Current Affairs (चालू घडामोडी)

8 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना

8 May 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 मे 2020)

SBI कडून लॉकडाऊनमध्ये मोठा दिलासा :

  • देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेंट बँकेने एमसीएलआर आधारित कर्जांच्या व्याजदरात 15 बेसिस पॉईंटची कपात केली आहे. ही कपात सर्व मुदतीच्या कर्जावर करण्यात आली आहे.
  • यामुळे एका वर्षाच्या कर्जावरील व्याजदर 7.40 वरून 7.25 टक्के झाला आहे. हे नवीन दर 10 मे पासून लागू होणार आहेत. बँकेने सांगितले की, सलग 12 वेळा व्याजदरामध्ये कपात करण्यात आली आहे.
  • याचबरोबर स्टेट बँकेने टर्म डिपॉजिटला मोठा धक्का दिला आहे. मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असून 20 बेसिस पॉईंटनी ही कपात केली जाणाक आहे.
  • तर ही कपात 12 मे पासून लागू होणार असून तीन वर्षांच्या अवधीसाठी ही कपात असणार आहे.
  • तसेच स्टेट बँकेने वरिष्ठ नागरिकांसाठी एसबीआय वुई केअर डिपॉझिट स्कीम सुरु केली आहे. यानुसार ज्येष्ठ नागरिकांना 5 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त अवधीच्या ठेवींवर 30 बेसिस पॉईंट एवढा जादा व्याजदर मिळणार आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 मे 2020)

गरिबांसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना :

  • करोना विषाणूशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. करोनाच्या महासाथीमुळे बाधित झालेल्या देशभरातील कुटुंबांना मोफत धान्यपुरवठा करण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला असून त्यासाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली आहे.
  • करोनाच्या महासाथीमुळे अन्नधान्याचा तुटवडा होऊ शकतो किंवा अन्नधान्य उपलब्ध होऊ शकत नसल्याचे लक्षात घेऊन सरकारने गरीब कुटुंबांसाठी तीन महिन्यांचे धान्य पुरवण्याचे ठरवले आहे.
  • 80 कोटी लोकांना म्हणजेच एकूण लोकसंख्येच्या दोन तृतीयांश लोकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
  • त्यांना सध्या मिळत असलेल्या धान्याच्या दुप्पट धान्य पुढील तीन महिने देण्यात येणार असून ते मोफत असणार आहे.
  • या योजनेंतर्गत करोनामुळे बाधित झालेल्या देशभरातील गरीब कुटुंबांना 120 लाख मेट्रिक टन धान्य वितरित केले जाणार आहे.
  • राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमानुसार येणाऱ्या कुटुंबांना एप्रिल, मे आणि जून 2020 मध्ये त्यांना मिळणाऱ्या धान्याच्या दुप्प्ट धान्य मिळणार असून अंत्योदय अन्न योजनेच्या लाभधारकांनाही त्यांना मिळणाऱ्या नियमित धान्याबरोबरच 5 किलो जास्तीचे धान्य वितरित करण्यात येणार आहे. या योजनांना राज्य सरकारकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून 6 मेपर्यंत 69.28 लाख मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे.
  • सरकारला या योजनेतील धान्य, त्याच्या वाहतुकीसाठी, साठवणुकीसाठी तसेच वितरण करण्यासाठी 46 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे.

ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश वरळीकर यांचे निधन :

  • ज्येष्ठ सांख्यिकी तज्ञ रमेश माधवराव वरळीकर यांची वयाच्या 83 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
  • रमेश वरळीकर हे लहानपणापासूनच खो-खो खेळाच्या प्रेमात पडलेले होते. प्रभाकर वरळीकर यांनी सुरू केलेल्या लोकसेना या खो-खो संघाचे ते एक यशस्वी प्रशिक्षक होते.
  • त्यांनी घडवलेल्या नामवंत राष्ट्रीय खो-खो खेळाडूंमध्ये डॉ. हेमा नेरवणकर, प्रतिभा गोखले, रेखा राय तसेच बँक ऑफ इंडियाचा दिनेश परब हे सर्व त्यांनी घडवलेले खेळाडू होत.
  • 1970 पर्यंत यांनी प्रशिक्षक म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली.
  • यादरम्यान रमेश वरळीकर हे मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागाचे पदाधिकारी होते. त्याकाळी पंच म्हणून रमेश वरळीकर यांनी भरपूर काम केले होते.

WhatsApp मध्ये येतंय Link Device चं फीचर :

  • WhatsApp लवकरच एक महत्वपूर्ण फीचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. या फीचरच्या माध्यमातून एका WhatsApp अकाऊंटला मल्टिपल डिव्हाईसला लिंक करता येऊ शकेल.
  • मल्टी डिव्हाईस सपोर्टच्या फीचरसाठी गेल्या काही दिवसांपासून टेस्टिंग करण्यात येत होती.
  • WABetainfo च्या एका रिपोर्टनुसार, Linked Device एक ऑप्शन सुद्धा दाखविण्यात आला आहे. याचा स्क्रिनशॉट सुद्धा शेअर करण्यात आला आहे. WhatsApp च्या लेटेस्ट बीटामध्ये Linked Device ची स्क्रीन दिली आहे. हे Android 2.20.143 चे अपडेट आहे.
  • मल्टी डिव्हाइस सपोर्ट आल्यानंतर एकाचवेळी एकाहून अधिक स्मार्टफोनवर व्हॉट्सअॅप सुरु केले जाऊ शकते. या स्क्रीन शॉटमध्ये लिहिले आहे की, “दुसऱ्या डिव्हाईसमध्ये सुद्धा व्हॉट्सअॅपचा वापर करा. आपल्या कॅम्प्युटर किंवा फेसबुक पोर्टलवरून मेसेज पाठवा किंवा रिसिव्ह करा.”
  • तर या स्क्रीनशॉटमध्ये एक ग्रीन बटन दिसत आहे. यामध्ये Link Device लिहिले आहे. रिपोर्टनुसार, सध्या या फीचरचे डेव्हलपमेंट सुरु आहे. मात्र, कंपनीने हे फीचर कधी आणले जाणार, याबाबत अद्याप स्पष्ट केले नाही.
  • दुसर्‍या रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, मल्टी डिव्हाईस सपोर्ट सामान्य अॅपपेक्षा थोडा वेगळा असणार आहे. त्याला वायफायची गरज असण्याची शक्यता आहे.
  • मोबाइल डेटा कमी होऊ शकतो किंवा त्याचा वापर जास्त होऊ शकतो म्हणून यासाठी वायफायला कनेक्ट करण्यास सांगितले जाऊ शकते.
  • दरम्यान, सध्या एका मोबाईलवर एक व्हॉट्सअॅपचा वापर होतो. याशिवाय, डेस्कटॉप अॅप किंवा व्हॉट्सअॅप वेब वापरू शकता.

दिनविशेष :

  • 8 मे : आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन
  • जॉन पेंबरटन यांनी कोका कोला हे पेय पहिल्यांदाच 8 मे 1886 मध्ये तयार करुन विकले.
  • क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना 8 मे 1899 मध्ये फाशी.
  • 8 मे 1933 मध्ये महात्मा गांधी यांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध आपले 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
  • 8 मे 1945 मध्ये दुसरे महायुद्ध – युरोप विजय दिन – जर्मनीची दोस्त राष्ट्रांसमोर बिनशर्त शरणागती, युरोपमधील युद्ध समाप्त.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 मे 2020)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago