9 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
9 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जुलै 2020)
भारतीय जवानांना 89 अॅप्स काढून टाका असा आदेश:
- भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून 89 अॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
- भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे.
- भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे.
- 15 जुलैपर्यंत अॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराने अधिकारी, जवानांना दिले आहेत.
Must Read (नक्की वाचा):
कोरोन आजाराची नवीन लाट- मेंदूशी संबंधित:
- जगभरात थैमान घेतलेल्या कोविड-१९ आजारावर विविध देशांमध्ये सध्या संशोधनं सुरु आहेत.
- एका परदेशी विद्यापीठातील वैज्ञानिकांनी या आजाराबाबत नवा इशारा दिला आहे. करोनासंबंधित मेंदूच्या आजारांची नवी लाट येण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
- युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) येथील एका संशोधनानुसार, करोनाची लागण झालेल्या काही रुग्णांचा अभ्यास केल्यानंतर त्यांपैकी 43 रुग्णांच्या मेंदूचे कार्य बिघडलेले आढळून आले.
- त्याचबरोबर त्यांच्यामध्ये स्ट्रोक, मेंदूच्या नसा खराब होणे आणि मेंदूशी संबंधित इतर विपरित परिणाम झालेले आढळून आले आहेत.
‘एक राज्य, एक खेळ -केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू:
- ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धामध्ये भारतीय खेळाडूंनी अधिकाधिक पदके मिळवावी, यासाठी प्रत्येक राज्याने एका खेळाची निवड करून त्याच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, अशी इच्छा केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली.
- एका वेबिनारदरम्यान रिजिजू यांनी ‘एक राज्य, एक खेळ’ या संकल्पनेचा प्रस्ताव मांडला.
- ‘भारताच्या प्रत्येक राज्यातील क्रीडा मंत्र्यालयांना ‘एक राज्य, एक खेळ’ या मोहिमेचा प्रस्ताव पाठवण्यात आला असून लवकरच याविषयी अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- मणिपूर हे राज्य बॉक्सिंग या खेळावर विशेष लक्ष देऊ शकते,’’ असे रिजिजू म्हणाले.
दिनविशेष :
- शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.
- सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.
- सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.