7 ऑगस्ट 2021 चालू घडामोडी – Current Affairs

राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार
राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार

7 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 ऑगस्ट 2021)

राजीव गांधी यांच्याऐवजी आता मेजर ध्यानचंद पुरस्कार :

  • देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराला शुक्रवारी मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्यात आले आहे.
  • तर टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • खेलरत्न पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याची देशातील नागरिकांनी आग्रही मागणी केली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
  • तसेच देशातील नागरिकांच्या भावनांचा आदर करून यापुढे मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणून ओळखला जाईल.
  • हॉकीच्या सुवर्णयुगाचे शिल्पकार ध्यानचंद यांनी भारताला या खेळात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळेच त्यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे, असे ‘ट्वीट’मोदी यांनी केले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (6 ऑगस्ट 2021)

12 ऑगस्टला होणार ‘EOS-03’चं प्रक्षेपण :

  • देशांत कोरोनोची दुसरी लाट ओसरत असून जनजीवन सुरळित सुरु झालं असताना आता भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो पुनश्च हरिओम म्हणत उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना सुरुवात करत आहे.
  • तर येत्या 12 ऑगस्टला इस्त्रो 2268 किलो वजनाचा EOS-03 हा उपग्रह GSLV-F10 या प्रक्षेपकाद्वारे भूस्थिर कक्षेत पाठवणार आहे.
  • तसेच पहाटे पाच वाजून 43 मिनिटांनी या उपग्रहाचे प्रक्षेपण नियोजित आहे.
  • तर या उपग्रहामुळे भारतीय उपखंडातील विविध भागाची 24 तास सुस्पष्ट छायाचित्रे घेणे शक्य होणार आहे.
  • पीक लागवडीच्या क्षेत्राबद्दल माहिती घेणे, दुष्काळ-पूर परिस्थीतीवर लक्ष ठेवणे, सागरी क्षेत्र व्यवस्थापन, वातावरणातील धुकं-धुळ याबद्दलची ताजी माहिती, आपातकालीन व्यवस्थापन अशा विविध गोष्टींसाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

बर्नार्ड अर्नाल्ट बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती :

  • लूई विटॉनचे (Louis Vuitton) मालक बर्नार्ड अर्नाल्ट (Bernard Arnoult) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत.
  • तर त्यांनी अमॅझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) आणि इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे मालक एलन मस्क यांना मागे टाकलंय.
  • तसेच फोर्ब्सच्या रियल-टाइम बिलिनेयर्स लिस्टमध्ये त्यांचं नाव सर्वात वर आहे.
  • अर्नाल्ट यांची एकूण संपत्ती 198.9 अब्ज डॉलर आहे. तर जेफ बेझोस 194.9 अब्ज डॉलरसह दुसऱ्या क्रमांकावर आणि एलन मस्क 185.5 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
  • बर्नार्ड अर्नाल्ट हे 72 वर्षीय फ्रेंच उद्योजक आहेत. ते ब्रांड लूई विटॉन मोएट हेनेसीचे मालक आहेत. अर्नाल्ट यांच्याजवळ एकूण 70 ब्रांड्स आहेत.
  • तर त्यामध्ये लुई वीटन, मार्क जॅकब्स, केंजो, स्टेला मेकार्टनी फेंडी, क्रिश्चियन डायर, गिवेंची, सेफोरा यांसारख्या फेमस ब्रांडचा समावेश आहे.

मरिन प्रशिक्षकपदावरून पायउतार :

  • भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक वाटचालीत मोलाची भूमिका बजावणारे शोर्ड मरिन यांनी शुक्रवारी प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.
  • कांस्यपदकाच्या लढतीत ब्रिटनविरुद्ध पराभूत झाल्यानंतर ऑनलाइन पत्रकार परिषदेदरम्यान 47 वर्षीय मरिन यांनी हा निर्णय जाहीर केला.
  • तर 2017 मध्ये मरिन यांना सर्वप्रथम महिला संघाचे प्रशिक्षकपद बहाल करण्यात आले.
  • मात्र त्या वर्षाच्या अखेरीसच त्यांना पुरुष संघांच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली.
  • अखेर 2018 मध्ये विश्वचषकापूर्वी त्यांच्याकडे पुन्हा महिलांच्या प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपवण्यात आली.

दिनविशेष :

  • पद्मश्री, पद्मभूषण व पद्मविभूषण भारतीय शेतीतज्ञ, हरितक्रांतीचे जनक आणि केन्द्रीय कृषी मंत्री डॉ. मनकोम्बू साम्बसिवन तथा एम.एस. स्वामीनाथन यांचा जन्म 7 ऑगस्ट 1925 मध्ये रोजी झाला.
  • 7 ऑगस्ट 1941 हा दिवस जगप्रसिद्ध भारतीय कवी, कलावंत, शिक्षणतज्ञ, तत्वचिंतक, थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांचा स्मृतीदिन आहे.
  • मुंबई महानगरपालिकेने 7 ऑगस्ट 1947 रोजी बेस्ट (Bombay Electricity Supply and Transport) कंपनी आपल्या ताब्यात घेतली.
  • सलग 128 वर्षे प्रकाशित झाल्यावर ‘द वॉशिंग्टन स्टार‘ हे वृत्तपत्र सन 1981 मध्ये बंद पडले.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2021)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.