8 August 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2022)
इस्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण :
कमीत कमी मनुष्यबळाच्या सहाय्याने अवघ्या काही दिवसा सज्ज होत उपग्रह प्रक्षेपण करणाऱ्या इस्रोच्या नव्या रॉकेटचे-प्रक्षेपकाचे-Small Satellite Launch Vehicle (SSLV)चे पहिले उड्डाण इस्रोच्या श्रीहरीकोटा तळावरुन यशस्वी पार पडले.
नव्या रॉकेटने त्याचे काम चोख बजावले असले, रॉकेटच्या सर्व टप्प्यांनी अपेक्षित कामगिरी जरी केली असली, उपग्रह जरी प्रक्षेपित झाले असले तरी इस्रोने मोहिम पुर्ण झाल्याची घोषणा केलेली नाही.
इस्रोचा नवा प्रक्षेपक SSLV ची उंची 34 मीटर असून व्यास दोन मीटर एवढा आहे.
या मोहिमेला इस्रोने SSLV-D1 असं नाव दिलं होते.
अवघ्या 100 टन वजनाचा SSLV हा नवा प्रक्षेपक फक्त सहा जणांची टीम अवघ्या सात दिवसांत उपग्रह प्रक्षेपणासाठी सज्ज करु शकते.
500 किलोग्रॅम वजनापर्यंतचे उपग्रह हे 500 किलोमीटर उंचीपर्यंत प्रक्षेपित करण्याची SSLVची क्षमता आहे.
तिच्या पाठोपाठ अमित पंघालनेही अंतिम सामन्यात विजय मिळवून सुवर्ण पदक मिळवले.
नितूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या डेमी-जेडचा पराभव केला.
अमितने पुरुषांच्या फ्लायवेट गटातील अंतिम फेरीत इंग्लंडच्या कियारन मॅकडोनाल्डचा पराभव केला.
भारतीय महिला हॉकी संघाला पदक जिंकण्यात यश :
बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने कांस्यपदक पटकावले आहे.
भारतीय संघाने पेनल्टी शूट आऊटमध्ये न्यूझीलंडचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
तब्बल 16 वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय महिला हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवले आहे.
भारताला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वादग्रस्त पराभवाला सामोरे जावे लागले होते.
भारताने 2002 मध्ये सुवर्ण आणि 2006 मध्ये रौप्यपदक जिंकले होते.
दिनविशेष :
8 ऑगस्ट हा ‘आंतरराष्ट्रीय मांजर दिन‘ आहे.
सन 1942 मध्ये 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर (ऑगस्ट क्रांति मैदान) झालेल्या अधिवेशनात चले जाव चा ठराव मंजुर केला. याप्रसंगी महात्मा गांधींनी करेंगे या मरेंगे हा संदेश दिला.
भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे ध्रुव ही भारताची सहावी व आतापर्यंतची सर्वात मोठी फास्ट ब्रीडर संशोधनपर अणुभट्टी 8 ऑगस्ट 1958 मध्ये कार्यान्वित झाली.
पुणे येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेने फक्त महिलांसाठीच असलेले देशातील पहिले वास्तुशास्त्र महाविद्यालय (Dr. Bhanuben Nanavati College of Architecture for Women) सन 1994 मध्ये 8 ऑगस्ट रोजी सुरू केले.
सन 1998 मध्ये संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) सात प्रयोगशाळा औद्योगिक क्षेत्रासाठी खुल्या झाल्या.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.