9 August 2021 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 ऑगस्ट 2021)
इंडो-तिबेट सीमा पोलीस दलात प्रथमच दोन महिला अधिकारी :
भारत-चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गस्त घालणाऱ्या इंडो तिबेट सीमा पोलीस दलात (आयटीबीपी) प्रथमच दोन महिला अधिकाऱ्यांचा रविवारी समावेश करण्यात आला आहे.
तर एकूण 53 अधिकारी आयटीबीपीत सामील झाले असून त्यांचे प्रशिक्षण मसुरी येथे झाले.
तसेच आयटीबीपीच्या इतिहासावर आधारित 680 पानांच्या पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले. त्यात काही दुर्मीळ माहिती व छायाचित्रे आहेत.
आयटीबीपीने महिलांना 2016 मध्येच स्थान दिले होते. त्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन या दलात सामील होण्याचा मार्ग खुला झाला होता, पण आतापर्यंत केवळ कनिष्ठ स्तरावरच महिलांचा समावेश होता.
संपूर्ण जगात करोना विरुद्धच्या लढाईत नव नवे प्रयोग केले जात आहेत. करोना विषाणूविरुद्धच्या लढाईत भारताला आणखी यश मिळताना दिसत आहे.
कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचे संमिश्र डोस दिल्याचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. इंडियन कॉन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने याबाबतची माहिती दिली आहे.
तर या दोन्ही लसींची समिश्र डोस सुरक्षित असल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच रोगप्रतिकार शक्ती वाढल्याचंही निष्पन्न झालं आहे.
तसेच मिश्र लसीच्या शेवटच्या टप्प्यात चांगले परिणाम दिसल्यास करोना लसीकरण मोहीमेला वेग मिळणार आहे.
गुगल डूडलवर झळकणारी भारतीय महिला :
भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांची काल (8 ऑगस्ट) 107 वी जयंती होती.
भारताच्या पहिल्या महिला वैमानिक सरला ठकराल यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने आपल्या डूडलच्या माध्यमातून अनोखी मानवंदना दिली आहे.
तर वर्षानुवर्षे चालत आलेली सगळी बंधन झुगारून देऊन अक्षरशः अवकाशात भरारी घेऊन भारतीय महिलांसाठी आदर्श ठरलेल्या सरला ठकराल यांची काल (८ ऑगस्ट) 107 वी जयंती होती.
सरला ठकराल यांनी तब्बल 85 वर्षांपूर्वी जिप्सी मॉथ नावाच्या विमानाचे उड्डाण करून देशाची पहिली महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला होता.
तसेच गुगलकडून ठकराल यांच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेण्यात आली आहे.
बुमराहनं ‘या’दिग्गज गोलंदाजाची केली बरोबरी :
जसप्रीत बुमराहची गणना जगातील सर्वात घातक गोलंदाजांमध्ये का केली जाते, हे त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात सिद्ध केले.
बुमराहने यजमानांविरुद्धच्या सामन्यात एकूण 9 बळी घेतले. पहिल्या डावात त्याने चार इंग्लिश फलंदाजांना बाद केले, तर दुसऱ्या डावात अर्ध्या संघाला म्हणजेच पाच फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
तर आपल्या गोलंदाजीच्या बळावर त्याने भारताचा माजी वेगवान गोलंदाज झहीर खानच्या विक्रमाशी बरोबरी साधली.
तसेच इंग्लंडने पहिल्या डावात 183 धावा आणि दुसऱ्या डावात 303 धावा केल्या.
जसप्रीत बुमराहने सामन्यात 110 धावा देऊन 9 बळी घेतले.
बुमराहसह फक्त तीन भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडमध्ये 9 किंवा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
दिनविशेष :
9 ऑगस्ट हा ‘भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन‘आहे.
सन 1942 मध्ये 9 ऑगस्ट रोजी (क्रांतिदिन) भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याच्या क्रांतीचे पर्व मुंबई येथून सुरु झाले.
छोडो भारत चळवळीच्या सुवर्णजयंती सांगतासमारंभानिमित्ताने सरहद गांधी खान अब्दुल गफार खान यांच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन 9 ऑगस्ट 1993 मध्ये झाले.
सन 2000 मध्ये भाभा अणूसंशोधन केन्द्राचे (BARC) संचालक डॉ. अनिल काकोडकर यांना दिल्ली येथील इन्स्टिट्युट ऑफ इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेचा सुवर्णमहोत्सवी गौरव पुरस्कार जाहीर.
Dhanshri Patil is a full-time Content Writer and author at MPSC World. With a background in Computer Engineering, Dhanshri's skill in education has assisted both early adopters and innovators learn about the ongoing happenings in the educational field. Dhanshri believes in blogs being scholarly yet simple. Her blogs are sought after for intimate details while using simple language.