8 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs

NISAR
NISAR

8 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 फेब्रुवारी 2023)

व्हिक्टोरिया गौरी यांना न्यायमूर्तीपदाची शपथ:

  • मद्रास उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी लक्ष्मणा चंद्र व्हिक्टोरिया गौरी यांची नियुक्ती होऊ नये, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी सकाळी फेटाळली.
  • मात्र त्यापूर्वीच त्यांनी न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली.
  • व्हिक्टोरिया गौरी यांना न्यायमूर्तीपदावर नियुक्त का केले जाऊ नये यावर सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू असतानाच हा शपथविधी झाला.

फक्त 12 दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली उपग्रह मोहिम:

  • अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे.
  • NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar.
  • बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.
  • या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली.
  • या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
  • आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे.
  • पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.
  • एका SUV च्या आकाराच्या या उपग्रहाचे वजन हे सुमारे 2700 किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे 747 किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे.
  • या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान 2014 मध्ये करार करण्यात आला होता.
  • उपग्रहामध्ये मुख्यतः synthetic aperture radar (SAR)चा वापर केला गेला आहे.
  • तसंच 12 मीटर (39 फूट ) व्यासाची एक जाळीदार अँटिना या उपग्रहाला असणार आहे.
  • यामुळे ढगाला भेदत, कोणत्याही वातावरणात जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.
  • विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या 12 दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे.
  • विशेषतः पृथ्वीच्या कवचामध्ये होणार बदल, त्याच्या हालचालीची अचूक नोंद करणे शक्य होणार आहे.
  • यामुळे भूकंप, भूस्खलन किंवा जमिनीवरील अन्य घटनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.
  • तसंच भूजल पातळी, बर्फाची जाडी, बर्फाची हालचाल, हिमनदीचा प्रवाह यांच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे.
  • यामुळे पर्यावरणातील बदलांची नोंद, अभ्यास करणे आणि त्यावरुन अचूक अनुमान काढण्यास मदत होणार आहे.

आता परदेशातदेखील करता येणार PhonePe वरून पेमेंट:

  • भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पैकी एक असणाऱ्या फोन  पे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे.
  • फोन पेच्या या नवीन फीचरमुळे वापरकर्ते केवळ भारतातच नव्हे तर, इतर देशांमध्येही UPI द्वारे सहज पेमेंट करू शकणार आहेत.
  • म्हणजे फोन पे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मम्दत करणार आहे.
  • फोन पे ही पहिली कंपनी आहे जिने वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त फिचर तयार केले आहे.
  • फोन पे ने आणलेले हे फिचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
  • इतर देशांमध्ये प्रवास करताना तुम्ही PhonePe अ‍ॅपवरून UPI द्वारे प्रदेश व्यापाऱ्यांना , लोकांना सहज पैसे देऊ शकणार आहात.
  • हे व्यवहार तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डप्रमाणेच काम करणार आहे. पेमेंट केल्यावर तुमच्या बँक खात्यामधून परकीय चलन कापले जाणार आहे.
  • सध्या सुरुवातीच्या काळात या फीचरचा उपयोग संयुक्त अरब आमिराती तसेच मॉरिशस , सिंगापूर , भूतान आणि नेपाळ सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी ज्यांच्याकडे स्थानिक QR कोड आहे ते या फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत.

अ‍ॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती:

  • ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती.
  • पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे.
  • फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
  • फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे.
  • अ‍ॅरॉन फिंच तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.

ICC Player of the Month नामांकन जाहीर:

  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी महिन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना एक पुरस्कार देत आहे.
  • त्यामुळे मंगळवारी आयसीसीने जानेवारी 2023 साठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर केली.
  • दरवेळेप्रमाणे आयसीसीने गेल्या महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंची निवड केली आहे.
  • ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.
  • आयसीसीने दोन भारतीय आणि एका न्यूझीलंडच्या खेळाडूची प्लेअर ऑफ द मंथ नामांकन म्हणून निवड केली आहे.
  • भारताच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजला यांना स्थान मिळाले आहे, तर न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
  • या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.

आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी:

  • पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे.
  • भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे.
  • खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
  • आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत.
  • आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही.

दिनविशेष:

  • भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्‍न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
  • सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
  • NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.
  • सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
  • छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.
You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.