7 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी – Current Affairs
7 September 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 सप्टेंबर 2022)
भारताचा बांगलादेशबरोबर कुशियारा पाणीवाटप करार :
- भारत आणि बांगलादेशमधील परस्पर विश्वासाला बाधा आणणाऱ्या अतिरेकी मूलतत्ववादी शक्तींचा एकत्र येऊन मुकाबला करू, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
- भारताच्या दौऱ्यावर असलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्यासोबत त्यांनी मंगळवारी द्विपक्षीय चर्चा केली.
- या भेटीमध्ये दोन्ही देशांमध्ये 25 वर्षांमधला पहिला जलवाटप करारही अस्तित्वात आला आहे.
- पंतप्रधान मोदी आणि शेख हसिना यांच्या भेटीनंतर एकूण 7 करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत.
- यामध्ये कुशियारा नदी जलवाटपाचा करार सर्वात महत्त्वाचा ठरला आहे.
- बांगलादेश आणि भारतामध्ये 54 सामायिक नद्या आहेत.
Must Read (नक्की वाचा):
ब्रिटनच्या पंतप्रधानपदी लिझ ट्रस :
- ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी लिझ ट्रस यांची पंतप्रधानपदी अधिकृतपणे नियुक्ती जाहीर केली आहे.
- त्या ब्रिटनच्या तिसऱ्या महिला पंतप्रधान असतील.
- सोमवारी कन्झव्र्हेटिव्ह पक्षात झालेल्या निवडणुकीत ट्रस यांनी भारतीय वंशाचे नेते ऋषी सुनक यांचा पराभव केला होता.
नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना लसीला मंजुरी :
- करोना लसीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
- ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘भारत बायोटेक’च्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.
- 18 वर्षावरील सर्वांना ही लस देता येणार असून, करोना विरूद्धच्या आमच्या लढ्याला आणखी मजबूत करणार आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारताने करोना विरोधातील लढ्यात विज्ञान, संशोधन आणि मानवी संसाधनांचा उपयोग केला.
- नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीमुळे विषाणू जिथून शरीरामध्ये प्रवेश करतो तिथेच ही नेजल व्हॅक्सिन परिणामकारक ठरणार आहे.
- म्हणजेच विषाणू नाकावाटे शरीरामध्ये प्रवेश करण्याआधीच थांबवण्याचे प्रयत्न या लसीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
- अनेक वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासामधून विषाणू नेजल कॅव्हिटी म्हणजेच नाकाच्या माध्यमातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि नंतर शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचवतात.
14,500 शाळांत ‘पंतप्रधान श्री’ योजना :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी शिक्षक दिनी नवी ‘पंतप्रधान श्री’ (प्राईम मिनिस्टर- स्कूल फॉर रायिझग इंडिया) योजना जाहीर केली.
- या योजने अंतर्गत देशातील 14 हजार 500 शाळा या आदर्श शाळा (मॉडेल स्कूल) म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
- या शाळांमध्ये प्रयोगशाळा, स्मार्ट वर्ग, वाचनालये आणि क्रीडा सुविधांसह आधुनिक पायाभूत सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
- तसेच या शाळांतून शिक्षणाची अत्याधुनिक, कालसुसंगत आणि सर्वागिण पद्धत अवलंबिली जाईल.
- शिकविण्याची पद्धत ही मुलांची शोधात्मक आणि ज्ञानोपासनेची वृत्ती जोपासणारी असेल.
- तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणातून शिक्षण क्षेत्राचा कायापालट झाला आहे.
हरमनप्रीतला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन :
- आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या (एफआयएच) वार्षिक पुरस्कारांमध्ये भारताच्या तीन खेळाडूंना नामांकने मिळाली आहेत.
- भारताचा हुकमी ड्रॅग-फ्लिकर हरमनप्रीत सिंगला वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
- पीआर श्रीजेश आणि कर्णधार सविता पुनिया यांना अनुक्रमे पुरुष आणि महिला गटातील सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.
- तसेच प्रशिक्षक ग्रॅहम रीड यांनाही नामांकन मिळाले आहे.
- महिलांत सर्वोत्तम हॉकीपटूच्या पुरस्कारासाठी एकाही भारतीयाला नामांकन मिळाले नाही.
सुरेश रैनाने केली निवृत्तीची घोषणा :
- भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्त होत असल्याचं नुकतंच जाहीर केलं आहे.
- रैना हा त्याच्या आक्रमक फलंदाजीमुळे जगभरात ओळखला जातो.
- तर याआधी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं होतं.
- तसेच आता त्याने क्रिकेटच्या सर्वच प्रकारांमधून निवृत्ती घेतली आहे.
- याआधी त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता.
दिनविशेष:
- आद्द क्रांतिकारक स्वातंत्र्य सैनिक उमाजी नाईक यांचा जन्म 7 सप्टेंबर 1791 मध्ये झाला.
- हिन्दुस्तानी शास्त्रीय गायक बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा जन्म 7 सप्टेंबर 1849 मध्ये झाला.
- 7 सप्टेंबर 1906 मध्ये बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. ही भारतात स्थापन झालेली पहिली स्वदेशी व्यापारी बँक आहे.
- सन 1923 मध्ये इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन (इंटरपोल) ची स्थापना झाली.
- सन 1931 मध्ये दुसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली.
- मधुमेह नियंत्रित करण्यासाठी उपयोगी पडणारे इन्सुलिन प्रथमच जनुक अभियांत्रिकी पद्धतीने तयार करण्यात सन 1978 मध्ये यश.