फक्त 12 दिवसांत संपूर्ण पृथ्वीचा नकाशा तयार करण्याची क्षमता असलेली उपग्रह मोहिम:
अमेरिकेतील प्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था नासा ( National Aeronautics and Space Administration – NASA) आणि भारताची इस्रो ( Indian Space Research Organisation -ISRO) यांनी संयुक्तरित्या NISAR या कृत्रिम उपग्रहाची निर्मिती केली आहे.
NISAR म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar.
बहुदा पहिल्यांदाच भारत आणि अमेरिकेने एकत्र येत पृथ्वीचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिम हाती घेतली आहे.
या उपग्रहाची निर्मिती ही अमेरिकेतील प्रसिद्ध Jet Propulsion Laboratory (JPL) या प्रयोगशाळेत झाली.
या उपग्रहाचा आराखड तयार करणे आणि प्रत्यक्षात आणणे यामध्ये अर्थात इस्त्रोनेही महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
आता हा उपग्रह लवकरच भारताकडे रवाना केला जाणार आहे.
पुढील वर्षी सुरुवातीच्या काही महिन्यात या NISAR उपग्रहाचे प्रक्षेपण आंध्र प्रदेश इथल्या श्रीहरीकोटाहून केलं जाणार आहे.
एका SUV च्या आकाराच्या या उपग्रहाचे वजन हे सुमारे 2700 किलो एवढे असून पृथ्वीपासून सुमारे 747 किलोमीटर अंतरावर प्रक्षेपित केला जाणार आहे.
या उपग्रहाच्या निर्मितीबाबत आणि संशोधनाबाबत भारत आणि अमेरिका दरम्यान 2014 मध्ये करार करण्यात आला होता.
उपग्रहामध्ये मुख्यतः synthetic aperture radar (SAR)चा वापर केला गेला आहे.
तसंच 12 मीटर (39 फूट ) व्यासाची एक जाळीदार अँटिना या उपग्रहाला असणार आहे.
यामुळे ढगाला भेदत, कोणत्याही वातावरणात जमिनीची अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रे काढणे शक्य होणार आहे.
विशिष्ट उंची आणि शक्तीशाली रडार यामुळे अवघ्या 12 दिवसांत दिवसांत अत्यंत सुस्पष्ट छायाचित्रांसह संपूर्ण पृथ्वीचा नकाशा-जमिनीची मोजदाद करणे या उपग्रहामुळे शक्य होणार आहे.
विशेषतः पृथ्वीच्या कवचामध्ये होणार बदल, त्याच्या हालचालीची अचूक नोंद करणे शक्य होणार आहे.
यामुळे भूकंप, भूस्खलन किंवा जमिनीवरील अन्य घटनांची नोंद ठेवणे शक्य होणार आहे.
तसंच भूजल पातळी, बर्फाची जाडी, बर्फाची हालचाल, हिमनदीचा प्रवाह यांच्या अचूक नोंदी घेणे शक्य होणार आहे.
यामुळे पर्यावरणातील बदलांची नोंद, अभ्यास करणे आणि त्यावरुन अचूक अनुमान काढण्यास मदत होणार आहे.
आता परदेशातदेखील करता येणार PhonePe वरून पेमेंट:
भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म पैकी एक असणाऱ्या फोन पे ने आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन फिचर लाँच केले आहे.
फोन पेच्या या नवीन फीचरमुळे वापरकर्ते केवळ भारतातच नव्हे तर, इतर देशांमध्येही UPI द्वारे सहज पेमेंट करू शकणार आहेत.
म्हणजे फोन पे तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यवहार करण्यास मम्दत करणार आहे.
फोन पे ही पहिली कंपनी आहे जिने वापरकर्त्यांसाठी हे उपयुक्त फिचर तयार केले आहे.
फोन पे ने आणलेले हे फिचर परदेशात जाणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त आहे.
इतर देशांमध्ये प्रवास करताना तुम्ही PhonePe अॅपवरून UPI द्वारे प्रदेश व्यापाऱ्यांना , लोकांना सहज पैसे देऊ शकणार आहात.
हे व्यवहार तुमच्या आंतरराष्ट्रीय डेबिट कार्डप्रमाणेच काम करणार आहे. पेमेंट केल्यावर तुमच्या बँक खात्यामधून परकीय चलन कापले जाणार आहे.
सध्या सुरुवातीच्या काळात या फीचरचा उपयोग संयुक्त अरब आमिराती तसेच मॉरिशस , सिंगापूर , भूतान आणि नेपाळ सर्व आंतरराष्ट्रीय व्यापारी ज्यांच्याकडे स्थानिक QR कोड आहे ते या फीचरचा लाभ घेऊ शकणार आहेत.
अॅरॉन फिंचने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती:
ऑस्ट्रेलियाचा टी-20 कर्णधार अॅरॉन फिंचने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फिंचने वनडे आणि कसोटीआधीच निवृत्ती घेतली होती.
पण आता त्याने टी-20 क्रिकेटलाही अलविदा केला आहे.
फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने दुबईत झालेल्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले.
फिंचने 12 वर्षे ऑस्ट्रेलियासाठी क्रिकेट खेळले आहे.
अॅरॉन फिंच तो मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होता.
ICC Player of the Month नामांकन जाहीर:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसी महिन्यातील कामगिरीच्या आधारे खेळाडूंना एक पुरस्कार देत आहे.
त्यामुळे मंगळवारी आयसीसीने जानेवारी 2023 साठी प्लेअर ऑफ द मंथसाठी नामांकने जाहीर केली.
दरवेळेप्रमाणे आयसीसीने गेल्या महिन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या तीन खेळाडूंची निवड केली आहे.
ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे.
आयसीसीने दोन भारतीय आणि एका न्यूझीलंडच्या खेळाडूची प्लेअर ऑफ द मंथ नामांकन म्हणून निवड केली आहे.
भारताच्या शुबमन गिल आणि मोहम्मद सिराजला यांना स्थान मिळाले आहे, तर न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉनवेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
या तिन्ही खेळाडूंनी जानेवारी महिन्यात क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
आफ्रिदीवर घातली दोन वर्षांची बंदी:
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून स्पिनर आसिफ आफ्रिदीवर बंदी घालण्यात आली आहे.
भ्रष्टाचारविरोधी संहितेचा भंग केल्याप्रकरणी दोन वर्षांची बंदी घातली आहे.
खैबर पख्तुनख्वामधील या डावखुऱ्या फिरकीपटूवर भ्रष्टाचारविरोधी संहितेचे दोनदा उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
आसिफने राष्ट्रीय टी-२० चषकातील बहुतेक सामने गमावले आहेत.
आता तो दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट स्पर्धामध्ये भाग घेऊ शकणार नाही.
दिनविशेष:
भारताचे तिसरे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न डॉ. झाकिर हुसेन यांचा जन्म 8 फेब्रुवारी 1897 मध्ये झाला.
सन 1936 मध्ये 16 सप्टेंबर 1935 रोजी नोंदणी झालेल्या बँक ऑफ महाराष्ट्र चे कामकाज सुरू झाले.
NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सन 1971 पासून सुरू झाला.
सन 1994 मध्ये भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी 432 बळींचा जागतिक विक्रम केला.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय सन 2000 या वर्षीपासून घेण्यात आला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.