8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (8 मार्च 2023)
नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी:
भारत आणि इस्राईल यांनी संयुक्तरित्या विकसित केलेल्या जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची नौदलाची नुकतीच यशस्वी चाचणी केली.
नौदलाच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौकेवरुन ही रात्रीच्या सुमारास चाचणी घेण्यात आली.
जमिनीवरुन हवेतील लक्ष्य भेदणाऱ्या क्षेपणास्त्राला तांत्रिकदृष्ट्या MR-SAM म्हणजेच medium range mobile surface to air missile म्हंटलं जातं, नौदलाने विकसित केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आहे Barak 8.
नौदलाचे हे एक प्रमुख क्षेपणास्त्र असून यामुळे नौदलाच्या प्रहार क्षमतेत मोलाची भर पडली आहे.
70 किलोमीटर अंतरापर्यंत आणि 16 किलोमीटर उंचीपर्यंतचे कोणतेही लक्ष्य मग ते लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, ड्रोन भेदण्याची क्षमता क्षेपणास्त्रामध्ये आहे.
ध्वनीच्या दुप्पट वेगाने संचार करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्राचा मारा चुकवणे अवघड समजले जाते.
अंतराळवीरांना अवकाशातून जमिनीवर घेऊन येणाऱ्या यानावरील पॅराशुटची यशस्वी चाचणी:
भारताची अंतराळ संशोधन संस्था म्हणजे Indian Space Research Organisation ( ISRO ) संस्था पुढील वर्षी म्हणजे 2024 ला भारतीय अंतराळवीर अवकाशात पाठवणार आहे.
स्बबळावर अवकाशवीरांना अंतराळात पाठवणारा भारत हा चौथा देश ठरणार आहे.
यासाठी इस्रोने गगनयान ( Gaganyaan ) मोहिम हाती घेतली आहे.
या मोहिमेत अवकाश यानातून तीन अंतराळवीर अवकाशात पाठवले जाणार आहे.
याचाच एक भाग म्हणून अंतराळवीर ज्या अवकाश यानातून अवकाशात संचार करत परत पृथ्वीवर येणार आहेत त्या यानाच्या विविध चाचण्या सुरु आहेत.
त्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या पॅराशुटची यशस्वी चाचणी चंदीगढ इथे पूर्ण केल्याचं इस्रोने नुकतंच जाहिर केलं आहे.
अवकाश यानाला दोन पॅराशुट असणार आहेत.
पहिलं पॅराशुट हे अवकाशातून जमिनीच्या दिशेने येणाऱ्या अवकाश यानाचा प्रचंड वेग कमी करण्यास मदत करणार आहे.
तर दुसरं पॅराशुट जे अत्यंत मोठं असणार आहे ते अलगदपणे यानाला जमिनीवर उतरवणार आहे.
‘नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी’चे (एनडीपीपी) नेते नेफ्यू रियो यांनी मंगळवारी पाचव्यांदा नागालँडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
राज्यपाल ला गणेशन यांनी 72वर्षीय रियो यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
‘एनडीपीपी’चे टी. आर. झेलियांग व भाजपचे वाय. पॅटन यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
क्रूस आणि हेकानी जाखलू प्रथमच नागालँड विधानसभा सदस्यपदी निवडून आल्या आहेत.
टेलिमेडिसीन सेवा विस्ताराची आरोग्य विभागाची महत्त्वाकांक्षी योजना:
ग्रामीण, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळण्यासाठी सुमारे दीड दशकापूर्वी आरोग्य विभागाने सुरू केलेल्या टेलिमेडिसीन उपक्रमाचा, तसेच इ – संजीवनी योजनेचा व्यापक विस्तार करण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
ग्रामीण भागातील रुग्णांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असून आरोग्य विभागाच्या या दोन योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत 67 लाख 44 हजार 383 रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.
आरोग्य विभागाने ‘इस्रो’च्या मदतीने महाराष्ट्रात सप्टेंबर 2006 साली ही टेलिमेडिसीन सेवा सुरू केली होती.
केंद्र सरकारने कालांतराने यात पुढाकार घेऊन देशभरात ‘इ – संजीवनी’ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून टेलिमेडिसीन योजना राबविण्यास सुरुवात केली.
आरोग्य विभागाच्या टेलिमेडिसीन सेवेचा लाभ प्रामुख्याने जिल्हा रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, सामान्य रुग्णालये, तसेच ग्रामीण व स्त्री रुग्णालयांमध्ये उपचारासाठी केला जातो.
तर इ – संजीवनी ही केंद्र शासनाअंतर्गत येणाऱ्या योजनेच्या माध्यमातून आरोग्य उपकेंद्र, ग्रामीण व शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये राबविण्यात येते.
मराठी क्रीडा पत्रकारितेचे जनक वि. वि. करमरकर यांचं निधन:
चिकित्सक पत्रकारिता व विश्लेषणात्मक लेखनशैलीचा आयाम मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये रुजवणारे आणि मराठी दैनिकांमध्ये क्रीडा पान ही संकल्पना प्रथम राबवणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, संपादक, समीक्षक आणि लोकप्रिय समालोचक विष्णू विश्वनाथ तथा वि. वि. करमरकर यांचे निधन झाले. ते
1960च्या आधी मराठी दैनिकांमध्ये खेळांच्या बातम्यांना प्रमुख स्थान नव्हते. ते करमरकर यांनी मिळवून दिले.
1962मध्ये ‘महाराष्ट्र टाइम्स’ हे दैनिक सुरू झाल्यानंतर या दैनिकाच्या पहिल्या चमूमध्ये करमरकर यांचा सहभाग होता.
करमरकर यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे कालांतराने संपूर्ण पान खेळांच्या पानाला मिळाले.
दिनविशेष:
8 मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन‘ म्हणून पाळला जातो.
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना सन 1817 मध्ये झाली.
सन 1911 या वर्षी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.
1948 मध्ये भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.
तसेच सन 1948 मध्ये फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations)सन 1957 मध्ये प्रवेश झाला.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.