Current Affairs (चालू घडामोडी)

8 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

भारतीय हवाई दलाचा 88 व्या वर्धापनदिन

8 October 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (8 ऑक्टोबर 2020)

भारतीय हवाई दलाचा 88 व्या वर्धापनदिन:

  • आज 8 ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. 88 वर्षांपूर्वी 1932 साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली.
  • मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय हवाई दलाबद्दलच्या काही खास गोष्टी
  • नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते.
  • भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.
  • सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
  • 12 मार्च इ.स. 1945 रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. 1950 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.
  • भारतीय हवाई दल हे जगातील सर्वात शक्तीशाली हवाई दलाच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी आहे. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनकडे भारतापेक्षा अधिक मोठे हवाई दल आहे.
  • भारतीय हवाई दलाची एकूण 60 एअरबेस देशभरामध्ये आहेत. एकूण 1 हजार 700 हून अधिक लढाऊ विमाने तसेच हॅलिकॉप्टर्स भारतीय हवाई दलाकडे आहे.
  • यामध्ये 500 हून अधिक मालवाहू विमानांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवाई दलाकडे अनेक हॅलिकॉप्टर्सही आहे.
  • एकूण सात कमांड्सकडे या सर्व एअरबेसची विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये वेस्टर्न एअर कमांडअंतर्गत सर्वाधिक म्हणजे 16 एअरबेस आहेत तर सर्वात कमी म्हणजे सात एअरबेसचे नियंत्रण सेंट्रल एअर कमांडकडे आहे.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (7 ऑक्टोबर 2020)

बडय़ा कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढा – हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हज:

  • अ‍ॅमॅझॉन, अ‍ॅपल, फेसबुक व गूगल या कंपन्यांनी त्यांच्या मक्तेदारीच्या अधिकाराचा वापर आणि दुरुपयोग केल्याचे स्पष्ट करीत अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हज’च्या एका समितीने कायद्यांमध्ये सुधारणा करून बडय़ा कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढा अशी शिफारस केली आहे.
  • जगातील सर्वात मोठय़ा असलेल्या या तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत 15 महिने तपास केल्यानंतर संबंधित कायद्यांमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे.
  • या चार कंपन्यांचे रूपांतर ‘विस्कळीत’ अशा स्टार्टअपमधून मक्तेदार स्वरूपाचे बनले आहे, असे हाऊस ज्युडिशियरी कमिटीने सादर केलेल्या 449 पानांच्या अहवालात लोकप्रतिनिधींनी म्हटले आहे.
  • ज्यामुळे स्पर्धा पुनस्र्थापित होईल, नवोपक्रमांमध्ये सुधारणा होईल आणि आमच्या लोकशाहीचे संरक्षण होईल अशी कार्यवाही काँग्रेस व आमच्या यंत्रणांनी करण्याची स्पष्टपणे आवश्यकता असल्याचे तपासातून नि:संशयपणे स्पष्ट झाले आहे’, असे ज्युडिशियरी कमिटीचे अध्यक्ष जेरॉल्ड नॅडलर आणि अँटीट्रस्ट उपसमितीचे अध्यक्ष डेव्हिल सिसिलाईन यांनी एका संयुक्त निवेदनात सांगितले.

दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ:

  • जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.
  • या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.
  • रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे.
  • दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस 9’ तंत्रज्ञान शोधून काढले होते.
  • ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते.
  • रेणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.

40 दिवसात भारताने चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या:

  • भारताने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती दिली आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मागच्या 40 दिवसात भारताने चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या.
  • एका क्षेपणास्त्र LAC वर तैनात केले. सैन्य दलात औपचारिक समावेश करण्याआधीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत.
  • पाच हजार किलोमीटर रेंज असलेल्या K-5, या पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा प्रगती झाली आहे.

जबेरमुळे अरब देशांमध्ये टेनिसक्रांती:

  • टय़ुनिशियाच्या ओन्स जबेरला मंगळवारी फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात अपयश आले असले तरी तिच्या स्वप्नवत वाटचालीमुळे अरब देशांमध्ये पुन्हा एकदा टेनिसक्रांती घडून आली आहे.
  • 26 वर्षीय जबेरला डॅनिल कॉलिन्सने पराभूत केले. मात्र याच स्पर्धेतील पहिल्या फेरीत कॅरोलिना प्लिस्कोव्हा आणि इजिप्तच्या मायर शेरिफ यांच्यातील लढत पाहून जबेर भावूक झाल्याचे दिसून आले.
  • त्याशिवाय चौथ्या लढतीत पराभूत झाल्यानंतरही जबेरच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले.
  • जबेर आणि शेरिफ यांच्या रुपात प्रथमच अरबच्या दोन महिला एखाद्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळत होत्या. त्यामुळे अरब देशांमधील नागरिकांसाठी हा अभिमानाचा क्षण होता.

दिनविशेष:

  • संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला.
  • इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट व्दारे 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय वायूदलाची स्थापना झाली. तेव्हा पासून हा दिवस ‘भारतीय वायुसेना दिन’ म्हणून पाळला जातो.
  • सन 1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
  • 11 सप्टेंबरच्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सन 2001 मध्ये सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (9 ऑक्टोबर 2020)

Vaishnavi Jadhav

Vaishnavi Jadhav is a copywriter and content writer who specializes in the latest educational happenings. She completed her master's degree and looking to expand her skills here at MPSC World.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago