9 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

9 January 2020 Current Affairs In Marathi
9 January 2020 Current Affairs In Marathi

9 January 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (9 जानेवारी 2020)

ओबीसी जनगणनेचा ठराव विधानसभेत मंजूर :

  • शिवसेना व राष्ट्रवादीची भूमिका अमान्य करीत आगामी राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी मांडला व तो मंजूर करवून घेतला.
  • विधिमंडळाच्या प्रथा, परंपरा आणि नियमानुसार हा ठराव सभागृहात मांडण्याचा निर्णय आधी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत करावा आणि आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात तो मांडावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
  • तसेच संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनीही हीच भूमिका मांडली; पण स्वत:हून ठराव मांडण्याचा आपल्याला अधिकार आहे असे सांगत नाना पटोले यांनी ठराव मांडला आणि आवाजी मतदानाद्वारे तो एकमताने मंजूर झाल्याचे सांगितले.
  • तर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पटोले यांच्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले.

विराट कोहलीचे अव्वल स्थान कायम :

  • भारतीय कर्णधार विराट कोहली याने बुधवारी जाहीर झालेल्या आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले. त्याचवेळी, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांची मात्र घसरण झाली.
  • आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीनुसार कोहली 928 गुणांसह अव्वल, तर आॅस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ 911 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
  • तसेच पुजारा 791 गुणांसह सहाव्या आणि रहाणे 759 गुणांसह नवव्या स्थानी घसरला. दुखापतीतून सावरलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह 794 गुणांसह सहाव्या स्थानी कायम आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा 772 आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी 771 गुणांसह अनुक्रमे नवव्या तसेच दहाव्या स्थानावर आहेत.

सायना, सिंधू विजयी :

  • भारताच्या स्टार शटलर्स पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी बुधवारी सहज विजयासह मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली.
  • दुसरीकडे विश्व अजिंक्यपद स्पर्धेचा कांस्य विजेता बी. साईप्रणीत व किदाम्बी श्रीकांत हे सलामीलाच पराभूत झाले. एच. एस. प्रणॉयने मात्र विजयी सलामी दिली.
  • माजी विश्वविजेती सिंधूने पहिल्या फेरीत रशियाची येवगेनिया कोसेत्सकाया हिचा केवळ 35 मिनिटांच्या खेळात 21-15,21-13 ने पराभव केला.
  • सायनाने बेल्जियमची लियाने टेनवर केवळ 36 मिनिटात 21-15, 21-17 असा विजय नोंदविला.

जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज :

  • भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून दमदार पुनरागमन केलं आहे. इंदूरच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात बुमराहने एक बळी घेत आपलं संघातलं महत्व सिद्ध केलं.
  • श्रीलंकेचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये बुमराहचा सहकारी लसिथ मलिंगानेही, जसप्रीतचं कौतुक केलं आहे.
  • दरम्यान, श्रीलंकेने विजयासाठी दिलेल्या 143 धावांचा पाठलाग करताना भारताने चांगली सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी केली. लोकेश राहुल माघारी परतल्यानंतर ठराविक अंतराने शिखर धवनही माघारी परतला.

दिनविशेष:

  • सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
  • महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
  • इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
  • स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक 9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
  • सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.