Current Affairs (चालू घडामोडी)

9 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2018)

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतर्फे भारतीय अर्थव्यवस्थेचा गौरवोद्गार:

  • भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचे गौरवोद्गार आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत करण्यात आलेल्या सुधारणांचे फायदे आता दिसून येत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे.
  • 2.6 ट्रिलियन डॉलर इतका अवाढव्य असलेला भारतीय अर्थव्यवस्थेच्या हत्तीने आता धावण्यास सुरूवात केली असल्याचे आयएमएफचे भारतीय मिशन प्रमुख रानिल साल्गादो यांनी म्हटले. आयएमएफच्या ताज्या अहवालानुसार, भारत मार्च 2019 पर्यंत 7.3 टक्के आणि त्यानंतर 7.5 टक्के वेगाने विकास करेल. जागतिक वाढीत भारताचा 15 टक्के हिस्सा असेल, असेही या अहवालात म्हटले आहे.
  • एका वार्षिक अहवालानुसार साल्गादो म्हणाले की, परचेसिंग पॉवर पॅरिटी (पीपीपी) प्रकरणी एकूण जागतिक वाढीत भारताचा 15 टक्के हिस्सा असेल. पण ट्रेडिंग चीनप्रमाणे नसेल. दीर्घ काळापर्यंत जागतिक वाढीचा मुख्य स्त्रोत म्हणून भारताकडे पाहिले जाते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2018)

शेअर बाजारात ऐतिहासिक उच्चांक:

  • मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने (सेन्सेक्स) 9 ऑगस्ट ऐतिहासिक उसळी घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
    शेअर बाजारामध्ये 8 ऑगस्ट रोजी पाहायला मिळालेली विक्रमी तेजी आता देखील कायम आहे. 9 ऑगस्ट रोजी सकाळी मार्केट सुरू होताच ऐतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्स 38 हजारांवर पोहोचला आहे.
  • निफ्टीनेही पहिल्यांदाच 11495 ची पातळी गाठली. सेन्सेक्सची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी ठरली. या विक्रमी उंचीने शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

ऐतिहासिक वास्तु पाहण्याच्या शुल्कात दरवाढ:

  • जगातील सात अश्चर्यांपैकी एक असणारे ताजमहल पाहण्यासाठी 8 ऑगस्ट पासून देशातील तसेच परदेशातील पर्यटकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. भारतीयांसाठी असलेल्या प्रवेशशुल्क 10 तर परदेशी पर्यटकांसाठीच्या प्रवेश मुल्यात 100 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
  • भारतीय पुरातत्त्व खात्याने ताजमहलबरोबरच देशातील इतर 17 ऐतिहासिक प्रेक्षणिय स्थळांवरील प्रवेशशुल्कात वाढ केली आहे. ताजमहल पाहण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशमुल्यात याच वर्षी वाढ करण्यात आली होती. आता पुन्हा 10 रुपयांनी प्रवेशशुल्क वाढण्यात आल्यासंदर्भातील नोटीस सांस्कृतिक मंत्रालयाने जारी केली आहे.
  • वाढलेल्या प्रवेशशुल्कानुसार आता भारतीय पर्यटकांना 40 ऐवजी 50 रुपये द्यावे लागतील तर परदेशी पर्यटकांना एक हजार ऐवजी 1100 रुपये द्यावे लागणार आहेत.
  • दक्षिण आशियातील म्हणजेच सार्क देशातील पर्यटकांनाही ताजमहल पाहण्यासाठी 10 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आता सार्क देशातील पर्यटकांना 540 ऐवजी 550 रुपये भरुन ताजमहल पाहता येईल.
  • ताजमहल पाहायला जाणाऱ्या पर्यटकांनी कॅशलेस माध्यमातून प्रवेशशुल्क भरल्यास त्यांना विशेष सूट देण्यात येणार आहे. भारतीय पर्यटकांनी डिजिटल माध्यमातून पैसे भरल्यास त्यांना प्रति तिकीट पाच रुपये आणि विदेश पर्यटकांना प्रति तिकीट 50 रुपये सूट मिळणार आहे.

