Current Affairs (चालू घडामोडी)

8 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

8 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2019)

देशस्तरावर महाराष्ट्रातील 10 उमेदवारांची निवड:

  • भारतीय वनसेवेतील मराठी टक्केवारी गेल्या तीन वर्षांपासून वाढत आहे. नुकतेच जाहीर झालेल्या निकालाने त्यावर शिक्कामोर्तब केले. देशभरातून 89 उमेदवारांची निवड यात झाली असून त्यात महाराष्ट्रातील दहा उमेदवारांचा समावेश आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने डिसेंबर 2018 मध्ये मुख्य परीक्षा घेण्यात आली होती.
  • भारतीय वनसेवेत आधी महाराष्ट्राची टक्केवारी अतिशय कमी होती. आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश या राज्यातील उमेदवारांचेच वर्चस्व होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रातून मोठय़ा संख्येने उमेदवार निवडले जात आहेत.
  • मराठी टक्का वाढण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून वनखात्याकरिता खास मार्गदर्शनाचा एक वेगळा गट कार्यरत आहे. यामध्ये भारतीय पोलीस सेवेतील महेश भागवत यांच्यासह राज्याच्या वनखात्याचे प्रधान सचिव विकास खारगे, भारतीय वनसेवेतील सुनीता भागवत, राजस्थान कॅडरचे प्रवीण कासवान तसेच गेल्यावर्षी भारतीय वनसेवा परीक्षा उत्तीर्ण झालेले कस्तुरी सुटे, निखिल धवल, काजोल पाटील, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उधारे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले.
  • तर या 15 उमेदवारांपैकी काही जण नागरी सेवा मुलाखतीलासुद्धा आहेत. विशेष म्हणजे, भारतीय वनसेवेत अभियांत्रिकी, फार्मसी, कृषी विषयातील विद्यार्थी आहेत. बुधवारी अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आली.

हवाईदल-इस्रोची संयुक्त अंतराळ मोहीम:

  • अंतराळात मानव पाठविण्याच्या मोहिमेची तयारी सुरू झाली असून, यासाठी इस्रो आणि हवाईदल यांच्यात संयुक्त प्रयत्न सुरू झाले आहेत, अशी माहिती लष्करी वैद्यकीय सेवेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल बिपीन पुरी यांनी दिली.
  • लष्करी वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी) तर्फे 67व्या वार्षिक लष्करी वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पुरी बोलत होते.
  • पुरी म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत अंतराळ मानवाच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत निराकरण आणि येणारी आव्हाने या संदर्भात संशोधन करण्यासाठी बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट आॅफ एरोस्पेस मेडिसिन यांच्या पुढाकाराने हे काम हाती घेण्यात आले आहे. या संदर्भात इस्रो आणि हवाई दलाच्या मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका झाल्या असून, प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.
  • अंतराळ क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी भारताकडून मोठे प्रयत्न केले जात आहेत. अंतराळात मानव पाठविण्याचा पंतप्रधान यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 2022 पर्यंत अंतराळात भारतीय मानवाला पाठविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे, असेही ते म्हणाले.

प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी आधार-पॅन लिंक अनिवार्य:

  • प्राप्तिकर विवरण भरण्यासाठी यंदापासून आधार क्रमांक आणि पॅन क्रमांक लिंक करणे अनिवार्य असणार आहे. सुप्रीम कोर्टाचे न्या. ए.के. सिक्री आणि न्या. एस ए. नजीर यांच्या खंडपीठाने याबाबत निर्देश दिले आहेत.
  • सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच ही बाब स्पष्ट केल्याचे सांगताना इन्कम टॅक्स अॅक्टमधील कलम 139एए कायम ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
  • दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणात दिलेल्या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे आदेश दिले. दिल्ली हायकोर्टाने श्रेया सेन आणि जयश्री सातपुते यांना 2018-19साठी आधार-पॅन लिंक केल्याशिवाय प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास परवानगी दिली होती.
  • खंडपीठाने म्हटले की, हायकोर्टाच्या आदेशामुळे संबंधित प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. सुप्रीम कोर्टाने यावर निर्णय देताना इन्कम टॅक्स अॅक्टमधील कलम 139एएचे उल्लंघन मानले आहे. त्यामुळे आधार-पॅन लिंक करणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

व्हॉटसअ‍ॅपकडून दर महिन्याला वीस लाख अकाउंट बंद:

  • व्हॉटसअ‍ॅपचा उपयोग करणाऱ्या देशांत भारत अग्रेसर आहे. देशात व्हॉटसअ‍ॅपचे 20 कोटींहून अधिक यूजर्स आहेत. साहजिकच याचा दुरुपयोगही होत आहे.
  • तर त्यावर अंकुश लावण्यासाठी व्हॉटसअ‍ॅपकडून सतत प्रयत्न करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून व्हॉटसअ‍ॅपने महिन्याला 20 लाख अकाउंट बंद करणे सुरू केले आहे.
  • अकाउंट बंद करण्याचा रजिस्ट्रेशन हा यातील पहिला टप्पा आहे. या वेळी व्हॉटसअ‍ॅपकडून कोड एसएमएसद्वारे पाठविण्यात येतो. यूजर्सला हा नंबर टाकून पुढे जावे लागते.
  • तसेच जर तुमच्या नंबरद्वारे काही गैरवापर केला गेला असेल किंवा दुर्व्यवहार केला गेला असेल तर, व्हॉटसअ‍ॅपकडून रजिस्ट्रेशनवर प्रतिबंध आणण्यात येतो.

मीराबाई चानूचे ‘सुवर्णपदक’ पुनरागमन:

  • विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. या दुखापतीमुळे चानू 2018 मध्ये सहा महिन्यांपासून अधिक वेळ विविध स्पर्धांपासून दूर राहिली होती.
  • मिळालेल्या माहितीनुसार चानू हीने 48 किलो गटात 192 किलो वजन उचलून सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्ण मिळवले आहे. टोकियो 2020 आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्या कटसाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वपूर्ण ठरतील.
  • चानूने स्नॅचमध्ये 82 किलो व क्लिन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 110 किलो वजन उलचून अव्वल स्थान मिळवले. दुखापतीतून सावरण्यासाठी तिला विस्तृत फिजीओथेरपी करावी लागली.
  • चानू ही दुखापतीमुळे गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. ही स्पर्धा गोल्ड लेव्हल आॅलिम्पिक पात्रता आहे. तिला दुखापतीमुळे जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते.

दिनविशेष:

  • भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषणभारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
  • सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
  • NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.
  • सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

View Comments

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago