Current Affairs (चालू घडामोडी)

7 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

7 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2018)

भारत-अमेरिकेत संरक्षणविषयक करार:

  • भारत आणि अमेरिका यांच्यात 6 सप्टेंबर रोजी दोन अधिक दोन (टू प्लस टू) उच्चस्तरीय बैठक झाली. त्यावेळी दोन्ही देशांनी संरक्षणाशी संबंधित सीओएमसीएएसए करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे भारताचा अमेरिकेकडून अत्याधुनिक शस्त्रे विकत घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सदर बैठक यापूर्वी दोन वेळा रद्द झाली होती.
  • भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जिम मॅटिस आणि संरक्षणमंत्री माइक पॉम्पिओ या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
  • दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणे आणि आशियातील चीनच्या वाढत्या प्रभावाला आळा घालणे हा या करारांचा उद्देश आहे. दक्षिण आशियामध्ये स्थिरता आणि शांतता कशी नांदेल या बाबतही बैठकीत चर्चा झाली.
  • सीमेपलीकडून होणारा दहशतवाद, अण्वस्त्र पुरवठादार गटात भारताचा समावेश आणि एच 1 बी व्हिसा आदी महत्त्वाच्या प्रश्नांवर या वेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमध्ये हॉटलाइन यंत्रणा सुरू करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

रुपयाची डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक घसरण:

  • अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरण आणखी वाढली आहे. सलग सातव्या सत्रात रुपया डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक 72.10 अशा आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पोचला आहे.
  • रुपया घसरणीचा परिणाम शेअर बाजारावर देखील झाला. करन्सी बास्केटमध्ये डॉलर जवळपास सर्वच आशियाई चलनांच्या तुलनेत वधारतो आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती देखील वाढत चालल्या आहेत. प्रति पिंप 78 डॉलरला पोचला आहे. परिणामी देशांतर्गत बाजारात देखील इंधनाचे दर वाढले आहेत.
  • अमेरिका आणि चीनदरम्यान वाढत असलेला व्यापार क्षेत्रातील तणाव याशिवाय, अर्जेंटिना आणि तुर्कस्तानवरील वाढती संकटे आणि कच्च्या तेलाच्या जागतिक किंमतीतील वृद्धी यामुळे परदेशी मुद्रा विनिमय बाजारात निर्माण झालेली स्थिती रुपयाच्या घसरणीमागे असल्याचे बोलले जात आहे.

कलम 377 बद्दल सरन्यायाधीश मिश्रांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे:

  • परस्परसंमतीने ठेवल्या जाणाऱ्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम 377च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट 6 सप्टेंबर रोजी निकाल दिला.
  • समलैंगिकांनाही समान अधिकार आहेत, त्यामुळे दोन सज्ञान व्यक्तींनी ठेवलेले संबंध ही खासगी बाब आहे, त्यामुळे तो गुन्हा ठरत नाही, असा ऐतिहासिक निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे.
  • तसेच या निकाल वाचनामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी महत्वपूर्ण निरक्षणे नोंदवली. सरन्यायाधीश मिश्रा यांनी मांडलेले महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे:-
  • कोणीही आपल्या व्यक्तिमत्वापासून पळू शकत नाही. व्यक्तिमत्वाला ओळख निर्माण करुन देणारा आजचा समाज आहे. हा निर्णय देताना आम्ही वेगवेगळ्या पैलूंवर विचार केला आहे.
  • आपली ओळख टिकवणे ही एखाद्याचा आयुष्यातील महत्वाची गरज असते.
  • एलजीबीटी समूहातील व्यक्तींनाही इतर भारतीयांप्रमाणेच समान नागरी हक्क आहेत.
  • समलैंगिकता हा गुन्हा नाही.
  • प्रत्येक व्यक्तीने लैंगिक अग्रक्रम निश्चित करणे हे नैसर्गिक आहे. लैंगिकतेच्या आधारावर एखाद्याबरोबर दुजाभाव करणे म्हणजे त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे.
  • देशात सर्वांना समान अधिकार असायला हवेत, देशात सर्वांना सन्मानाने जगता आले पाहिजे.
  • जुन्या विचारसरणीला बाजूला सारायला हवे.
  • समाजाने पूर्वग्रहदूषित विचारधारेपासून स्वत:ला मुक्त करायला हवे.
  • इंद्रधनुष्याच्या रंगांचा झेंडा एलजीबीटी समाजाचं प्रतिक आहे असं सांगतच प्रत्येकाने आकाशात इंद्रधनुष्य शोधायला हवे असं मत मिश्रा यांनी व्यक्त केले.
  • लोकांनी आपली मानसिकता बदलायला हवी.

‘पीएमआरडीए’ची आता ऑनलाईन बांधकाम परवानगी:

  • पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम परवानगी प्रक्रिया सुकर व पारदर्शक करण्यासाठी ‘संगणकीय बांधकाम परवानगी प्रणाली’ सुरू केली आहे. ही प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाली असून, आतापर्यंत वास्तुविशारद, अभियंता आणि पर्यवेक्षक अशा 250 जणांनी बांधकाम परवानगीसाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे.
  • पीएमआरडीएने संगणकीय बांधकाम परवानगी प्रणालीकरिता स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. या प्रणालीचा वापर हा सर्वांना वापरण्यायोग्य असा आहे. बांधकाम परवानगीसाठी 75 फाईल्स प्रक्रियेत आहेत. तर 54 जणांनी आतापर्यंत ऑनलाईन शुल्क भरले आहे.
  • बांधकाम परवानगी पूर्णपणे ऑनलाईन असल्याने त्यामध्ये कोणतीही मानवीय हस्तक्षेप नाही. त्यामुळे परवानगी देण्याची प्रक्रिया ही कमी वेळेत यशस्वीरित्या पार पडली जात आहे. सध्या रहिवासी व औद्योगिक वापरासाठी ऑनलाईन बांधकाम परवानगी प्रक्रियेचा वापर केला जात आहे.
  • तसेच लवकरच वाणिज्यिक वापरासाठीच्या परवानगीसाठीदेखील ती विस्तारित केली जाणार असल्याचे पीएमआरडीएकडून सांगण्यात आले.

हॉलिवूड प्रख्यात अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे निधन:

  • हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते बर्ट रेनॉल्ड्स यांचे वयाच्या 82 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने फ्लोरिडा येथे निधन झाले.
  • 1961 मध्ये आलेल्या ‘अँजल बेबी’ या चित्रपटातून त्यांनी हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ‘अवर मॅन फ्लिंट’, ‘व्हाइट लाइटनिंग’, ‘द मॅन हू लव्ह्ड कॅट डान्सिंग’, ‘लकी लेडी’ यांसारख्या चित्रपटामुळे ते प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले होते.
  • ‘डॅन ऑगस्ट’ आणि ‘गन स्मोक’ यासारख्या टीव्ही शोमधून त्यांनी विविध भूमिका साकारल्या होत्या. 1997 मध्ये ‘बुगी नाइट्स’ या चित्रपटासाठी ऑस्कर नामांकन मिळाले होते.
  • तसेच ‘इव्हिनिंग शेड्स‘ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना ‘गोल्डन ग्लोब’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

दिनविशेष:

  • आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.
  • हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
  • 7 सप्टेंबर 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
  • सन 1923 मध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
  • सन 1931 मध्ये दुसर्‍या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
  • मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात सन 1978 मध्ये यश.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago