7 जानेवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
7 January 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 जानेवारी 2023)
गुजरातमधील बंधाऱ्यास नरेंद्र मोदींच्या आईचं नाव:
- गुजरातमधील राजकोट येथे बांधण्यात येत असलेल्या एका छोट्या धरणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आई हिराबेन मोदी यांचं नाव देण्यात आलं आहे.
- हा बंधारा ‘गिर गंगा परिवार ट्रस्ट’च्या उभारण्यात येत आहे.
- राजकोट-कलावाड मार्गावरील वागुदाद गावाजवळील न्यारी नदीवर हा बंधारा बांधण्यात येत असून यासाठी 15 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईला आदरांजली म्हणून या बंधाऱ्याचं नामकरण ‘हिराबा स्मृती सरोवर’ असं करण्यात आलं आहे.
- विशेष म्हणजे या ट्रस्टने देणगीदारांनी केलेल्या आर्थिक मदतीतून गेल्या चार महिन्यांत सुमारे 75 छोटे बंधारे बांधले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
अक्षर पटेल‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच फलंदाज:
- भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
- दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताला 16 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
- या सामन्यात अक्षर पटेलने भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सातव्या क्रमांकावर खेळताना एक मोठा विक्रम केला आहे.
- ज्यामध्ये त्याने रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याल मागे टाकले आहे.
- या सामन्यात अक्षर पटेलने 31 चेंडूत 65 धावा केल्या.
- तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता.
- भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सातव्या क्रमांकावर खेळणाऱ्या कोणत्याही फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
- रवींद्र जडेजाने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी सर्वोच्च धावसंख्या नोंदवली होती.
नागपूरच्या ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला दुसऱ्यांदा अजिंक्यपद:
- 48 व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी नागपूरची सतरा वर्षाची तिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने साडेनऊ गुणासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकाविला.
- तिला चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
- दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
- सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या भक्तीला अडीच लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले.
- महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीला उत्कृष्ट डावपेच आखत पराभूत करून उपविजेतेपदासह रोख पाच लाख रुपयाची कमाई केली.
दिनविशेष:
- युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म 7 जानेवारी 1827 मध्ये झाला होता.
- स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झाला होता.
- लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.
- सन 1927 मध्ये न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
- कोलकाता येथे 7 जानेवारी 1935 रोजी इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले.
- सन 1972 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.