9 January 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (9 जानेवारी 2022)
राफेल नौदलात दाखल होणार :
- भारतीय वायूदलासाठी लढाऊ विमानांची आवश्यकता लक्षात घेता 2016 मध्ये फ्रान्स देशाबरोबर 36 राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत आपण करार केला होता.
- तर आत्तापर्यंत 30 विमाने भारतीय वायूदलाच्या ताफ्यात दाखल झाली असून उर्वरीत सहा लवकरच दाखल होणार आहेत.
- आता भारतीय वायूदलानंतर आता भारतीय नौदलही राफेल लढाऊ विमाने घेण्याबाबत चाचपणी करत आहे.
- सध्या भारताच्या नौदलाकडे आयएनएस विक्रमादित्य ही एकमेव विमानवाहू युद्धनौका असून यावर रशियन बनावटीची ‘मिग-29 के’ जातीची लढाऊ विमाने तैनात आहेत.
- तर या वर्षी साधारण ऑगस्ट महिन्यात नौदलात स्वदेशी बनावटीची विमानवाहु युद्धनौका आयएनएस विक्रांत सेवेत दाखल होणार आहे, या युद्धनौकेच्या युद्धपातळीवर चाचण्या सध्या सुरु आहेत.
- नवी विमानवाहु युद्धनौका नौदलात दाखल होण्यासाठी सज्ज होत असून यावर कोणती लढाऊ विमाने असावी याबाबत नौदलाची चाचपणी सुरु आहे.
आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये आला नवा नियम :
- आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटच्या प्लेइंग कंडिशनमध्ये बदल केला आहे.
- तर या अंतर्गत, गोलंदाजी संघाला कोणत्याही परिस्थितीत निर्धारित वेळेत षटकांचा कोटा पूर्ण करावा लागेल.
- जर संघ निर्धारित वेळेपेक्षा मागे राहिला, तर उर्वरित षटकांमध्ये, त्याचा एक क्षेत्ररक्षक 30 यार्डबाहेर उभा राहू शकणार नाही. त्याला आत राहावे लागेल.
- अशा स्थितीत गोलंदाजी करणाऱ्या संघाला तोटा सहन करावा लागू शकतो.
- सध्या, पॉवरप्लेनंतर 30 मीटर यार्ड वर्तुळाबाहेर 5 क्षेत्ररक्षक असतात. मात्र नवीन नियमांनंतर केवळ 4 क्षेत्ररक्षक यार्डबाहेर राहू शकणार आहेत.
- याशिवाय द्विपक्षीय मालिकेतील प्रत्येक डावात अडीच मिनिटांचा ऐच्छिक ड्रिंक्स ब्रेक घेण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे.
- मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी सहमती दर्शवली तरच हे लागू होईल.
‘नीट-पीजी’ला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी :
- सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गासाठी 27 टक्के आणि आर्थिक दुर्बल वर्गासाठी (ईडब्ल्यूएस) 10 टक्के आरक्षण कायम ठेवत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेच्या (नीट-पीजी 2021) समुपदेशनास (काऊन्र्सिंलग) अंतरिम परवानगी दिली.
- प्रवेश प्रक्रियेसाठी ‘तातडीची गरज’ म्हणून हा निर्णय देण्यात येत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
- सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे पदव्युत्तर प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या अनेक डॉक्टरांना दिलासा मिळाला आहे.
दिनविशेष:
- सन 1870 मध्ये मुंबई मधील चर्चगेट रेल्वे स्थानक सुरू झाले.
- महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचा जन्म 9 जानेवारी 1900 रोजी झाला होता.
- इतिहास संशोधक डॉ. गणेश हरी खरे यांचा जन्म 9 जानेवारी 1901 मध्ये पनवेल येथे झाला.
- स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी हुतात्मा स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद साप्ताहिक 9 जानेवारी 1926 रोजी मुंबईत सुरू केले.
- सन 1966 मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात ताश्कंद करार झाला.