7 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
7 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2023)
सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांना शपथ:
- सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच नवीन न्यायाधीशांना शपथ दिली.
- न्या. पंकज मित्तल, न्या. संजय कारोल, न्या. पी.व्ही. संजय कुमार, न्या. अहसानुद्दिन अमानुल्लाह आणि न्या. मनोज मिश्रा यांनी शपथ घेतली.
- यामुळे आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 32 झाली असून दोन जागा रिक्त आहेत.
Must Read (नक्की वाचा):
न्यायमूर्तीपदी व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान:
- मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी निुयक्ती झालेल्या अॅड्. लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली.
- ही सुनावणी मंगळवारी होईल.
- व्हिक्टोरिया गौरी यांचा भाजपशी संबंध असल्याचा आरोप आहे.
- गौरी यांना अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नियुक्त करण्याबाबत केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेकडे लक्ष वेधून ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी नव्याने उल्लेख केलेल्या या प्रकरणाची सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. जे. बी. पारडीवाला यांच्या खंडपीठाने दखल घेतली.
- यापूर्वी, गौरी यांच्या नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर 10 फेब्रुवारीला सुनावणी घेण्याची तयारी न्यायालयाने दर्शवली होती.
तेजनारायण-शिवनारायण चंद्रपॉलने वेस्ट इंडिजसाठी रचला इतिहास:
- झिम्बाब्वेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजचा सलामीवीर तेजनारायन चंद्रपॉलने शतक झळकावले.
- वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक पूर्ण केले.
- त्याचबरोबर या बाप-लेकांनी वेस्ट-इंडिजसाठी एक खास विक्रम केला.
- तेजनारायनने यादरम्यान सहकारी फलंदाज क्रेग ब्रॅथवेटसोबत पहिल्या विकेटसाठी 221 धावांची नाबाद शतकी भागीदारीही केली.
- कारकिर्दीतील पहिले शतक झळकावल्यानंतर तेजनारायण आणि शिवनारायण, या जोडीने पिता-पुत्र जोडीच्या खास यादीत आपले स्थान निर्माण केले आहे.
- वेस्ट इंडिजसाठी, कसोटी क्रिकेटमध्ये शतके झळकावणारी ही पहिली पिता-पुत्र जोडी ठरली आहे.
- त्याचबरोबर असा पराक्रम करणारी ही जगातील 12वी जोडी ठरली आहे.
महिला प्रीमियर लीगचे सामने मुंबईत:
- अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या महिला प्रीमियर लीगला (डब्ल्यूपीएल) मार्च महिन्याचा मुहूर्त मिळाला असून, 4 ते 26 मार्चदरम्यान ही स्पर्धा फक्त मुंबईत पार पडणार आहे.
- लीगमधील सामने ब्रेबॉर्न आणि डी.वाय. पाटील स्टेडियमवर पार पडतील.
- स्पर्धेचा कार्यक्रम अजून निश्चित नसला तरी गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स संघांदरम्यान उद्घाटनाचा सामना होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दिनविशेष:
- आरएमएस टायटॅनिक जहाजाचे रचनाकार थॉमस अँन्ड्रयूज यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1873 रोजी झाला होता.
- बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनी ने तयार केलेला सैरंध्री हा चित्रपट सन 1920 मध्ये पुण्याच्या आर्यन सिनेमात प्रथम प्रकाशित झाला.
- सन 1974 मध्ये ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
- क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना सन 2003 या वर्षी श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.