मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत मोफत विजेबाबत मोठी घोषणा केली आहे.
आता अनुदान मागणाऱ्यांनाच मोफत वीज मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
1 ऑक्टोबरपासून ही सुविधा ऐच्छिक होणार आहे.
तसेच ज्यांना अनुदान हवे आहे, त्यांनी त्यासाठी पर्याय निवडावा.
तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी स्टार्टअप धोरणाला मंजुरी दिली आहे.
दिल्लीतील ग्राहकांना सध्या 200 युनिटपर्यंतचे वीज बिल शून्य आहे आणि 201 ते 400 युनिट प्रति महिना वीज वापरल्यास 800 रुपये सबसिडी मिळते.
दुसरीकडे, स्टार्टअपसाठी भाड्याने घेतलेल्या जमिनीचे अर्धे भाडे सरकार देईल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
याव्यतिरिक्त, पेटंट, ट्रेडमार्क किंवा कॉपीराईट फी भरली जाऊ शकते. सरकार इंटरनेट शुल्क भरण्यातही मदत करू शकते.
स्टार्टअप सुरू करणाऱ्या विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी बिनव्याजी कर्जाची सुविधाही दिली जाईल.
‘डब्ल्यूएचओ’च्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताचा जोरदार आक्षेप :
अधिकृत आकडेवारी उपलब्ध असतानाही करोना महासाथीशी संलग्न मृत्यूंचे अतिरिक्त अंदाज दर्शवणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्या गणितीय प्रारूपाच्या वापरावर भारताने गुरुवारी जोरदार आक्षेप घेतला.
तर यासाठी वापरण्यात आलेले प्रारूप आणि माहिती गोळा करण्यासाठी वापरलेली पद्धत संशयास्पद असल्याचे भारताने सांगितले.
करोना विषाणूमुळे किंवा आरोग्य यंत्रणेवरील त्याच्या परिणामामुळे गेल्या दोन वर्षांत सुमारे दीड कोटी लोक मरण पावल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) गुरुवारी जारी केलेल्या अहवालात व्यक्त केला.
तर 60 लाख मृत्यूंच्या अधिकृत आकडेवारीपेक्षा हा आकडा दुपटीहून अधिक आहे.
तसेच यापैकी बहुतांश मृत्यू आग्नेय आशिया, युरोप व अमेरिका येथे झाले आहेत.
ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धात भारताच्या सराव शिबिराला आनंद, गेलफंड यांचे मार्गदर्शन :
ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेसाठी 7 मेपासून सुरू होणाऱ्या सराव शिबिराला पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि बोरिस गेलफंड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने पहिल्या सराव शिबिराची घोषणा गुरुवारी केली.
तर या स्पर्धेसाठी संघटनेने आनंदची प्रेरक आणि इस्रायलच्या गेलफंडची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
चेन्नईच्या लीला हॉटेलमध्ये 7 ते 17 मे या कालावधीत हे शिबीर होणार आहे.
भारताला यंदा पहिल्यांदाच ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी लाभणार असून ही स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत चेन्नई येथे खेळवली जाणार आहे.
यजमान या नात्याने भारताला खुल्या आणि महिला अशा दोन्ही विभागांमध्ये प्रत्येकी दोन संघ निवडता आले आहेत.
दिनविशेष :
6 मे : आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन
पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट 6 मे 1840 मध्ये प्रसारित झाले.
पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्घाटन 6 मे 1889 मध्ये झाले.
ईडीएसएसी पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संचयित संगणक सॉफ्टवेअर सुरु 6 मे 1949 मध्ये झाले.
6 मे 1954 मध्ये रॉजर बॅनिस्टर हे 1 मैल चार मिनिटांच्या आत धावणारे पाहिले व्यक्ती ठरले.
अडोल्फ हिटलर यांच्या डायरीचा 6 मे 1983 मध्ये लबाडी म्हणून खुलासा केला गेला.
6 मे 1997 मध्ये बँक ऑफ इंग्लंड ला स्वायत्तता देण्यात आली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.