9 फेब्रुवारी 2023 चालू घडामोडी – Current Affairs
9 February 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 फेब्रुवारी 2023)
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’:
- निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राज्य सरकारने बुधवारी जाहीर केला.
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथे या पुरस्काराची घोषणा केली.
- एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींना हा पुरस्कार जाहीर होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- याआधी नानासाहेब धर्माधिकारी यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
Must Read (नक्की वाचा):
कायद्याने सरोगसी माता आणि अपत्याच्या जनुकीय नात्यास अनुमती नाही:
- सरोगसीद्वारे झालेल्या अपत्याशी सरोगेट मातेचे जनुकीय नाते नसेल, अशी कायद्यातील तरतूद आहे, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
- कोणतीही स्त्री स्वत:ची अंडपेशी दान करून स्वत:च सरोगेट माता होऊ शकत नाही, अशी या कायद्यात तरतूद असल्याचे केंद्र सरकारने सांगितले.
- मात्र, सरोगसी पद्धतीने जन्माला येणाऱ्या अपत्याचा युग्मक (गॅमेट) दान करणाऱ्या दांपत्याचे किंवा अंडपेशी दान करणाऱ्या इच्छुक विधवा अथवा घटस्फोटित महिलेशी जनुकीय संबंध असला पाहिजे असे या कायद्यात स्पष्ट कररण्यात आले आहे असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.
- यापैकी एका याचिकेत सरोगसी (नियमन) कायदा, 2021 आणि साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान (असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजी) (नियमन) कायदा, 2021 या दोन कायद्यांच्या काही विशिष्ट तरतुदींना आव्हान देण्यात आले आहे.
- न्या. अजय रस्तोगी यांच्या नेतृत्वाखालील पीठासमोर या याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होणार अमेरिकेची क्रिकेट लीग:
- अमेरिकेचे मेजर लीग क्रिकेट (MLC) 19 मार्च रोजी ह्यूस्टनमधील नासा स्पेस सेंटरमध्ये लॉन्च होईल.
- जुलैमध्ये खेळल्या जाणार्या फ्रँचायझी-आधारित टी-20 स्पर्धेत सहा संघांचा समावेश आहे.
- ज्यामध्ये न्यूयॉर्क, वॉशिंग्टन डीसी, डॅलस, सॅन फ्रान्सिस्को, लॉस एंजेलिस आणि सिएटलमधील प्रत्येकी एक संघ सहभागी होईल.
- स्पर्धेचा पहिला हंगाम 18 दिवसांचा असेल आणि डॅलस आणि मॉरिसविले येथील एमएलसी मैदानावर खेळवला जाईल.
गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत रचला इतिहास:
- झिम्बाब्वेचा खेळाडू गॅरी बॅलेन्सने वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावत इतिहास रचला आहे.
- कसोटी क्रिकेटमध्ये दोन देशांसाठी शतक झळकावणारा तो जगातील दुसरा खेळाडू आहे.
- झिम्बाब्वेकडून गॅरी बॅलेन्सने बुलावायोमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावले.
- त्याने यापूर्वी इंग्लंड संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळले असून कसोटी क्रिकेटमध्येही त्याने अनेक शतके झळकावली आहेत.
दिनविशेष:
- स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1874 मध्ये झाला.
- सन 1900 मध्ये लॉन टेनिस या खेळातील डेव्हिस कप या करंडकाची सुरूवात झाली.
- महाराष्ट्रचे 8वे मुख्यमंत्री ए.आर. अंतुले यांचा जन्म 9 फेब्रुवारी 1929 रोजी झाला होता.
- स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सन 1951 पासून सुरू झाली.
- चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा