7 June 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 जून 2022)
नरेंद्र मोदींच्या हस्ते खास नाण्यांचे प्रकाशन :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक, दोन पाच, दहा आणि वीस रुपयांच्या नाण्यांची खास मालिका जारी केली आहे.
तर ही नाणी सामान्य नाण्यांपेक्षा विशेष असतील असणार आहेत.
कारण ही नाणी किती रुपयांची आहेत हे अंध व्यक्तींनादेखील ओळखता येणार आहेत.
दिल्ली येथील अर्थ मंत्रालय आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयातर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत आयकॉनिक विक या साप्ताहिक कार्यक्रमाचे यायोजन करण्यात आले आहे.
तर या कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मोदी यांनी वरील खास नाणी सार्वजनिक केली.
मोदी यांच्या हस्ते जारी करण्यात आलेल्या या विशेष नाण्यांची काही खास वैशिष्ट्ये आहेत.
या नाण्यांवर ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा’चा (AKAM) लोगो असेल.
‘मेक इन इंडिया’अंतर्गत आकाराला आलेली ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस येत्या 15 ऑगस्टला रेल्वेच्या चेन्नईमधील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’तून (आयसीएफ) बाहेर पडणार आहे.
तर या कारखान्यातून सुरुवातीला दोन ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसचा प्रवास सुरू होणार आहे.
त्यामुळे येत्या 15 ऑगस्टनंतरच ही गाडी धावू शकेल. या दोन प्रोटोटाईप गाडय़ा असतील.
महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही महिन्यात ‘वंदे भारत’ गाडय़ांच्या डब्यांची बांधणी लातूर येथील कारखान्यातही होणार आहे.
जवळपास 400 वातानुकूलित ‘वंदे भारत’ गाडय़ांची बांधणी करण्यात येणार आहे.
जीपीएस आधारित ऑडिओ व्हिजुअल प्रवासी माहिती प्रणालीने हे डबे सज्ज असतील. प्रत्येक ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमध्ये 16 वातानुकूलित डबे असणार आहेत.
तर एका गाडीची प्रवासी क्षमता एक हजार 128 इतकी आहे.
बंगालमधील विद्यापीठांच्या कुलपतीपदी मुख्यमंत्री :
पश्चिम बंगालमधील सर्व शासन संचालित विद्यापीठांच्या कुलपती पदावरून राज्यपाल जगदीप धनखड यांना हटवून त्यांच्या जागी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कुलपती बनवण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिली.
याशिवाय, खासगी विद्यापीठांच्या अभ्यागत पदावरून राज्यपालांना हटवून त्यांच्या जागी राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना आणण्याच्या आणखी एक प्रस्तावालाही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
कृषी व आरोग्य विद्यापीठांसह राज्यातील सर्व शासन संचालित विद्यापीठांच्या कुलपतीपदी मुख्यमंत्र्यांना नेमण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
विधानसभेच्या अधिवेशनात हा प्रस्ताव विधेयकाच्या स्वरूपात मांडण्यात येणार आहे.
खेलो इंडिया क्रीडा स्पर्धात पूजा, विवानला सुवर्ण :
महाराष्ट्राने खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सायकिलग आणि योगासनात सुवर्णपदके पटकावली.
याचप्रमाणे वेटलिफ्टिंगमध्येही कांस्य पदक मिळवले.
महाराष्ट्राने 2 सुवर्ण, 6 रौप्य व 5 कांस्य अशी पदके पटकावली.
ट्रॅक सायकिलगमध्ये परसूट प्रकारात मुलींमध्ये पूजा दानोळेने सुवर्णपदक याच प्रकारात मुलांमध्ये विवान सप्रूने (मुंबई) कांस्य मिळवले.
स्प्रिंटमध्ये संज्ञा कोकाटेने रौप्यपदक जिंकले.
अविनाश साबळेने राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडला :
भारताच्या अविनाश साबळेने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेतील 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पाचवा क्रमांक मिळवला.
तसेच स्वत:चाच राष्ट्रीय विक्रम आठव्यांदा मोडण्याची किमया साधली.
सेनादलात कार्यरत असलेल्या महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील 27 वर्षीय अविनाशने 8:12.48 सेकंद अशी वेळ रविवारी नोंदवली.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.