48 व्या राष्ट्रीय महिला अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत गुरुवारी नागपूरची सतरा वर्षाची तिभावान बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने साडेनऊ गुणासह सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान पटकाविला.
तिला चषक व सहा लाख रुपयांचा रोख पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
दिव्याने आपल्या बुद्धिचातुर्याच्या बळावर गोव्याच्या आंतरराष्ट्रीय मास्टर भक्ति कुलकर्णीला चुरशीच्या सामन्यात दिमाखात विजय मिळवीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागलेल्या भक्तीला अडीच लाख रुपयाचे पारितोषिक मिळाले.
महिला ग्रँडमास्टर मेरी गोम्स हिने कोल्हापूरची महिला आंतरराष्ट्रीय मास्टर ऋचा पुजारीला उत्कृष्ट डावपेच आखत पराभूत करून उपविजेतेपदासह रोख पाच लाख रुपयाची कमाई केली.
दिनविशेष:
युनिव्हर्सल स्टँडर्ड टाइमचे निर्माते सँडफोर्ड फ्लेमिंग यांचा जन्म 7 जानेवारी 1827 मध्ये झाला होता.
स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म 7 जानेवारी 1893 मध्ये झाला होता.
लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म 7 जानेवारी 1920 मध्ये झाला होता.
सन 1927 मध्ये न्यूयॉर्क ते लंडन अशी अटलांटिक महासागर पार करणारी दूरध्वनीसेवा सुरू झाली.
कोलकाता येथे 7 जानेवारी 1935 रोजी इंडियन नॅशनल सायन्स अॅकेडमीचे (INSA) उद्घाटन झाले.
सन 1972 मध्ये कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.