8 डिसेंबर 2020 चालू घडामोडी – Current Affairs

ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा
ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा

8 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 डिसेंबर 2020)

कृषी कायद्यांविरोधात आज ‘भारत बंद’:

  • तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या 12 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे.
  • तर सकाळी 8 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले.
  • तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम. कायद्यांमध्ये दुरुस्तीस तयार असल्याचा केंद्राचा पुनरुच्चार
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 डिसेंबर 2020)

ओरछा, ग्वाल्हेर शहरांना युनेस्कोचा वारसा दर्जा :

  • मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर व ओरछा या ऐतिहासिक शहरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा शहरांच्या यादीत स्थान मिळाले आहे. शहरी स्थळ शिल्प प्रवर्गात हा बहुमान मिळाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे.
  • तर राज्य सरकारच्या जनसंपर्क खात्याने म्हटले आहे की, ही दोन किल्ल्यांची शहरे आहेत त्यांना युनेस्कोचा वारसा दर्जा मिळाल्याबाबत पर्यटन तज्ज्ञांनी आनंद व्यक्त केला आहे.
  • संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना म्हणजे युनेस्कोने या शहरांना वारसा शहरांचा दर्जा दिला. त्यामुळे आता ग्वाल्हेर व ओरछा शहरांची स्थिती बदलणार आहे.
  • युनेस्को व राज्य सरकारचे पर्यटन खाते या शहरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करून त्यांचे सौंदर्य वाढवणार आहे.
  • युनेस्कोचे पथक पुढील वर्षी या दोन शहरांना भेट देणार असून तेथील वेगवेगळ्या ठिकाणांची पाहणी करणार आहे.
  • दक्षिण आशियासाठी आदर्शवत ठरेल असे प्रकल्प यात हाती घेतले जातील. यात शहर सौंदर्याबाबत काही सूचना केल्या जातील पण त्यात इतिहास हरवणार नाही याची काळजी घेतली जाईल.

केन विल्यमसनने विराट कोहलीला गाठलं संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर :

  • वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणाऱ्या केन विल्यमसनला आयसीसी क्रमवारीत चांगलाच फायदा झाला आहे. आयसीसी क्रमवारीत न्यूझीलंडच्या कर्णधाराने भारतीय कर्णधार विराट कोहलीसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
  • केन विल्यमसनचं द्विशतक आणि न्यूझीलंडच्या जलदगती गोलंदाजांच्या भेदक माऱ्याच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या कसोटी सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघावर एक डाव आणि 134 धावांनी मात केली होती.
  • तर दुसरीकडे स्टिव्ह स्मिथने क्रमवारीत आपलं पहिलं स्थान कायम राखलं असून भारताचा चेतेश्वर पुजाराही सातव्या स्थानी कायम राहिला आहे.
  • गोलंदाजीत न्यूझीलंडच्या निल वॅगनरच्या क्रमवारीत सुधारणा झाली असून तो दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताचा जसप्रीत बुमराह नवव्या स्थानी कायम आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही रविंद्र जाडेजाने आपलं तिसरं स्थान कायम राखलं आहे.

दिनविशेष:

  • हिंदी कवी पं. बाळकृष्ण शर्मा उर्फ नवीन यांचा जन्म 8 डिसेंबर 1897 मध्ये झाला होता.
  • भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत सन 1937 पासून धावू लागली.
  • भारत-पाकिस्तान युद्धामध्ये भारतीय आरमाराने पाकिस्तानमधील कराची बंदरावर सन 1971 मध्ये हल्ला केला.
  • सन 1985 मध्ये सार्क परिषदेची स्थापना झाली.
  • ‘रवींद्रनाथ टागोर‘ यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने सन 2004 मध्ये भेट दिली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 डिसेंबर 2020)

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.