7 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
7 November 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 नोव्हेंबर 2020)
दहावी, बारावीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू :
दिवाळीनंतर म्हणजे 16 नोव्हेंबरपासून देशातील महाविद्यालये आणि शिक्षण संस्था प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) हिरवा कंदील दाखविल्यानंतर आता 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी दिली.
तसेच राज्यात ‘पुनश्च हरिओम’नंतर वाहतुकीची साधने, प्रवास व्यवस्था, नाट्यगृहे, सिनेमागृहे, बाजारपेठा सुरू करण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर माध्यमिक शाळेतील नववी ते बारावीचे, यातही प्राधान्याने दहावी, बारावीचे वर्ग सुरू करण्याचा मानस असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.
तर सध्या शाळा बंद असल्या तरी शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊनच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विविध समित्यांचे अध्यक्ष आणि सदस्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
तर भाजपचे नेते, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची महत्त्वाच्या अशा लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच उर्वरित 16 समित्यांपैकी सात समित्यांचे अध्यक्षपद शिवसेनेला, पाच समित्यांचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला तर चार समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे.
लोकलेखा समितीचे अध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे असते. भाजपने त्यासाठी मुनगंटीवार यांचे नाव पूर्वीच दिलेले होते.
राज्याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरीक्षक यांच्या अहवालांची तपासणी करणे हे महत्त्वाचे काम समिती करते.
दिवाळीत फटाक्यांवर बंदी दिल्ली सरकारकडून निर्णय जाहीर :
दिल्ली सरकारने दिवाळीत फटाक्यांवर बंदीचा निर्णय घेतला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे.
करोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी राजधानीत फटाक्यांवर बंदी घालण्याचा आणि रुग्णालयांमध्ये वैद्यकीय पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला.
तर याआधी राजस्थान, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि हरियाणा या राज्यांनीही फटाक्यांवर बंदी घातली आहे.
तसेच सध्या सुरु असलेला सणांचा हंगाम आणि प्रदूषण यामुळे दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. मुख्य सचिव, आरोग्य विभागाचे अधिकारी आणि दंडाधिकाऱ्यासोबत करोना आढावा बैठकीनंतर बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय वंशाच्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात :
न्यूझीलंडच्या संसदेत भारतीय भाषेचा आवाज घुमला आहे. याचं महत्वाचं कारण ठरल्या आहेत प्रियांका राधाकृष्णन. मूळच्या भारतीय वंशाच्या असलेल्या प्रियांका राधाकृष्णन यांचा समावेश न्यूझीलंडच्या मंत्रिमंडळात झाला आहे.
तर गुरुवारी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. त्यावेळी प्रियांका राधाकृष्णन यांचा मल्याळीतून बोलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
प्रियांका राधाकृष्णन यांचा जन्म भारतातला. त्यानंतर त्या सिंगापूरला राहिल्या. प्रियांका राधाकृष्णन या आता न्यूझीलंडच्या नागरिक आहेत. लेबर पार्टीच्या खासदार म्हणून त्या निवडून आल्या. आता पंतप्रधान जेसिंडा अर्डन यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना स्थान मिळालं आहे.
केनचा 200वा गोल, टॉटनहॅमचा विजय :
हॅरी केनने 200वा गोल झळकावत टॉटनहॅमच्या युरोपा लीग फुटबॉलमध्ये लुडोगोरेट्सवर मिळवलेल्या 3-1 अशा विजयात योगदान दिले.
तसेच टॉटनहॅमने याबरोबरच स्पर्धेत ‘ग’ गटात सहा गुणांसह अव्वल स्थान मिळवले.
तर टॉटनहॅमकडून 300वी लढत खेळणाऱ्या केनने योग्य ठरवला. त्याने 13व्या मिनिटाला गोल साजरा केल्यानंतर 43व्या मिनिटाला त्याच्याच पासवर लुकासने गोल केला.
दिनविशेष :
7 नोव्हेंबर 1665 मध्ये सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 मध्ये लिहिले.
लाल-बाल-पाल या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1858 मध्ये झाला.
केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) (7 मार्च 1866 (जन्मदिन) 7 नोव्हेंबर 1905 (स्मृतीदिन) हे मराठी कवी होते. मराठीत संतकाव्य आणि पंतकाव्य ही परंपरा होती. ती मोडून अन्य विषयांवर कविता करणारे केशवसुत हे आद्य मराठी कवी समजले जातात.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.