औरंगाबाद ठरले क्रांती मोर्चाचा केंद्रबिंदू:

  • मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू केलेल्या मोर्चाला 9 ऑगस्ट रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ऐतिहासिक क्रांती मोर्चाला जन्म देणारी 9 ऑगस्ट 2016 रोजीची सकाळ आजही डोळ्यांसमोर तरळते.
  • शिस्त आणि संयमाचा आदर्श ठरलेल्या न भूतो न भविष्यती निघालेल्या मोर्चासाठीची आचारसंहिता राज्यासह देशात, विदेशातही पाळली गेली. त्यानंतर चांगल्या गोष्टींचा पायंडादेखील येथूनच पडला. येथून केलेल्या आवाहनाला राज्यभरात प्रतिसाद दिला गेला. अशा अनेक गोष्टींमुळे क्रांती मोर्चाचे केंद्र औरंगाबाद राहिलेले आहे.
  • मराठा समाजाच्या प्रश्‍नांकडे राज्यकर्त्यांचे होणारे दुर्लक्ष आणि कोपर्डी येथे घडलेल्या घटनेच्या निमित्ताने संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी मूक मोर्चाचे माध्यम निवडले गेले. विशेष म्हणजे मनात प्रचंड संताप, चीड असतानाही मूक मोर्चामध्ये शिस्तीचे पालन केल्याने सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला होता. या मोर्चाच्या धर्तीवर प्रारंभी जिल्हावार मोर्चे निघाले. त्यानंतर तालुका पातळीवरही मोर्चे काढण्यात आले.
  • क्रांती मोर्चाचे हे लोण राज्यभर पसरले. परिणामी मोर्चाबाबत पुढील वाटचालीची सूत्रे येथूनच हलली हे विशेष! मुंबईत 9 ऑगस्ट 2017 रोजी काढलेल्या मराठा क्रांती महामोर्चाचे नियोजनही येथूनच झाले. राज्यव्यापी चर्चा व्हावी, त्यातून समाजहिताचे निर्णय, पुढील दिशा ठरविण्यासाठी येथे राज्याचे समन्वय कार्यालय सुरू करण्यात आले होते.

कापड उद्योगातील वस्तूंवरील आयात शुल्कात वाढ:

  • केंद्र सरकारने कापड उद्योगातील विविध उत्पादनांवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. यामध्ये कपडे, रुमाल, उपरणी, स्कार्फ, कार्पेट अशा उत्पादनांचा समावेश आहे.
  • मेक इन इंडियातंर्गत देशातंर्गत उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने आयात शुल्क वाढीचा निर्णय 7 ऑगस्ट रोजी जाहीर केला. कापड उद्योगातील एकूण 32 वस्तूंवरील आयात शुल्क वाढवण्यात आले आहे.
  • अलीकडेच केंद्र सरकारने मोबाइल फोन, खेळणी आणि टीव्हीवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. आयात महाग केल्यामुळे स्थानिक कापड उद्योजकांच्या व्यवसायाला बळकटी मिळेल असा केंद्र सरकारचा अंदाज आहे. कापड उद्योगात मोठया प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. स्थानिक पातळीवर उत्पादन वाढल्यास नव्या नोकऱ्यांची निर्मिती होऊ शकते असा केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
  • आयात शुल्क वाढवण्याच्या या निर्णयाचा भारतीय उद्योगाला फायदा होऊन मेक इन इंडियाला बळकटी मिळू शकते. या निर्णयाचा चीन, विएतनाम, टर्की, श्रीलंका आणि बांगलादेश या देशांबरोबर होणाऱ्या कापड व्यापारावर परिणाम होणार आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये असलेल्या व्यापार करारामुळे आयात शुल्क वाढीच्या या निर्णयातून श्रीलंकेला काही प्रमाणात सवलत मिळू शकते.

दिनविशेष:

  • 9 ऑगस्ट हा ‘भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन‘ आहे.
  • सन 1942 मध्ये 9 ऑगस्ट रोजी (क्रांतिदिन) भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
  • छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन 9 ऑगस्ट 1993 मध्ये झाले.
  • सन 2000 मध्ये भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2018)

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

1 year ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

1 year ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago