे मोठ्या आशेने बघत असतो. पण आता वर्षभराची वाट न बघता 6 महिन्यात तुम्हाला पगारवाढ मिळाली तर? पण हे खरं आहे. मोदी सरकारने खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना अच्छे दिन आणण्यासाठी नवीन योजना आणली आहे.
  • तर या योजनेतंर्गत वर्षातून दोनदा म्हणजेच दर 6 महिन्यांनी पगार वाढेल. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
  • केंद्र सरकारने महागाईचा सामना करण्यासाठी ही योजना तयार केली आहे. ज्या अंतर्गत कर्मचार्‍यांवर वाढत्या महागाईचा बोजा कमी करण्यासाठी मदत होईल. नवीन महागाई निर्देशांकानुसार ही वेतनवाढ निश्चित केली जाईल.
  • तसेच नियमानुसार, महागाई वाढल्यामुळे खासगी क्षेत्रात कार्यरत सुमारे 3 कोटी कर्मचाऱ्यांचा पगार दर 6 महिन्यांनी वाढेल. बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, सरकारच्या उच्चस्तरीय समितीने औद्योगिक क्षेत्रातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ग्राहक मूल्य निर्देशांकासाठी एक नवीन अहवाल तयार केला आहे, ज्याचा महागाई भत्ता या महागाई निर्देशांकात जोडला जाईल.
  • तर मागील महिन्याच्या 27 तारखेला मुख्य कामगार व रोजगार सल्लागार बी.एन. नंदा यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. ज्यामध्ये औद्योगिक क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी ग्राहक किंमत निर्देशांक (सीपीआय-आयडब्ल्यू) ची नवीन योजना मंजूर झाली.

येस बँकेवर रिझर्व्ह बँकेने लादले निर्बंध:

  • YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या येस बँकेवर निर्बंध लादले आहेत. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.
  • तर या बँकेवर कर्जाचा बोजा चांगलाच वाढल्याने रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. तसेच ग्राहकांना खात्यातून 50 हजार रुपयेच काढता येतील असंही RBI नं म्हटलं आहे.
  • तसेच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास खातेदारांना RBI ची मंजुरी घ्यावी लागणार आहे.
  • खातेदारांना वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्न या तीन कारणांसाठीच 50 हजारांपेक्षा जास्त रक्कम काढता येईल. मात्र RBI ची मंजुरी त्यासाठी घेणं बंधनकारक असणार आहे.
  • खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या या YES बँकेवर 30 दिवसांसाठी निर्बंध लादण्यात आले आहेत.

राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळ होणार स्थापन :

  • एकसारखे व उत्तम दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्य सरकारकडून राज्य आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम मंडळाची स्थापना करण्यात येईल. नुकताच सरकारकडून आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.
  • तर त्यानंतर पालक-शिक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थी, पालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नसल्याचे स्पष्टीकरण देत ही माहिती दिली.
  • राज्यात जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 66 हजार 33 शाळा कार्यरत आहेत. त्यामधील 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ सुरू होते.
  • तसेच फक्त 81 शाळांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण न देता जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमध्ये ते देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव :

  • औरंगाबाद येथील विमानतळाचे नाव बदलून ते छत्रपती संभाजी महाराज विमानतळ, औरंगाबाद असे करण्याची घोषणा गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली.तत्पूर्वी राज्य मंत्रिमंडळाने या बाबतचा निर्णय घेतला.
  • तर मुख्यमंत्री म्हणाले की, विमानतळाचे नामांतर करण्यासंदर्भात लोकप्रतिनिधींकडून सातत्याने मागणी होत आहे. त्याचप्रमाणे औरंगाबाद महापालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ असे नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे. तसेच लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.
  • तसेच त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावास मान्यता दिली असून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांची मान्यता घेऊन केंद्र शासनाच्या नागरी विमान मंत्रालयाकडे तो पाठविण्यात येईल. आतापर्यंत या विमानतळाचे नाव चिखलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ; औरंगाबाद असे होते.

दिनविशेष:

  • 6 मार्च हा दिवस ‘राष्ट्रीय दंतचिकित्सक दिन’ आहे.
  • सन 1840 मध्ये बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
  • के.आर. नारायण यांच्या हस्ते सन 1999 यावर्षी जगपप्रसिध्द खजुराहो मंदिर समूहाच्या सह्स्त्राब्दी सोहळ्याचे उद्घाटन झाले.
  • सन 2000 मध्ये शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब केला.
  • देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे 6 मार्च 2005 रोजी सुरु झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मार्च 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago