7 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

कोरो फ्लू
कोरो फ्लू

7 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 एप्रिल 2020)

पाच कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर मोदी सरकारने टाकले पैसे :

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना व्हायरसपासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्याची घोषणा केली होती.
  • ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’च्या अंतर्गत देशातील चार कोटी 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे टाकण्यात आले आहेत.
  • तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजने अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 62 हजार कोटींची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
  • करोना व्हायरसच्या प्रादुर्भावात वाचण्यासाठी 4.91 कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रूपयांची मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे.
  • तसेच लॉकडाउन दरम्यान डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT)च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यात येत आहेत.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (4 एप्रिल 2020)

रेल्वेने तयार केलं स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’:

  • भारतीय रेल्वेने देशात करोना व्हायरसविरोधात लढ्यासाठी स्वस्त व्हेंटिलेटर ‘जीवन’ तयार केले आहे.
  • तर हे व्हेंटिलेटर पंजाबच्या कपुरथला येथील ‘रेल्वे कोच फॅक्टरी’मध्ये (आरसीएफ) बनवण्यात आले आहेत.
  • ‘जीवन’ व्हेंटिलेटरची किंमत कंप्रेसरशिवाय जवळपास दहा हजार रुपये असेल. सध्या देशात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत पाच ते 15 लाख रुपयांदरम्यान आहे.
  • मात्र, अद्याप रेल्वेने बनवलेल्या ‘जीवन’ व्हेंटिलेटरसाठी ‘आयसीएमआर’ची मंजुरी मिळालेली नाही.

‘कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती :

  • हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
  • युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.
  • तर त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.
  • तसेच या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.

खासदारांची वर्षभरासाठी 30 टक्के वेतन कपात :

  • करोनाशी लढण्यासाठी खासदारांची 30 टक्के वेतन कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे.
  • आर्थिक वर्ष 2020-21 या वर्षासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅबिनेटच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. तूर्तास 12 महिन्यांसाठी हा निर्णय घेतला आहे.
  • तसेच या संदर्भातल्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली आहे असंही प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं. करोनाशी लढता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
  • राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह सगळ्या खासदारांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय झाला असल्याचं प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं.

दिनविशेष:

  • 7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
  • आर्य समाजाची स्तपना 7 एप्रिल 1875 मध्ये झाली.
  • 7 एप्रिल 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
  • पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वाशिग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन 7 एप्रिल 1940 मध्ये ठरले.
  • 7 एप्रिल 1947 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)ची स्थापना झाली.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 एप्रिल 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.