8 फेब्रुवारी 2022 चालू घडामोडी – Current Affairs

नितीन गडकरी
नितीन गडकरी

8 February 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2022)

इंदूरमध्ये लतादिदींच्या नावे संगीत अकादमी व संग्रहालय उभारणार :

  • भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं रविवारी निधन झालं.
  • तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी महत्वाची घोषणा केली आहे.
  • इंदूरमध्ये स्व. लता मंगेशकर यांच्या नावाने संगीत अकादमी स्थापन केली जाईल.
  • तसेच एक संग्रहालयही बांधले जाईल, ज्यामध्ये लताजींनी जे काही गायले आहे ते उपलब्ध असेल.
  • इंदूरमध्येच त्यांचा पुतळा बसवला जाईल आणि दरवर्षी त्यांच्या वाढदिवशी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे.

जेएनयूला मिळाल्या पहिल्या महिला कुलगुरू :

  • प्राध्यापिका शांतिश्री धुलीपुडी पंडित यांची देशातील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) नवीन कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
  • तर शांतिश्री धुलीपुडी पंडित या जेएनयूच्या पहिल्या महिला कुलगुरू असतील.
  • तसेच त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल. याआधी त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक होत्या.
  • शांतिश्री धुलीपुडी, या जेएनयूच्या 13 व्या कुलगुरू होणार आहेत.
  • पंडित या प्राध्यापक एम. जगदेश कुमार यांच्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) अध्यक्षपदी नियुक्त होणार आहे.
  • जेएनयूच्या कुलगुरूपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ गेल्या वर्षी पूर्ण झाल्यापासून एम जगदेश कुमार हे कार्यवाहक कुलगुरू म्हणून जबाबदारी पार पाडत होते.

नितीन गडकरी यांना कार्यक्षम खासदार पुरस्कार जाहीर :

  • नाशिक येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारा 2020-21- वर्षासाठीचा कार्यक्षम खासदार पुरस्कार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जाहीर झाला आहे.
  • 10 फेब्रुवारी रोजी दुपारी साडेबारा वाजता नवी दिल्लीतील निवासस्थानी गडकरी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • तसेच यापूर्वी हा पुरस्कार महाराष्ट्रातील कार्यक्षम आमदारांना दिला जात होता.
  • तर आता या पुरस्काराची व्याप्ती वाढविण्यात आली असून वर्षाआड हे पुरस्कार विधीमंडळ सदस्य आणि संसद सदस्य यांना दिले जाणार आहेत.
  • रुपये 50 हजार रोख, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अहमदाबाद संघाचं नाव ठरलं :

  • आयपीएल 2022च्या तयारीला सुरुवात झाली आहे.
  • आयपीएलच्या या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नव्या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
  • अहमदाबाद फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली आहे. हा संघ आता अहमदाबाद टायटन्स नावाने ओळखला जाईल.
  • तर अहमदाबादपूर्वी लखनऊ फ्रेंचायझीने आपल्या संघाच्या नावाची घोषणा केली. लखनऊ संघाने नाव लखनऊ सुपरजायंट्स असे आहे.
  • केएल राहुल लखनऊ संघाचा कप्तान आहे, तर हार्दिक पंड्या अहमदाबाद संघांचे नेतृत्व करणार आहे.

दिनविशेष:

  • भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
  • सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
  • NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.
  • सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.