7 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 एप्रिल 2022)
फोर्ब्सने जाहीर केली जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी :
फोर्ब्सने जाहीर केलेल्या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत भारतातील अनेक दिग्गजांनी आपले स्थान निर्माण केले आहे.
श्रीमंत भारतीयांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 90.7 अब्ज डॉलर आहे.
अंबानी हे जगातील 10 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत.
तर, गौतम अदानी, आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती 90 अब्ज डॉलर आहे आणि ते
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 11 व्या क्रमांकावर आहेत.
HCL Technologies Limited चे संस्थापक शिव नाडर हे फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप 10 श्रीमंत भारतीयांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहेत.
तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत या यादीतील पहिल्या तीन स्थानांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
तर या यादीत सायरस पूनावाला चौथ्या स्थानावर आहे. त्यांची कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोनाची लस कोव्हशील्ड बनवली आहे.
स्टीपलचेसमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या अविनाश साबळेने ‘एएफआय’ फेडरेशन चषक वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत बुधवारी पुरुषांच्या पाच हजार मीटर शर्यतीत 13:39.43 सेकंद अशी वेळ नोंदवत नवीन विक्रम प्रस्थापित केला.
तर 1992 मध्ये बहादूर प्रसाद यांनी नोंदवलेला विक्रम अविनाशनने मोडीत काढला.
तसेच महिलांच्या 200 मीटर शर्यतीत महाराष्ट्राच्या ऐश्वर्या मिश्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
सुवर्णपदक पटकावणाऱ्या हिमा दासपासून ती एक शतांश सेकंदाने पिछाडीवर राहिली.
आसामच्या अमलान बोरगोहेनने पुरुषांच्या 200 मीटर शर्यतीत 20.52 सेकंद वेळेसह राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली.
कमिन्सने रचला नवा विक्रम :
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 14 सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
तर या सामन्यात मुंबईचा पराभव झाला असून कोलकाताचा पाच गडी राखून विजय झाला आहे.
तसेच या विजयासाठी श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांनी दिमाखदार खेळ करत विजय अक्षरश: खेचून आणला. पॅट कमिन्सने
तर या डावात 15 चेंडूंमध्ये तब्बल 56 धावा करुन नवा विक्रम रचला आहे.
तर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वात वेगवान आणि कमी चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठऱला आहे.
भाजपाने बाजारात आणलं नवं चॉकलेट :
गुजरात भाजपाने एक नवं चॉकलेट बाजारात आणलं आहे.
तर या चॉकलेटच्या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावलेला आहे.
तसेच हे पौष्टिक न्यूट्रिशन बार सुरूवातीला गुजरात भाजपाचे प्रमुख सी आर पाटील यांनी संसदीय पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना वाटण्यात आली.
तर या पॅकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आला असून या एनर्जी बारमधल्या सामग्रीची माहितीही देण्यात आली आहे.
भाजपाचे खासदार दुष्यंत सिंग यांनी या न्यूट्रिशन बारबद्दल माहिती दिली आहे.
दिनविशेष:
7 एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
आर्य समाजाची स्तपना7 एप्रिल 1875 मध्ये झाली.
7 एप्रिल 1906 मध्ये माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे नेपल्स शहर बेचिराख झाले.
पोस्टाच्या तिकिटावर चित्र असणारे बुकर टी. वाशिग्टन हे पहिले कृष्णवर्णीय अमेरिकन 7 एप्रिल 1940 मध्ये ठरले.
7 एप्रिल 1947 मध्ये जागतिक आरोग्य संघटना (WHO)ची स्थापना झाली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.