Current Affairs (चालू घडामोडी)

9 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 August 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2019)

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित :

  • माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना ‘भारत रत्न’ या देशातील सर्वोच्च नागरिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते प्रणव मुखर्जींना हा पुरस्कार देण्यात आला. राष्ट्रपती भवनात झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते.
  • तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर ‘भारत रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • तर या पुरस्कारासाठी जानेवारी महिन्यांतच या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.
  • भारतरत्नने आजवर 45 जणांना सन्मानित करण्यात आले आहे. यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (8 ऑगस्ट 2019)

केजरीवाल सरकार प्रत्येक वापरकर्त्यास दर महिन्याला 15 जीबी डाटा मोफत देणार :

  • दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीकरांसाठी पुन्हा एक मोठी घोषणा केली. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितले की, दिल्लीत तब्बल 11 हजार ठिकाणी हॉटस्पॉट लावले जाणार आहेत. एवढेच नाहीतर मोफत वायफाय सुविधा देखील लवकरच सुरू केली जाणार आहे. ज्यामुळे प्रत्येक वापरकर्त्यास 15 जीबी डाटा प्रत्येक महिन्याला मोफत दिला जाईल आणि हा यासाठीचा पहिला टप्पा असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • दिल्ली विधानसभा निवडणुका 2020 मध्ये होणार असल्याने, केजरीवाल सरकारकडून दिल्लीकरांना खुश करण्यासाठी एकापाठोपाठ एक घोषणा केल्या जात आहेत.
  • तर या अगोदर मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिल्लीकरांना 200 युनिटपर्यंतची वीज मोफत201 ते 400 युनिटपर्यंत वापर असलेल्या ग्राहकांना वीज बिलावर 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. सलग पाचव्या वर्षी वीज बिल दरात कोणतीही वाढ केलेली नाही.

मिराज 2000 वैमानिकांना हवाई दलाच्या सर्वोच्च पुरस्कारने गौवरण्यात येणार :

  • फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यानंतर 12 दिवसांनी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक करत जैश-ए-मोहम्मदची प्रशिक्षण केंद्रं उद्ध्वस्त केली. या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी झालेल्या हवाई दलाच्या पाच वैमानिकांचा त्यांनी दाखवलेल्या शौर्यासाठी हवाई दलाचा सर्वोच्च सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे.
  • 26 फेब्रुवारी बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारताने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये सहभागी असणाऱ्या हवाई दलाच्या वैमानिकांना हवाई दलाकडून मेडल ऑफ गॅलेंट्री देण्यात येणार असल्याचे या पुरस्कारशी संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
  • मिराज – 2000 या लडाऊ विमानांच्या तुकडीने 26 फेब्रुवारीच्या रात्री बालाकोट येथे हवाई हल्ला करत तेथील दहशतवादी तळ नष्ट केले होते. भारतीय हवाई दलाने नियंत्रण रेषा पार करत आठ किलोमीटरपर्यंत आतमध्ये जाऊन मिराज 2000 च्या मदतीने स्पाइस 2000 बॉम्ब निर्देशित करण्यात आलेल्या ठिकाणी पाडले होते.

विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांचा ‘वीरचक्र’ने होणार सन्मान :

  • भारतीय हवाई दलातील विंगकमांडर अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना 27 फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्थमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ 16 फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘विरचक्र’ पुरस्काराने सन्मान होणार असल्याचे सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
  • तर यावेळी अभिनंदन यांनी मिग 21 बायसन विमानातून पाकिस्तानच्या एफ 16 फायटर विमानावर वर आर- 73 मिसाइल डागले. या झटापटीमध्ये पाकिस्तानी विमानांनी डागलेले अॅमराम मिसाइल वर्धमान यांच्या मिग 21 बायसन विमानाला धडकले.

हाशिम आमलाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती :

  • दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हाशिम आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.
  • काही दिवसांपूर्वीच आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती, त्यानंतर आफ्रिकेच्या आणखी एका मोठ्या क्रिकेटपटूने निवृत्ती स्विकारली आहे. आमलाने आपला निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला कळवला आहे.
  • नुकत्याच इंग्लंडमध्ये पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत आमलाला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. आफ्रिकेचा संघ या स्पर्धेत गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर फेकला गेला.

मेनलॅन्ड ते अँनाकापा पोहणारा प्रभात ठरला पहिला आशियाई जलतरणपटू :

  • कॅलिफोर्नियातील सांताबारबारा येथील मेनलॅन्ड ते अँनाकापा हे प्रशांत महासागरातील 20 किलोमीटरचे सागरी अंतर यशस्वीरीत्या पोहून पार करणारा मुंबईकर प्रभात कोळी हा आशिया आणि भारतातील पहिला जलतरणपटू ठरला आहे.
  • तसेच आतापर्यँत जगभरातील केवळ 14 जलतरणपटूनी अशी कामगिरी साधली आहे.
  • चेंबूरच्या बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकत असलेल्या प्रभातने सातव्या क्रमांकाची वेळ नोंदवली आहे. विशेष म्हणजे या मोहिमेकरता प्रशांत महासागरात सराव करत असताना प्रभातचा डावा
    खांदा दुखावला होता. पण या दुखण्यावर मात करत प्रभातने यशावर शिक्कमोर्तब केले.

दिनविशेष :

  • 9 ऑगस्ट हा ‘भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन‘ आहे.
  • सन 1942 मध्ये 9 ऑगस्ट रोजी (क्रांतिदिन) भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
  • छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन 9 ऑगस्ट 1993 मध्ये झाले.
  • सन 2000 मध्ये भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Must Read (नक्की वाचा):

चालू घडामोडी (10 ऑगस्ट 2019)

Sonali Borade

With Sonali's thorough backing of education in online journalism and a strong affinity to foster proper guidance, she is looking forward to engaging readers on smart education subjects. She covers articles related to all upcoming exam schedules and is much sought after due to his crisp style of writing. Sonali strongly believes that education is the future and evokes this interest in the readers.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago