Current Affairs (चालू घडामोडी)

9 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 जानेवारी 2019)

भारत-नॉर्वे देशातील संबंधांना नवी दिशा:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 जानेवारी रोजी नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांच्याशी विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचे प्रयत्न आणि परस्पर संबंधांना नवी दिशा देण्याबाबत सहकार्य करण्यावर चर्चा केली.
  • मोदी आणि सोलबर्ग यांनी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली आणि भारत-नॉर्वे संबंधांचा आढावाही घेतला. सर्व क्षेत्रांमधील सहकार्याबाबत आम्ही आढावा घेतला आणि परस्पर संबंधांना नवी ऊर्जा आणि दिशा  कशी देता येईल याबाबतही चर्चा केली, असे मोदी यांनी या चर्चेनंतर जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि नॉर्वे यांच्यात चांगले सहकार्य आहे. संयुक्त राष्ट्र संघ सुरक्षा परिषद सुधारणांवर दोन्ही देश सहकार्य करीत आहेत, त्याचप्रमाणे दहशतवादावरही चर्चा करण्यात आली.
  • नॉर्वेच्या पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांचे 7 जानेवारी रोजी भारतात आगमन झाले, त्यांचे 8 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनामध्ये यथोचित स्वागत करण्यात आले.

आयपीएल 2019 ही स्पर्धा भारतातच होणार:

  • भारतात एप्रिल-मे दरम्यान लोकसभा निवडणुका होणार असल्या तरी ‘आयपीएलचे सर्व सामने हे भारतातच होणार आहेत.
  • BCCI च्या प्रशासकीय समिती (CoA) ची दिल्लीमध्ये बैठक झाली. त्यानंतर ही माहिती देण्यात आली. 23 मार्चपासून हा स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • प्रशासकीय समितीच्या सदस्यांची नवी दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीदरम्यान आयपीएल सामन्यांची ठिकाणे आणि वेळापत्रक याबाबत चर्चा झाली. या बैठकीतील प्राथमिक चर्चेनंतर विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार IPL स्पर्धा ही भारतातच खेळवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
  • तसेच यासह या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबतही चर्चा करण्यात आली असून 23 मार्च 2019 पासून या स्पर्धेचा थरार रंगणार असल्याचे समजत आहे. या संदर्भात CoA इतर समभागधारकांशी चर्चा करणार असून त्यानंतर याबाबत तपशीलवार माहिती देण्यात येणार आहे.

नासाच्या ‘टेस’ मोहिमेत नव्या ग्रहाचा शोध:

  • नासाने अलिकडेच सौरमालेबाहेर एक ग्रह शोधून काढला असून तो 53 प्रकाशवर्षे दूर असलेल्या बटू ताऱ्याभोवती फिरत आहे. ट्रान्सिटिंग एक्सोप्लॅनेट सव्‍‌र्हे सॅटेलाइट म्हणजे टेस अंतर्गत एप्रिलपासून शोधण्यात आलेला हा तिसरा ग्रह आहे. या ग्रहाचे नाव एचडी 21749 बी असे आहे. तो बटू ताऱ्याभोवती फिरत असून हा तारा 53 प्रकाशवर्षे दूर आहे.
  • ग्रहाचा कक्षा काळ हा आतापर्यंत शोधलेल्या तीन ग्रहात सर्वाधिक आहे. एचडी 21749 बी ग्रह हा ताऱ्याभोवती 36 दिवसांत प्रदक्षिणा पूर्ण करतो. आधीच्या पाय मेन्सा बी या महापृथ्वी मानल्या जाणाऱ्या ग्रहाचा प्रदक्षिणा काळ 6.3 दिवस असून एलएचएस 3844 बी या खडकाळ ग्रहाचा प्रदक्षिणा काळ 11 तासांचा आहे.
  • सर्व तीन ग्रह टेस निरीक्षणांच्या पहिल्या तीन महिन्यांत शोधले आहेत. नव्या ग्रहावरचे तपमान 300 अंश फॅरनहीट असण्याची शक्यता असून तो तुलनेने थंड आहे. सूर्याइतक्या तप्त ताऱ्याच्या जवळ असूनही त्याचे हे तपमान तुलनेने कमी मानले जाते. या ताऱ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांपैकी तो शीत ग्रह असल्याचे अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधक डायना ड्रॅगोमीर यांनी सांगितले.

लोकसभेत मंजुरीनंतर नव्या आरक्षण विधेयकाची कसोटी:

  • आर्थिदृष्ट्या मागास वर्गांना नोकरी आणि शिक्षणांत 10 टक्के आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. त्यानंतर ते राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्याने हे विधेयक इथं मंजूर होण्यासाठी कसोटी लागणार आहे.
  • राज्यसभेत खासदारांची संख्या 244 आहे. विधेयक मंजूर होण्यासाठी यांपैकी दोन तृतीयांश (163) मतं विधेयकाच्या बाजूने मिळणे आवश्यक असते.
  • भाजपाचे 73 तर एनडीएचे 98 खासदार आहेत. या विधेयकाचे खुलेपणाने स्वागत केलेल्या काँग्रेसचे 50, समाजवादी पार्टीचे 13, बहुजन समाज पार्टीचे 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 तसेच आपचे 3 असे मिळून हा आकडा 172 पर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाने राज्यसभेत या विधेयकाला विरोध न केल्यास ते सहजतेने मंजूर होऊ शकते.
  • मात्र, काही नव्या मुद्द्यांवरुन जर कोणत्याही पक्षाने यावर आक्षेप घेतला तर हे विधेयक अडचणीत येऊ शकते. दरम्यान, लोकसभेत चर्चेदरम्यान या आरक्षणावरुन विरोधकांनी भाजपावर निशाणा साधत हा निवडणुकीतील जुमला असल्याचे म्हटले आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन हे विधेयक मांडण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

अहमदाबाद मध्ये असणार जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान:

  • क्रिकेट हा खेळ भारतीय लोकांसाठी एका धर्माप्रमाणे आहे. याच क्रिकेटवेड्या भारतीय प्रेक्षकांसाठी अहमदाबाद शहरात जगातले सर्वात मोठे क्रिकेट मैदान उभे राहत आहे.
  • मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद मधील या मैदानाला सरदार पटेल यांचे नाव देण्यात आले असून, आसनक्षमतेच्या बाबतीत हे मैदान कोलकात्याचे इडन गार्डन्स आणि मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानालाही मागे सोडणार आहे.
  • तर या नवीन मैदानाची आसनक्षमता ही 1 लाख 10 हजारांच्या घरात असणार आहे. मेलबर्न क्रिकेट क्लबच्या मैदानाची आसनक्षमता सध्या 1 लाख आहे, तर कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानाची आसनक्षमता 80 हजारांच्या घरात आहे.
  • गुजरात क्रिकेट असोसिएशने उपाध्यक्ष परिमल नथवानी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर या मैदानाच्या बांधकामाचे फोटो शेअर केले आहेत.

दिनविशेष:

  • सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
  • महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
  • इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक 9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
  • सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

Sandip Rajput

Sandip is empowered with his solid education in arts and uses his crisp way of expressing ideas about competitive exams. Sandip has covered the breadth of technology and believes in keeping updated. His core expertise is his awareness of educational requirements and possible knowledge to be delivered on time. Sandip is positive that a healthy blend of novelties would change smart education in a proper way.

Recent Posts

6 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 सप्टेंबर 2023) आदित्य एल-1 ची मोठी झेप: सूर्याचा अभ्यास…

2 years ago

5 सप्टेंबर 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 September Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2023) डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर…

2 years ago

9 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

9 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (9 मार्च 2023) BSNL लवकरच लॉन्च करणार 4G सर्व्हिस:…

2 years ago

8 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

8 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (8 मार्च 2023) नौदलाने केली मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी…

2 years ago

6 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

6 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (6 मार्च 2023) सानियाचा घरच्या कोर्टवर निरोप: टेनिस कारकीर्दीला…

2 years ago

5 मार्च 2023 चालू घडामोडी – Current Affairs

5 March 2023 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (5 मार्च 2023) कपिल सिबल यांची इन्साफ मंचाची स्थापना:…

2 years ago