8 April 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 एप्रिल 2022)
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून रशिया निलंबित :
- रशियन सैनिकांनी युक्रेनमध्ये मानवाधिकाराचे भीषण उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने गुरुवारी रशियाला संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेतून निलंबित करण्याचा ठराव पारित केला.
- तर रशियाचे हे कृत्य युद्धगुन्ह्यांसारखेच असल्याचे अमेरिका व युक्रेनने म्हटले आहे.
- संयुक्त राष्ट्र आमसभेत या ठरावाच्या बाजूने 93, तर विरोधात 24 मते पडली आणि 57 सदस्य तटस्थ राहिले.
- तसेच या दोन्ही ठरावांना किमान 140 देशांनी मान्यता दिली होती.
- 2006 साली स्थापन झालेल्या संयुक्त राष्ट मानवाधिकार परिषदेच्या सदस्यत्वापासून वंचित केला जाणारा रशिया हा दुसरा देश आहे.
- 2011 साली उत्तर आफ्रिकेतील लिबियामध्ये झालेल्या उलथापालथीत त्या देशाचे दीर्घकाळापासूनचे नेते मुअम्मर गडाफी यांना पदच्युत करण्यात आले, त्या वेळी आमसभेने त्या देशाचे सदस्यत्व स्थगित केले होते.
‘एअर इंडिया’ची मॉस्कोला जाणारी विमान वाहतूक स्थगित :
- ‘एअर इंडिया’ने रशियाची राजधानी मॉस्कोत जाणारी सर्व विमान उड्डाणे स्थगित केली आहेत.
- विमा कंपन्यांनी येथील सुरक्षेविषयी चिंता व्यक्त केल्याने टाटा समूह संचालित ‘एअर इंडिया’ने हा निर्णय घेतला व या प्रश्नी केंद्र सरकारला हस्तक्षेपाचे आवाहन केले.
- आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांनी ‘एअर इंडिया’ला कळविले, की रशियात जाणाऱ्या विमानांना विमा संरक्षण देता येणार नाही.
- तसेच युक्रेन-रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर तेथे असुरक्षितता निर्माण झाली आहे.
देशात निर्माण होणाऱ्या लष्करी यंत्रणा, शस्त्रांची यादी जाहीर :
- भारताच्या युद्धसाहित्य उद्योगाला नव्याने प्रेरणा देताना, पाच वर्षांत निर्यातबंदीखाली येणाऱ्या आणि देशातच विकसित केल्या जाणाऱ्या 101 हून अधिक लष्करी यंत्रणा व शस्त्रांची यादी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी जारी केली.
- तर या यादीत सेंसर्स, शस्त्रे व दारूगोळा, नौदलाच्या उपयोगाची हेलिकॉप्टर्स, गस्ती वाहने, जहाजविरोधी क्षेपणास्त्रे आणि किरणोत्सर्गविरोधी क्षेपणास्त्रे इत्यादी सामग्रीचा समावेश असल्याचे संरक्षणमंत्र्यांनी एका कार्यक्रमात ही यादी जारी करताना सांगितले.
- तसेच ही यादी जारी करण्यातून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेची जलद गती दिसून येते, असे ते म्हणाले.
- आर्टिलरी गन्स, कमी पल्ल्याची जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, क्रूझ क्षेपणास्त्रे व गस्ती वाहने यांचा समावेश असलेली 101 वस्तूंची पहिली यादी ऑगस्ट 2020 मध्ये जारी करण्यात आली होती.
कोरिया खुली बॅडिमटन स्पर्धात सिंधू, श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत :
- ऑल इंग्लंड उपविजेता लक्ष्य सेन आणि मालविका बनसोडचे कोरिया खुल्या बॅडिमटन स्पर्धेतील आव्हान गुरुवारी संपुष्टात आले.
- परंतु पी. व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत यांनी उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
- लक्ष्यने क्रमवारीत 24व्या क्रमांकावरील शेसार हिरेन ऱ्हुस्टाव्हिटोविरुद्ध 20-22, 9-21 अशी हार पत्करली.
- उदयोन्मुख मालविकाने थायलंडच्या पोन्रपावी चोचूवाँगकडून 8-21, 14-21 असा पराभव पत्करला.
- सिंधूने जपानच्या अया ओहोरीवर 21-15, 21-10 असा दमदार विजय मिळवला.
- जागतिक रौप्यपदक विजेत्या श्रीकांतने इस्रायलच्या मिशा झिल्बरमनचा 21-18, 21-6 असा पराभव केला.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धात हर्षद, बाला रफीक, पृथ्वीराजचे विजय :
- महाराष्ट्र केसरी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या खुल्या गटात बाला रफीक शेख, माऊली जमदाडे, सिकंदर शेख यांनी नेत्रदीपक विजय मिळवून तिसरी फेरी गाठली.
- तर गादी गटात हर्षवर्धन सदगीर, साताऱ्याचा दिग्विजय जाधव, कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील, कौतुक डाफळे यांनी विजयी घोडदौड कायम ठेवली आहे.
- सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने रत्नागिरीच्या संतोष दोरवडला चीतपट करीत सर्वानाच धक्का दिला.
- मुंबई शहरचा विशाल बनकर आणि पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील लढत रंगतदार ठरली.
- तसेच दुसऱ्या फेरीत बनकरने एकेरी पटाचे पकड करीत गुणफलक हलता ठेवून बलदंड ताकदीच्या मोहोळचे तगडे आव्हान परतून लावले.
- महाराष्ट्र केसरी बाला रफीक शेखने लातूरच्या भारत कराडला सुरुवातीपासून वरचढ ठरू दिले नाही.
- एकेरी पट आणि दुहेरी पट यासारख्या अस्त्रांचा वापर करून तांत्रिक गुणांवर भारतला पराभूत केले.
दिनविशेष :
- 8 एप्रिल आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
- 1911 मध्ये डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा शोध लावला.
- आचार्य विनोबा भावे यांनी 1921 मध्ये ‘पवनार’ आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
- भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील 1929 मध्ये सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
- 1950 मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये लयाकत-नेहरु करार झाला.
- मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक संयुक्त राष्ट्रात 1993 मध्ये सामील झाले.
- 1857च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू झाला.